Friday, December 8, 2023
Homeअध्यात्मगुरु प्रतिपदा रविवार सोमवार मंगळवार गुरुचरित्राचे हे दोन अध्याय मनोभावे वाचा.. हा...

गुरु प्रतिपदा रविवार सोमवार मंगळवार गुरुचरित्राचे हे दोन अध्याय मनोभावे वाचा.. हा नैवेद्य दाखवायला विसरु नका…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! सर्व दत्त भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुप्रतीपदा.. याच दिवशी दत्त भक्तांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी शैल गमन केले होते. महाराज गाणगापूर सोडून कर्दळी वनात लुप्त झाले होते म्हणून हा दिवस आपणा स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

पंधराशे अठ्ठावीस च्या कालखंडात कारंजा विदर्भ येथे श्री गुरुदेव दत्त आणि एक आगळावेगळा अवतार घेऊन ते आपल्यासाठी श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणून श्री गुरुदेव दत्ताचे दुसरे अवतार म्हणून प्रकट झाले.

महाराजांनी सर्व भारत भ्रमंती करून श्रीक्षेत्र गाणगापूर येथे वास्तव करून येथे श्रीक्षेत्र निर्मिती केली. महाराजांनी शैल्य गमन साठी जाताना आपल्या पादुका भक्तांसाठी तेथेच ठेवलेल्या आहेत त्यामुळे या दिवशी आपण गुरुप्रतिपदा दिवस साजरा करत असतो.

याचे आणखीन एक महत्त्व म्हणजे जैतून महाराज कर्दळी वनात लुप्त झाले तेथूनच श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले त्यामुळे या अति पवित्र दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून देवघरासमोर श्री दत्ताची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर बसून गणपतीची आरती करायची आहे.

त्यानंतर श्री स्वामी समर्थांची यांची आरती करायची आहे आणि त्यानंतर गुरुदेव दत्तांची आरती करायची आहे. त्यानंतर गुरुचरित्रातील 51 आणि 52 वा अध्याय मनोभावे वाचायचा आहे. त्यानंतर घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य आणि बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे.

गाणगापूर सोडताना भक्तांनी सरस्वती महाराज यांना बेसनाचे लाडू दिले होते त्यामुळे बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवून तो देवासमोर दत्त महाराजांच्या समोर 24 तास ठेवून दुसऱ्या दिवशी ग्रहण करायचा आहे आणि घेवड्याचा नैवेद्य दाखवून तो त्याच दिवशी खायचा आहे.

हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. दत्तभक्तांसाठी स्वामी समर्थ भक्तांसाठी ही एक पर्वणी आहे. तसेच सर्वांनी या दिवशी दत्त महाराजांची पूजा आरत्या केल्यामुळे याचे फळ खूप चांगल्या प्रकारे मिळते. घरातील वातावरण आनंदी राहते. या दिवशी हा प्रयोग किंवा विधी केल्यामुळे आपल्यावरील दत्त कृपा सदैव बाराही महिने राहते.

थोडक्यात आयुष्यभर श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. वाईट शक्ती घरातून निघून जाते. घरातील अडचणी दूर होतात. आपल्या घरावर किंवा स्वतःवर जर कोणी वाईट शक्तीचा प्रयोग केला असेल तर ती देखील त्वरित निघून जाते.

काही वाईट लोक आपले वाईट चिंतेत असतात त्यामुळे करणी बाधा कोणत्याही वाईट शक्तीचा प्रयोग आवर्जून करतात तर या दिवशी दत्त महाराजांची पूजा विधी केल्यामुळे ही सर्व संकट निघून जातात. नोकरी व्यवसायामध्ये बरकत मिळते. नवरा बायको मध्ये प्रेम वाढते.

आर्थिक प्रगती होते. पैशाची अडचण निर्माण होत नाही. पैशाची अडचण न निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पैशाच्या उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे आर्थिक अडचण न भासता पैशाची इतकी भरभराट होते की ज्यावर आपला विश्वास सुद्धा बसत नाही.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स