Friday, December 8, 2023
Homeअध्यात्मगुरुपौर्णिमा का साजरी केली जाते..?? गुरुदक्षिणा देण्याची प्रथा कशी पडली..??

गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते..?? गुरुदक्षिणा देण्याची प्रथा कशी पडली..??

मित्रांनो, ‘गुरुचरित्र’ या ग्रंथात श्री गुरुंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितलेले आहे. कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ, या शब्दाची व्याप्ती विचारली तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप.. तर गुरुंची आपल्या आयुष्यातील व्याप्ती इतकी अगाध आहे..

तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो.

गुरू- म्हणजे आपल्याल्या अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून जे आपल्याला ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते गुरु..!!!

गुरु पौर्णिमेचे महत्व –

आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या गुरुंची पूजा करण्याचा दिवस. यावर्षी हा दिवस 23 जुलै रोजी येणार आहे. महाभारताचे लेखक महर्षि वेद व्यास यांच्या वाढदिवसानिमित्त या पौर्णिमेला व्यास पूर्णिमा असे देखील म्हणतात.

असे मानले जाते की या दिवशी भगवान बुद्धांनी प्रथमच प्रवचन दिले होते. या दिवशी गुरुंची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. त्याचे चरणपूजन करून त्याचे आशीर्वाद घेतले जातात. बर्‍याच ठिकाणी मुलांचे शिक्षणदेखील या दिवसापासून सुरू करण्यात आलेले असते.

गुरुंची पूजा कशी करावी –

या दिवशी शिष्याने स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गुरुंची पूजा करायला पाहिजे. त्यांच्या साठी फुलांची आरास करावी, कापूर दिव्याने आरती करावी आणि नारळ, कपडे, मिठाई इत्यादी अर्पण करावेत. त्यांचे पाय स्वच्छ धुवून चरणमृत स्वरूपात प्यावे.

या पूजेमध्ये शक्यतोवर पांढरे, पिवळे किंवा हलके रंगाचे कपडे घालायला हवे. जर तुम्हाला प्रत्यक्षात गुरूंची पूजा करण्यासाठी जाता येत नसेल तर खऱ्या गुरुंचे स्मरण करुन त्यांच्या आदर्शांचा विचार करून त्यांच्या प्रतिमेची पूजा केली तरीही चालते.

दुसरीकडे, जर तुम्हाला अद्याप कोणतेही उचित गुरु मिळाले नसतील तर आपण आपली प्रतिष्ठित देवता किंवा भगवान शिव किंवा भगवान कृष्ण यांना आपला गुरु बनवू शकतात. आपण एखाद्या गुरुप्रमाणे त्यांची उपासना करू शकतात.

हे आहेत गुरुंच्या पूजेचे फायदे –

ज्योतिषशास्त्रात, बृहस्पतिला विस्ताराचा कारक ग्रह मानला जातो. एखाद्याला जर गुरुचा आशीर्वाद मिळाला तर धन आणि संपत्तीसह आनंदी आयुष्य मिळण्यास काहीच हरकत नाही. गुरूच्या पूजेमुळे दुष्ट ग्रहांचे वाईट परिणामही संपतात.

त्यातूनच आयुष्यात चांगली स्थिती सुरू होते किंवा नवीन पर्व सुरु झालेले असते. गुरुपूजनामुळे शा-रीरिक तसेच आध्यात्मिक फायदे देखील होतात.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स