हडप्पा संस्कृतीतील लोक उच्च प्रथिने असलेले लाडू खायचे, जे देशी अलग अलग धान्यांना , एकत्र मिसळून लाडू बनवले जायचे.
प्रथिने हा एक समृद्ध आहार आहे प्रथिन्यांचं महत्त्वं यावरून दिसून येतं की हडप्पा संस्कृतीत राहणारे लोक वेगवेगळ्या धान्यामध्ये मिसळून बनविलेले प्रथिनेचे लाडू खात असत.
एका संशोधनातून असे दिसून आले आहे की हडप्पा सभ्यतेत राहणाऱ्या लोकांनी सुमारे ,4000 वर्षांपूर्वी आहारात उच्च प्रथिने, मल्टीग्रेन अह्सलेले ‘लाडू’ खाल्ले होते. राजस्थानमध्ये उत्खननाच्या दरम्यान सापडलेल्या साहित्याचा वैज्ञानिक अभ्यास केल्याने हे उघड झाले आहे. लखनऊ आणि पुरातत्व सर्वेक्षण भारतीय संस्था (एएसआय), नवी दिल्ली, बीरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलायोसायन्स (बीएसआयपी) यांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे. तसेच, हा अभ्यास नुकताच ‘जर्नल ऑफ अरियोलॉजिकल सायन्स: रिपोर्ट्स’मध्ये सुद्धा प्रसिद्ध झाला आहे.
2014 आणि 2017 च्या दरम्यान, पश्चिम राजस्थानमधील बिनजोर (पाकिस्तान सीमेजवळ) हडप्पा पुरातत्व जागेच्या उत्खननात 2017 मध्ये अशा प्रकारचे सात लाडू सापडले होते.
बीएसआयपीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेश अग्निहोत्री म्हणाले, “उत्खननाच्या दरम्यान सात समान आकाराचे तपकिरी ‘लाडू’, बैलांचे दोन शिल्प आणि एका हाताने तांबं या धातूपासून बनलेली अज (लाकूडकापण्यासाठी किंवा कुऱ्हाडी सारखी दिसणारी वस्तू) हे सर्व राजस्थानमधील अनुपगड जिल्ह्यातील हडप्पा या साइट वर उत्खननात सापडलं होतं.
सन 2600 च्या सुमारास हे लाडू चांगले संरक्षित असल्याचे आढळून आले कारण त्यावर एक कठोर संरचना ( भिंत छत इत्यादी..) कोसळली होती .. त्यामुळे त्यांच्यावर एक छप्पर तयार झालं आणि ते तुटण्यापासून त्या़चा बचाव झाला. या लाडूंचा गाळाशी संपर्क आल्याने, काही अंतर्गत सेंद्रिय पदार्थ आणि इतर हिरव्या घटकांमुळे ते संरक्षित केले गेले.
ते म्हणाले की या ‘लाडूं’ बद्दलची सर्वात विचित्र गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा त्या लाडूंचा पाण्याशी संपर्क आला तेव्हा तेव्हा ते जांभळे झाले.
आता एएसआयने वैज्ञानिक विश्लेषणासाठी लाडूचे नमुने बीएसआयपीकडे दिले आहेत.
अग्निहोत्री म्हणाले, “आम्हाला सुरुवातीला ते मांसाहारी अन्न असल्याचे समजले.” तथापि, बीएसआयपीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अंजुम फारुकी यांनी केलेल्या प्राथमिक सूक्ष्मदर्शी तपासणीत ते बार्ली, गहू, चणा आणि काही तेलबियापासून बनविलेले आढळले. “
सुरुवातीच्या सिंधू खोऱ्यातील लोक प्रामुख्याने शेती करणारे असल्याने, तेव्हा लाडू मुख्यतः शाकाहारी पदार्थात उच्च खाद्य सामग्रीसह बनविलेले होते.
त्या लाडूंमध्ये उच्चप्रतिचे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम स्टार्च आणि प्रथिने असल्याचे निश्चित केलं गेलं.
शास्त्रज्ञ म्हणाले की, “या लाडूंमध्ये इतर धान्य आणि डाळी होत्या, परंतु मुगाची डाळ ही जास्त प्रमाणात सापडली.”
दोन संस्थांमधील नऊ वैज्ञानिक आणि पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने असा निष्कर्ष काढला की सात लाडूंचा वापर असं दर्शवितो की हडप्पा येथील लोक हा लाडू अर्पण करून, विधी करायचेत अगदी प्रसादासारखं आणि त्वरित पोषण आहारासाठी बहु-पौष्टिक म्हणून हे लाडू खात असत.
या सात खाद्यपदार्थाच्या शेजारी बैलच्या मूर्ती, अलंकार आणि हडप्पाचा शिक्का अस्तित्त्वात असल्याचे सूचित होते की मानवांनी या सर्व वस्तूंना उपयुक्तता आणि महत्त्व म्हणून मानले.