घरी या ठिकाणी लावा काळ्या घोड्याची नाल तुमची सर्व संकटं होतील झटक्यात दूर : शनीची कृपादृष्टी कायम राहील शनिदेव प्रसन्न होतील.!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो काळ्या घोड्याच्या नालेचे हे फायदे तंत्रशास्त्रात देखील सांगितले आहेत. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात काळ्या शक्ती किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे, तर वास्तुनुसार घरात घोड्याचा नाल लावणे शुभ आहे.

प्राचीन काळापासून काळ्या घोड्याच्या पायाला जोडलेली नाल विविध उपायांमध्ये वापरली जात आहे. ज्याप्रमाणे आपले आजी -आजोबा लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळा टिक्का लावतात, त्याचप्रमाणे लोकांच्या वाईट नजरेपासून घरे, दुकाने, मालमत्ता आणि व्यवसाय इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी काळ्या घोड्याच्या नालेचा वापर केला जातो.

शास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि त्या घरावर कायम शनिदेवाची कृपा राहते. कारण ज्योतिष शास्त्रानुसार काळ्या घोड्याच्या पायावर शनीचा विशेष प्रभाव असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काळ्या घोड्याची तीच नाल फायदेशीर असते जो घोडा खुप थकलेला असतो. कारण असे म्हटले जाते की शनिदेव कष्ट करणाऱ्यांवर अति प्रसन्न होतात. अशा कष्टाळू आणि खुप दूरवर जो जाऊन आलेला आहे अश्याच काळ्या घोड्याची नाल उपयुक्त असते.

तंत्र विद्येमध्ये असे मानले जाते की जर काळ्या घोड्याची नाल वापरली तर अशक्य देखील शक्य होते. तंत्रशास्त्रानुसार, जरी कोणत्याही घोड्याची नाल खूप प्रभावी असते, पण जर काळ्या घोड्याच्या पुढच्या उजव्या पायाची जुनी नाल असेल, तर ती अनेक पटींनी प्रभावशाली ठरते. होते. काळ्या घोड्याच्या नालेचे काही खात्रीशीर ज्योतिषीय उपाय जाणून घेऊयात.

व्यवसायात नुकसान होत असल्यास –
जर दुकान नीट चालत नसेल किंवा दुकानावर कोणी काळी जादु केली असेल तर दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर काळ्या घोड्याची नाल इंग्रजी U अक्षराप्रमाणे लावा. तुमच्या दुकानातील ग्राहकांची संख्या वाढू लागेल आणि परिस्थिती अनुकूल होईल. दुकानावरील जादूटोणा नाहीसा होऊन धंदा जोरदार चालेल.

शनीची साडेसाती झाली असल्यास –
शनी देवांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली असेल. त्यामूळे आपल्याला साडेसातीचा त्रास असेल तर कोणत्याही शनिवारी काळ्या घोड्याच्या नालेपासून बनवलेली अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये घातली पाहिजे. तुमच्यावरील संकट दूर होईल आणि शनिदेवाच्या साडेसाती पासून तुमची नक्कीच सुटका होईल आणि त्याचबरोबर धनप्राप्ती देखील होईल.

घरावर नकारात्मक शक्तीमुळे अवकळा आली असेल तर –
जर घरात नकारात्मक शक्ती वास करत असतील तर घरात कायम त्रास होत असेल, आर्थिक प्रगती होत नसेल किंवा जर कोणी काळी जादु केली असेल, तर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर काळ्या घोड्याची नाल इंग्रजी U अक्षराच्या आकारात लावावी. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन घरात सुखशांती नांदेल. सर्व अडचणी दुर होऊन आर्थिक भरभराट होईल. नालेच्या प्रभावामुळे सर्व काही ठीक होईल.

शनि दोष नाहीसा होतो –
काळ्या घोड्याची नाल घ्या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल घाला आणि ही नाल ​​त्यात टाका आणि त्यातेलात तुमचा चेहरा बघा आणि त्या झाडाखाली ठेवा. यामुळे शनि दोष नाहीसा होईल. शनिदेवाची कृपादृष्टी कायम राहील. आपल्या पैशाने काळ्या घोड्याच्या पायात नाल घालावी त्यामुळे देखील शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि भक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात.

धनधान्यात येईल बरकत –
काळ्या घोड्याची नाल काळ्या कपड्यात गुंडाळून धान्यात ठेवा, तर धान्य वाढते आणि जर ते तिजोरीत ठेवले तर आर्थिक लाभ होतो. घरात समृद्धी येते.

मोहरीच्या तेलात काळ्या घोड्याची नाल ठेवा –
लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात काळ्या घोड्याची नाल टाका. आता हे भांडे डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवा आणि निर्जन ठिकाणी पुरून टाका. यामुळे लागलेली नजर उतरून जाईल. जर शनि दोष असेल तर ते देखील कमी होईल. तुमचा लवकरच भाग्योदय होईल. आयुष्यातील वाईट काळ दूर होईल आणि तुम्ही वैभावशाली जीवन जगणार यात शंकाच नाही.

सर्व प्रकारच्या दुःखातून मिळेल मुक्ती –
आपल्या उंची एवढा काळा धागा घ्या आणि त्याला आठ ठिकाणी गाठण बांधा. हा धागा तेलात बुडवून काळ्या घोड्याच्या नालेवर गुंडाळून शमीच्या झाडाखाली पुरून ठेवा. हा उपाय सर्व प्रकारच्या दुःखांपासून तुमची सुटका करेल. हा एक अतिशय अचूक आणि प्रभावी उपाय आहे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment