गुरूपुष्य योग धनधान्य, ऐश्वर्यप्राप्ती साठी.. आज हे विशेष उपाय जरुर करा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. ज्योतिषशास्त्रात गुरु पुष्य योगाचे विशेष महत्व आहे. कारण हा योग विशेष आणि चांगले फळ देणारा मनाला जातो. 30 जून 2022 गुरुवार वर्षाचा पहिला गुरु पुष्य योग आहे. ज्योतिषशास्त्रातील सर्वात श्रेष्ठ व दुर्लभ योगांपैकी हा एक योग आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा गुरु बृहस्पतीला पुष्य नक्षत्राचा देवता मानले गेले आहे. गुरुवार आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगाने झालेला हा शुभ योग आपल्याबरोबर अनेक शुभ योग घेऊन येत आहे.

पौष पौर्णिमेला असलेला हा गुरु पुष्य योग हा धर्म व धन वृद्धीसाठी अतिशय शुभ आहे. गुरु पुष्य योगाबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व अनेक पटींनी वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दुर्लभ संयोगात तुम्ही धन प्राप्तीसाठी काही उपाय केलेत तर तुम्ही यशस्वी होण्याचे संकेत आहे.
​धन प्राप्तीचा योग

धन प्राप्तीचा योग आहे – आज गुरुपुष्य संयोगात लक्ष्मी नारायणाच्या पूजेबरोबर महालक्ष्मीला कमळाचे फुल आणि पांढरी मिठाईचे अर्पण करा. ‘ओम श्रीं ह्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धि देहि देहि नम:’ या मंत्राचा कमळाच्या माळेबरोबर 108 वेळा जप करा. या शुभ योगात लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्याने धन प्राप्तीचा योग प्रबळ होईल.

घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह व रांगोळी काढा. त्यानंतर दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करून त्यावर लक्ष्मी मंत्र लिहा. असे करणे धनवृद्धीदायक मानले जाते. यामुळे अडकलेले धन प्राप्त होईल. भगवान विष्णूचे शस्त्र असल्याकारणाने हा शंख मंगलमय मानला जातो. यामुळे कर्ज व आजारासंबंधित असणारी आर्थिक विवंचना संपुष्टात येईल.

​ग्रह-नक्षत्र देतील शुभ योग – गुरु पुष्य योगाच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांचा मुलगा गणेश यांची सुद्धा पूजा-अर्चा केली पाहिजे. मंदिरात जाऊन साफ-सफाई केली पाहिजे. असे केल्याने शुभ ग्रहांची शांती होते आणि त्यामुळे शुभ संकेत मिळतात. सोबत कामात येणारे अडथळे दूर होतात तसेच मानसिक शांती मिळते. या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तूंचे दान करू शकता. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी द्या.

गुरूला शुभफलदायी करा – जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरु दोष असेल तर ब्रम्ह मुहूर्तावर उठून अंघोळ करून ध्यान करा आणि भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करा. केसर आणि चण्याच्या डाळीचे सेवन करा. सोबत कपाळावर केशरी टिळा लावा. लक्षात ठेवा की, या दिवशी कोणाकडूनही उधार घेऊ नका व देऊ नका. असे मानले जाते की, कुंडली मध्ये गुरूची स्थिती चांगली नसल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

​ऐश्वर्यवृद्धी होईल – गुरु पुष्य योगाच्या दिवशी लाल गायीला गुळ आणि गोड पोळी खायला द्या. असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. सोबतच या शुभ संयोगात धन-धान्य वृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करणे चांगले मानले जाते. यामुळे फक्त चांगले परिणाम मिळतात एवढेच नव्हे तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि ऐश्वर्यवृद्धी होते.

​देवी लक्ष्मींचा आशीर्वाद – ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ दिवशी लक्ष्मी स्तोत्र व कनकधारा स्तोत्र याचे वाचन करा. ते कल्याणकारी मानले जाते. या स्तोत्राचे वाचन केल्याने व ऐकल्याने धन-धान्याची कमतरता होत नाही आणि आपल्या आसपास सकारात्मक उर्जेचा वावर वाढतो. दररोज याचे वाचन केल्याने वैभव-ऐश्वर्य वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढीस लागते. याचे वाचन केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

Leave a Comment