घरच्या घरी घट्ट आणि मलाईदार दही कसं बनवाल..?? येथे जाणून घ्या दही लावण्याची योग्य पध्दत..!!

मित्रांनो, उन्हाळ्यात दही खाण्याचा एक वेगळाच आनंद मिळत असतो. आपल्या आरोग्यासाठी दही खाण्याचे बरेचसे फायदे आहेत. दही साखर एकत्र किंवा रोजच्या जेवणाबरोबर सुद्धा तुम्ही दही खाऊ शकतात.

तसेच दह्याचा स्वादिष्ट रायता सुद्धा या दिवसात बहुतांश घरांमध्ये बनत असतो. आणि दही घरी बनवलेलं असेल तर त्याची चवही दुप्पट होते. घरी बनवलेल्या दह्यामध्ये एक वेगळाच गोडपणा व घट्टपणा असतो, परंतु बर्‍याचदा बाजारात मिळतं तसं दही घरी जमवणं फारच अवघड होऊन जाते.

त्याला कारण असे की त्या लोकांकडून दही एकतर व्यवस्थित गोठत नसते किंवा ते दही आंबट तरी होत नाही. बाजारात मिळणाऱ्या दह्यासारखं दही जमविण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत‌.

ज्यांच्या मदतीने आपण सहजपणे अगदी बाजारातल्या सारखं क्रिमयुक्त दही बनवू शकतात. चला तर मग मित्रांनो, जाणून घ्या बाजारात मिळणाऱ्या दह्याप्रमाणे दही बनविण्यासाठी काय करावे.

मित्रांनो, घरी दही तयार करण्यासाठी आपल्याला पूर्ण क्रिमयुक दुधाचा वापर करायचा आहे कारण, यामुळे दही अगदी मलईदार आणि गोड तयार होईल. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दही लावण्यासाठी योग्य भांड निवडायचं आहे.

मित्रांनो, तुमच्या घरात मातीची भांडी नसतीलच पण मातीच्या भांड्यात लावलेलं दही अगदी बाजारात लावलेल्या दह्यासारखं असतं. म्हणूनच जर कधी मातीच्या भांड्यात आपण दही लावलं तर अजूनच उत्तम. तुमच्या कडे मातीचे भांडे नसेल तर आपण मेटलचं एखादं भांड देखील वापरु शकतात.

तर यासाठी सर्वप्रथम आपण क्रिमयुक्त मलाईदार दूध घ्यायचे आहे. दही लावण्यापूर्वी आपण दुधाला अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने गरम करुन घ्यायचे आहे. मग नंतर गॅस थोडा बारीक करुन दहा मिनिटे तसेच दूधाला उकळी येऊ द्यावी.

नंतर दुधाचा फेस तयार झाल्यानंतर दूध गॅस वरुन उतरवून मातीच्या भांड्यात काढून ठेवा. ते दूध थोडंसं थंड झाल्यावर, त्यात तुम्ही आधीच काढून ठेवलेलं दह्याचं विरजण एक चमचा घाला. नंतर ते भांड न हलवता त्यावर प्लेट झाकून ठेवा.

मित्रांनो, उन्हाळ्यात दही जमविण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही संध्याकाळी दही लावावे. म्हणजे आपण संध्याकाळी 5 वाजता दही लावल्यास रात्री 11 पर्यंत ते गोठेलेलं असेल.

त्या नंतर ते दही न वापरता तसेच फ्रिजमध्ये ठेवून द्यायचे आहे. नंतर दुसर्‍या दिवशीच याचा वापर करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे घट्ट, स्वादिष्ट आणि गोड दही खायला तयार असेल.

मित्रांनो, साधारण दही सेट करण्यासाठी एक असं ठिकाण निवडा जेथे दही लावलेलं भांड बिलकुल हलणार नाही. तसेच, आपण जेव्हा दही स्टोअर करतात तेव्हा ते व्यवस्थित झाकून ठेवा कारण दही इतर खाद्यपदार्थाचा गंध लवकर शोषून घेत असते.

Leave a Comment