नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या या नवीन लेखामध्ये आपलं स्वागत आहे, मित्रांनो, आपणच काय या जगातील सर्व लोकांची अतिशय उत्कट इच्छा असते. की त्यांच्याकडे असलेल्या पैशांपेक्षाही जास्त पैसा त्यांच्याकडे असावा. आजचे आपले हे उपाय व नियम श्रीमंतीची देवी लक्ष्मीजींना प्रचंड प्रमाणात प्रसन्न करतील.
आपण जेव्हा जन्म घेतो, तेव्हा या जगात येण्यापूर्वी निर्माताने प्रत्येक व्यक्तीचे एक अकाउंट तयार केलेले असते. ज्यात आपल्या आयुष्याचा लेखाजोखा असतो.
कुणाला कधी किती पैसा मिळल, आणि तो कोणत्या स्वरूपात मिळेल, जीवनातील सर्व घ ट ना त्यात क्रमवार लिहलेल्या असतात. तरीही माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आपल्या हिंदू धर्म शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत.
आणि याच कारणासाठी प्रत्येकजण माता लक्ष्मींना प्रसन्न करण्याचे निरनिराळे प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजच्या महागाईच्या युगात प्रत्येक जणाला पैसा हवा असतो. या पैशाचा मोह आजपर्यंत कुणालाही टाळता आलेला नाही.
परंतु या शर्यतीत हर एकजण पुढे जाण्याची मनिषा घेऊन धावत असतो. पण प्रत्येकाला माता लक्ष्मींचा आशीर्वाद मिळतोच असे नाही. त्या आशिर्वादासाठी आपल्यातही काही विशेष गुण असायला हवेत. तरच आपल्याला माता लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त होईल.
मित्रांनो, आपल्या सर्वांना हे ठाऊकच आहे की, आपल्या परंपरेनुसार घरातील सूनेला सुद्धा माता लक्ष्मीचं रुप मानलं जातं. अशीही मान्यता आहे की घरच्या सुनेला जास्तीत जास्त आशीर्वाद मिळत असतात.
म्हणूनच त्या सुनेमध्ये काही विशेष गुण असणे किंवा ती अध्यात्मिक असणे देखील आवश्यक असते. आणि ह्याच बाबी लक्षात घेऊन, आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल किंवा सवयींबद्दल सांगणार आहोत.
जर घरातील गृहिणीने, सूनेने देवी लक्ष्मींना प्रसन्न ठेवण्यासाठी काही सवयी आत्मसात केल्यास माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने योग्य ते फळ मिळते. संपूर्ण कुटुंबाला अनेक प्रकारचे आ र्थि क फायदे देखील होतात. जर एखाद्या सुनेमध्ये या सवयी नसतील, तर त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा.
पहिली सवय –
ज्या घरातील सून दररोज लवकर उठून स्ना न तथा आन्हिंक आवरुन पूजापाठ करते आणि घरात नेहमी हसत राहते, तसेच सकाळ संध्याकाळ देवघरात व तुळशीच्या जवळ दिवा लावते त्या घरात माता लक्ष्मींचे वास्तव्य चिरकाल असते.
यापैकीच प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे सांजवेळी दिवाबत्ती करणे, सांजवेळी दिप प्रज्वलित केल्यामुळे घरात आणि एकंदर सभोवतालच्या वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते.
आणि ही सकारात्मक उर्जा माता लक्ष्मींना सर्वाधिक आकर्षित करत असते. याचबरोबर घरातील सूनेने दर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मींसमोर शुद्ध तुपाचे दीप प्रज्वलन करावे.
असे रोज केल्याने आपल्याला माता लक्ष्मींचा आशीर्वादासह धन, दौलत, समृद्धी, आरोग्य तर लाभतेच पण आयुष्याला एक योग्य दिशा मिळण्यासाठी देखील मदत होते.
दुसरी सवय –
ज्या गृहिणी आपल्या घरातील स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेतात, किंवा ज्या घरात टापटीपपणा आणि नीटनेटकेपणा असतो जेथे स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली जाते, त्यां महिलांना माता लक्ष्मींचा आशीर्वाद हा मिळत असतो.
मित्रांनो, माता लक्ष्मींना स्वच्छ वातावरण नेहमीच आवडते. म्हणून, घरातील सुनेने स्वतःच्या तसेच आपल्या घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. त्याचप्रमाणे, देवतांचे देवघर किंवा देव्हारा हे सुद्धा नियमितपणे स्वच्छ केले गेले पाहिजे.
पूजेतील, इतर सणावाराला सुद्धा पावित्र्य टिकवून उपासना करावी, ज्यामुळे तुमच्यावरील माता लक्ष्मींचे प्रेम, आशिर्वाद कायम राहतील.
तिसरी सवय –
ज्या घरांमध्ये गृहिणी सकाळी सूर्योदयाच्यापूर्वी उठतात आणि संध्याकाळ च्या वेळेला कधीही झोपत नसतात त्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना सर्वप्रथम माता लक्ष्मींचा आशीर्वाद मिळत असतो.
आपल्या घरातील गृहिणींच्या या सेवाभावा मुळे आणि आराधनेमुळे एक अद्भुत उर्जा आसपास च्या वातावरणात तयार होत असते, तसेच यामुळे देवी लक्ष्मींचे वास्तव्य अधिक काळ आपल्या घरात टिकवून राहण्यासाठी मदत होते. गृहिणी द्वारे नित्यनेमाने केलेल्या उपासनेमुळे देवी लक्ष्मींपर्यंत तिची प्रार्थना लवकरात लवकर पोहचते.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!