गुरुवारी चुकूनही ही कामं करु नये, आयुष्यभर भोगावे लागतील परिणाम..!!!

नमस्कार मित्रांनो..,
आठवड्यातील गुरुवार हा दिवस ज्ञान आणि संतान यासाठी कारक असा दिवस असतो. पुराणातील मान्यतेनुसार असेही म्हटले जाते की गुरुवारच्या दिवशी अशी काही खास कामे करु नये. कारण असे केल्याने आपल्या कुंडलीतील बृहस्पति या ग्रहाची स्थिती कमजोर ठरते.

तसेच आपल्या जन्मकुंडली मधील अशा कमजोर गुरूमुळे लोकांना मुले, ज्ञान, पैसा इत्यादी बाबतच्या समस्यांचा सामना करावा लागतो. याउलट गुरुवारी अशी काही कामं आहेत जी केल्याने गुरु बृहस्पतीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो.

आणि आयुष्यात धन, ज्ञान आणि आरोग्याशी सं-बंधित फायदे सुद्धा मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात गुरुवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी करण्याचे टाळायचे आहे आणि कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत.

महिलांनी गुरुवारी या चुकूनही या गोष्टी करु नयेत –

मित्रांनो, अशी मान्यता आहे की गुरुवारच्या दिवशी महिलांनी आपले डोके धुऊ नये किंवा डोक्यावरून पाणी घेऊ नये. त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी केस देखील कापू नयेत.

जर त्यांनी तसे केलेच तर असे त्यांच्या कुंडलीतील गुरू ग्रहाची स्थिती कमजोर होत असते. तसेच असे होणे त्यांच्या विवाहित आयुष्यात अडचणी निर्माण करत असते. परिणामी नवरा आणि मुलांचीही प्रगती थांबून जाते.

गुरुवारच्या दिवशी दाढी करु नये किंवा नखंही कापू नये –

गुरुवारच्या दिवशी चुकूनही नखं कापू नये, दाढी सुद्धा करु नये. कारण शास्त्रात असे म्हटलेले आहे की जो व्यक्ती असे वागतो त्यांच्या पदरात देवगुरु बृहस्पती अशुभ लाभ देत असतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावरही याचा नकारात्मक प्रभाव पडत असतो.

गुरुवारच्या दिवशी केळीचे सेवन करण्याचे टाळावे –

गुरुवारच्या दिवशी चुकूनही केळी खाऊ नये. कारण या दिवशी केळीच्या झाडाचे पूजन करण्याची एक जुनी प्रथा आहे. याचबरोबर गुरुवारी घरात जास्त वजनवाले कपडे धुऊन, घरातील भंगार बाहेर काढणे, घरातील लादी धुणे, यामुळे घरातील लहान मुलांचे शिक्षण, धर्म इत्यादींवर होणारे शुभ परिणाम कमी कमी होत जातात.

विवाहित जीवनात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी करावे हे उपाय –

गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाला पाणी घालवे आणि तेथे शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुंच्या 108 नावांचा जप करावा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होत असतात.

गुरुवारच्या या वस्तूंचे दान करा –

बृहस्पतिदेव यांना पिवळा रंग खूप प्रिय आहे. ते पिवळ्या रंगाचे पीतांबर घालतात. म्हणून त्यांच्या पूजेमध्ये नेहमी हळदीचा वापर केला जातो.

गुरुवारी केशर आणि पिवळ्या चंदनाचे किंवा हळदीचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात आनंद आणि शांतता कायम राहते.

टीप : वर दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा..!!

Leave a Comment