घरातील या कोपऱ्यात कुणालाही नकळत अशा प्रकारे ठेवा फक्त एक लवंग.., अचानक होईल धनलाभ..!!

आपल्या स्वयपांक घरात वापरात येणाऱ्या लवंगचे आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्या उपायांमुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होणार आहेत. लवंगाला उर्जेचे वाहक असे मानले जाते म्हणूनच ऊर्जेला एका ठिकाणी वरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लवंग आपल्याला मदत करते.

तंत्र शास्त्रामध्ये अनेक विधी साठी, अनेक उपायांसाठी या लवंग चा उपयोग केला जातो. चला तर मग जाणून घेऊया महत्त्वाच्या अशाच काही उपायाबद्दल..

जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल परंतु आता हे ओळखायचे कसे , तर घरात गेल्यावर जर उत्साहीत वाटत नसेल, आपल्या घरामध्ये आपल्याला परकेपणाची भावना निर्माण होत असेल, अजुनही बरीच लक्षणं असू शकतात. तर लक्षात ठेवा काही बाहेरचे लोक आपल्या घरामध्येे येत असतात.

ते लोक येतांना आपल्या सोबत वेगवेगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा सुद्धा घेऊन येत असतात. हे लोक निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या सोबत असलेली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तशीच राहते.

आपल्या घरात अशाही काही वस्तू असतात ,ज्या वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या असतात त्यातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते.

या नकारात्मक उर्जेमुळे आपल्या घराची प्रगती होत नसते आणि अशा वेळी ह्या नकारात्मक ऊर्जेला घराच्या बाहेर काढणे खूपच महत्त्वाचे असते म्हणूनच याकरिता लवंग खूपच महत्त्वाची ठरू शकते. हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे. हा उपाय तुम्ही रविवार किंवा शनिवारी या कोणत्याही दिवशी करू शकता.

हा उपाय आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत, तीन-चार कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तीन मोठ्या विलायची घ्यायचे आहेत.

ही सगळी सामग्री आता एकत्र घेऊन एका वाटीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये घेऊन आपल्याला जाळायची आहे. त्यानंतर त्याचा जो धूर निघेल तो आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये पसरवायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक खोलीमध्ये हा धूर असलेली वाटी फिरवायची आहे.

हा छोटासा उपाय आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. याची जी राख शिल्लक राहील ती राख आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर शिंपडायचे आहे आणि याकरिता तुम्ही या राख मध्ये थोडेसे पाणीसुद्धा मिसळू शकता.

जर उपाय दर शनिवारी व रविवारी केल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास निर्माण होईल.अनेकांच्या जीवनामध्ये राहू-केतू दोष असतो. कुटुंबावर सातत्याने अपघात व अनेक समस्या येत राहतात.

जर तुम्हाला राहू केतूच्या दोषापासून मुक्तता मिळवायची असेल तर शनिवारी तुम्हाला लवंगाचे दान करायचे आहे. कोणताही गरिबाला व गरजवंताला हे लवंग दान करायचे आहे.

अनेकदा कोणीही दान स्वीकारणार नाही जर असे झाल्यास तर चिंता न करता कोणत्याही महादेवाच्या मंदिरा मध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवर दोन लवंग वाहा. जर तुम्ही लगातार ४० शनिवार हा उपाय केल्यास राहू केतूच्या दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळते आणि घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडू लागतात.

Leave a Comment