Wednesday, December 6, 2023
Homeआरोग्यगुळवेलाचा या म'हामारीत करा अशाप्रकारे उपयोग, ९९% सं'क्रमण होणार नाही.

गुळवेलाचा या म’हामारीत करा अशाप्रकारे उपयोग, ९९% सं’क्रमण होणार नाही.

गुळवेल ही तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यात एकदम उत्कृष्ट असे साधन आहे. ज्यावेळी तुम्हाला कळते तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली आहे अशा वेळी तुम्ही रोज गुलवेली चा काढा घेत जा यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती ९९ % वाढते.

२१ व्या शतकाकडे वाटचाल करताना सुद्धा आयुर्वेदिक औषधी वनस्पती विज्ञानावर आपलं वर्चस्व निर्माण करताना दिसत आहेत, याचं मुख्य कारण म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतींचे कुठलेही दुष्परिणाम तुम्हाला आढळून येत नाहीत जे इतर केमिकल्स ने बनवलेल्या औषधामध्ये आढळून येतात, आपण अशीच एक औषधी वनस्पती गुळवेल बाबत आज आपण वाचणार आहोत तसेच तिचा वापरा बद्दल विश्लेषण करणार आहोत.

गुळवेल म्हणजे काय..??

आयुर्वेदिक वनस्पती गुळवेल चे साइंटिफिक नाव आहे, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिआ , संस्कृत मध्ये गुळवेल ला गुडूची असे देखील म्हणतात, गुळवेल मुख्यत: भारतीय उपखंडात सापडणारी औषधी वनस्पती आहे. गुळवेलला हिंदी मध्ये गिलोय असे म्हटले जाते. हिं’दू पुराणानुसार ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की अशी वस्तू जी अमृतासारखी आहे व सजिवांना वृद्धाअवस्थेतून तरुण बनवते.

गुळवेल चे महत्वं –

मधुमेह विरोधी –
गुळवेलच्या झाडाचे खोड मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, गुळवेल ऑक्सिडीटीव्ही ताण कमी करून शरीरातील इन्सुलिन वाढवते तसे शरीरात बनणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी करते.

वि’षाक्त- विरोधी प्रभाव –
गुळवेल शरीरातील थिओबार्बीचुरिक ऍसिड रिएक्टिव पदार्थांची पातळी कमी करून संरक्षणात्मक परिणाम दाखवते.

संधिवात व अस्थीरोगात गुणकारी-
गुळवेल व आलं संधीवतामध्ये अत्यंत गुणकारी आहे. वर्षानुवर्षे गुळवेलाला संधीवतामध्ये वापरले जात आहे.
गुळवेल हाडांमध्ये ऑस्टिओब्लास्ट वाढवून हाडांना बळकटी आणते, ज्यामुळे बोन मॅट्रिक्समध्ये जास्तीत जास्त खनिज जमा होऊन अस्थीरोगात ढिसुळ झालेली हाडे जास्तीत जास्त भरीव होतात.

कर्करोगविरोधी प्रभाव –
गुळवेलाच्या कर्करोगाविरोधी असलेला प्रभावावर जगभर रीसर्च चालू आहे व बऱ्याच संशोधकांनी गुळवेल चा कर्करोग विरोधी प्रभाव मान्य सुद्धा केला आहे.
गुळवेल शरीरातील टीशूंचे वजन वाढवते तसेच कर्करोगामुळे नष्ट व परिणाम झालेल्या शरीरातील टिशुंचे पुनर्नर्मिती करते.

जंतुनाशक –
गुळवेल हा अनेक किटाणू विरोधात गुणकारी आहे, अनेक हा’निकारक किटाणू श्वसन मार्गातून शरीरात जातात व भ’यानक रो’गांच उत्पादन करतात,गुळवेल श्वसण मार्गात होणाऱ्या सर्व आ’जारांवर अतिशय परिणामकारी आहे.

अँटी ऑक्सिडन्ट –
शरीरातील बऱ्याच पेशी आपल्याला ह्रदयविकार, कर्करोग व इत्यादी प्राणघातक रोगांमध्ये सुरक्षा देण्याचे काम करतात, गुळवेल अँटी ऑक्सिडन्ट असल्याकारणाने ते शरिरातील पेशींची हानीकारक रॅडिकल्स पासून सुरक्षा करते.

त्वचारोगांवर रामबाण –
गुळवेलमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात जे त्वचा उजलायला व त्वचेवरचे काळे डाग, पिंपल्स, मुरूम, वयामुळे पडलेल्या चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी करून आपल्या तरुन वयात असलेली ताजी तवान त्वचा परत देते.

गुळवेलाचे केसांवरील लाभदायक परिणाम –
गुळवेल मध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म असतो जो केसांच्या टिशुंचे संरक्षण करून केस मजबूत होण्यासाठी मदत करतो तसेच गुळवेलाच्या काढ्याचे रोज सेवन केल्याने केसांची वाढ होते व केस गळायचे कमी होतात

गुळवेलचे आर्युवेदामध्ये सांगितलेले उपयोग – आयुर्वेदामध्ये गुळवेल हा ताप, कावीळ,जुलाब,अतिसार,कर्करोग, जंतुनाशक, हाडांचे फ्रॅक्चर, अस्थीरोग, संधिवात, दमा, त्वचेचे रोग, दमा, सर्पदंश इत्यादी रो’गांमध्ये गुळवेलाचा वापर केला जातो.

इतर भाषांमध्ये गुळवेल ला काय म्हणतात –

संस्कृत- गुडूची, अमृत, अमृतावली, मधूपर्णी, गुडुचिका, तंत्रिका, कुंडलिनी, चक्रालक्षणिक
मराठी- गुळवेल
बंगाली- गुलंचा
हिंदी- गिलोय, गुर्चा
गुजराती- गारो, गलक
तेलुगू- ठिप्पाटीगा
कन्नड- अमृतावली
कश्मिरी- अमृत, गिलो
मल्लू- चिथामृतू
तमिळ- सिंडल, सिंडल कोडी
इंग्रजी- मूनसिड, टिनोस्पोरा

गुळवेल व कडुलिंबाचा काढा कसा बनवावा??

साहित्य
१ इंच आले
६-७ कडुलिंबाची पाने
७-८ तुळशीची पाने
५ लवंग
६ काळीमिरी
२ लहान गुळवेल च्या फांद्या

कृती –
सर्वप्रथम गुळवेल च्या फांद्या सोलुन बारीक करून घेणे
सर्व साहित्य एकत्रित करून त्यांना मिक्सर मध्ये बारीक करणे.
वरील तयार केलेली पेस्ट गरम तव्यावर घालून त्यात दोन ग्लास पाणी घालून उकडून घ्यावी, साधारण अर्धे पाणी कमी झाल्यावर हा काढा गाळून घ्यावा,
रोज नियमितपणे काढ्याचे सेवन केल्याने अनेक आजार होण्यापूर्वीच नष्ट होतात.

टिप – आम्ही आयुर्वेदातील माहीतीच्या आधारे या लेखातून उपाय सांगितले आहेत, कोणत्याही प्रयोगापूर्वी तुम्ही जाणकारांचा सल्ला जरुर घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स