हा आहे नीता अंबानींचा खाजगी मेकअप आर्टिस्ट, अनेक सेलिब्रिटींची सुद्धा पहिली पसंती.. घेतो एवढं मानधन की आकडा बघून चकित व्हाल…

अंबानी कुटुंबाने केवळ भारतातच नाही तर जगभरात आपले खास स्थान निर्माण केले आहे. यामुळेच त्याच्या बातम्या आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अंबानी कुटुंब अशी निगडित अगदी छोटीशी गोष्ट देखील मोठी बातमी बनते त्यातल्या त्यात मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या तर कायमच प्रकाश झोतात असतात.

त्याच्या लक्झरी लाइफबद्दल सर्वांनाच माहिती आहे. नीता अंबानी दर महिन्याला कोट्यवधी रुपये फक्त त्यांची जीवनशैली सांभाळण्यासाठी खर्च करतात. नीता अंबानी कोणत प्रोडक्ट्स आणि वस्तूवापरतात आणि त्यांच्या किंमती काय आहेत हे जाणून घेण्यासाठी लोकांना नेहमीच उत्सुकता असते.

अलीकडच्या काही दिवसांपासून नीता अंबानी यांच्या मेकअप मॅनच्या पगाराबद्दल सोशल मीडिया वरती जोरदार चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीता अंबानीच्या मेकअप मॅनचा पगार सामान्य घरांमध्ये लग्नाच्या खर्चाइतका आहे किंवा त्या रकमेने ते एका छोट्या शहरात घर खरेदी करू शकतात.

तसे तर नीता अंबानी यांच्या प्रत्येक वस्तूंची किंमत लाखच नाही तर कोटींच्या घरात आहे. काहीच दिवसांपूर्वी नीता अंबानी यांनी सुंदर अशी एक पैठणी परिधान केली होती. सांगितले जात की त्या पैठणीची किंमत 95 लाख रुपये होती. यासोबतच त्या आपले दागिने, घड्याळ आणि महागड्या बॅग्स वरती देखील बक्कळ पैसा खर्च करतात.

मात्र या सर्वांसोबत कायमच त्या एखाद्या बॉलीवूड सेलिब्रिटी प्रमाणे सुंदर दिसत असतात. इतक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी त्या आपल्या मेकअपमन ला गडगंज असा पगार देतात. खरे तर नीता अंबानी यांच्या मेकअप आर्टिस्टचा पगार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो कोण आहे आणि त्याचा पगार किती आहे हे देखील जाणून घेऊया.

नीता अंबानी भारतातील सर्वात स्टायलिश व्यावसायिक महिलांपैकी एक आहेत. कार्यक्रम असो किंवा वैयक्तिक कार्यक्रम, नीता अंबानी नेहमीच सुंदर दिसतात. नीता अंबानींना अधिक सुंदर बनवण्यासाठी मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर खूप मेहनत घेतात, असं म्हटलं जातं.

मिकी कॉन्ट्रॅक्टर हा एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे ज्याने दिल तो पागल है, कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम सारख्या चित्रपटांमध्ये स्टार्ससाठी अनेक लूक तयार केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील मिकी कॉन्ट्रॅक्टरची एका दिवसाची फी 75 हजार ते 1 लाख रुपये आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्ही त्याच्या 30 दिवसांच्या पगाराचा म्हणजेच 1 महिन्याच्या पगाराचा अंदाज लावला तर तो जवळपास 30 लाख होतो, जो एखाद्या कंपनीत मोठ्या पदावर काम करणाऱ्या लोकांचा वार्षिक पगार असतो.

Leave a Comment