Guru Rahu Chandra Yuti महा शुभ संयोग.. मेष राशीत राहु, गुरु आणि चंद्र येणार एकत्र.. पुढील दोनच दिवसात होणार उलथापालथ..

Guru Rahu Chandra Yuti महा शुभ संयोग.. मेष राशीत राहु, गुरु आणि चंद्र येणार एकत्र.. पुढील दोनच दिवसात होणार उलथापालथ..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची राशीचक्रातील स्थिती खूप काही सांगून जाते. (Guru Rahu Chandra Yuti) मेष राशीत सध्या गुरु आणि राहु हे दोन ग्रह एकत्रित आहेत. त्यामुळे चांडाळ योगाची स्थिती आहे. दुसरीकडे, चंद्र वेगाने प्रवास करत या राशीत येणार आहे. त्यामुळे मेष राशीत सव्वा दोन दिवसांसाठी त्रिग्रही योग तयार आहे. गुरु, राहु आणि चंद्र यांची युती मेष राशीत होणार आहे. तीन ग्रहांच्या युतीमुळे दोन अशुभ आणि एक शुभ योगाची स्थिती निर्माण होणार आहे. गुरु आणि राहुच्या युतीमुळे चांडाळ योग, चंद्र आणि राहुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होणार आहे. तर चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे शुभ असा गजकेसरी योग तयार होणार आहे.

ग्रहांची कशी असेल स्थिती – ग्रहण योग आणि गजकेसरी योग हा सव्वा दोन दिवसांसाठी असणार आहे. तर 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहु मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. (Guru Rahu Chandra Yuti) त्यानंतर चांडाळ योग संपुष्टात येणार आहे. 10 जुलै 2023 रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी प्रवेश करेल. चंद्र या राशीत 13 जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहतील.

या राशींच्या जातकांना पुढच्या दोन दिवस बसेल फटका..

सिंह रास – या राशीच्या जातकांना सव्वा दोन दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून त्रास होऊ शकतो. शत्रूपक्ष या स्थितीचा फायदा उचलू शकतात. आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने अडचणींचा डोंगर उभा राहील. व्यवसायिकांनाही या काळात मोठा फटका बसू शकतो. अशा स्थितीत गुंतवणूक करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

हे सुद्धा पहा : Sun Transit In Punarvasu Nakshatra सुर्यदेवांचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश.. या राशींसाठी प्रगतीचा काळ..

तूळ रास – या राशीच्या जातकांनीही सव्वा दोन दिवस काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. त्यामुळे गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कौटुंबिक पातळीवर काही वाद होऊ शकतात. (Guru Rahu Chandra Yuti) त्यामुळे वैवाहिक जीवनात काही अडणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

धनु रास – गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात हाती काहीच लागणार नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अपयश हाती पडू शकतं. कौटुंबिक पातळीवर काही कारणावरून वादाची ठिणगी पडू शकते. आर्थिक स्थिती या काळात ढासळलेली राहील. (Guru Rahu Chandra Yuti) प्रवास करणं या काळात टाळलं तर योग्य राहील.

वृश्चिक रास – या राशीच्या जातकांवर ग्रहांचा संमिश्र प्रतिसाद असेल. अशुभ योगामुळे अडचणींचा सामना करावा लागेल. तर गजकेसरी योगामुळे काही अडचणींतून मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी वाद होईल असं वागू नका. देवाणघेवाण करताना काळजी घ्या. अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. (Guru Rahu Chandra Yuti) वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!