हळद, चंदन आणि कुंकवाचा टिळक लावल्याने अनेक आजार होतील बरे…!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, कपाळावर टिळक लावणे हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे मानले जाते. हिंदू धर्मात, पूजा किंवा कोणत्याही शुभ कार्यानंतर टिळक निश्चितपणे लावला जातो. टिळकाचे अनेक प्रकार आहेत जसे की चंदन, हळद, कुंकू आणि भस्म, प्रत्येक प्रकारच्या टिळकांचे वेगवेगळे फायदे आहेत.

तसेच टिळकाचे अजुनही काही प्रकार आहेत. जसे की लांब टिळक, गोल टिळक, तीन आडव्या रेषांचा टिळक इत्यादी. भगवान शिवाचे भक्त त्रिपुण्ड टिळक लावतात. तर शक्तीची साधना करणारे गोलाकार ठिपक्यासारखा टिळक लावतात. असे म्हणतात की कोणतीही पूजा कपाळावर टिळक न लावता अपूर्ण मानली जाते. म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यात कपाळावर टिळक लावण्याची परंपरा आहे. टिळक लावण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया…

टिळक लावण्याचे फायदे – वैज्ञानिक तर्कानुसार मानव शरीरात डोळ्यांच्या मध्यभागी कपाळावर एक नस असते. जेव्हा कपाळवर टिळक लावण्यात येतो तेव्हा त्या नसेवर दबाव वाढतो ज्याने नस सक्रिय होते आणि त्याचा सकारात्मक प्रभाव चेहर्‍याच्या स्नायूंवर होतो तसेच र क्त संचार देखील सुरळीत होतो ज्याने ऊर्जेचा संचार होतो आणि सौंदर्यात वाढ होते. धार्मिक दृष्ट्या भृकुटीमध्यात अर्थात दोन्ही भुवयांच्या मधोमध आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वर वास करतो. म्हणून कपाळावर टिळक करणे म्हणजे देव पूजनासाखरे आहे.

1) कपाळावर लाल रंगाचे टिळक लावल्याने शरीरात ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे पूजेनंतर सर्वात जास्त प्रमाणात लाल रंगाचे टिळक लावले जाते. कपाळावर कुंकवाचा टिळक लावल्याने देवीची विशेष कृपा प्राप्त होते.

तुमची इच्छा असल्यास, शुक्रवारी देवी लक्ष्मीला अर्पण करण्यासह तुमच्या कपाळावर लाल कुंकूचा टिळक लावावा. यामुळे तुमचा ताण कमी होऊन तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वादही मिळतील. याशिवाय तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि भौतिक सुखसुविधा वाढतात. लाल रंग उर्जेशी संबंधित आहे.

लाल टिळक मन शांत ठेवते आणि आत्मविश्वास वाढवते. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्य आणि सौभाग्यासाठी कपाळावर कुंकू लावतात. स्त्रियांनी स्वतःला कुंकू लावताना अनामिकेने, तर दुसर्‍या स्त्रीला किंवा पुरुषाला कुंकू लावतांना मध्यमेने लावावे. टिळक मेंदूला शांतता प्रदान करते, ज्यामुळे निद्रानाश, चिडचिडेपणा सारख्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.

2) जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर कपाळावर चंदन टिळक लावावा. या व्यतिरिक्त, जे लोक नेहमी दुःखी असतात, त्या लोकांनीही हा टिळक त्यांच्या कपाळावर लावावा. कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने आपल्या मनाला शीतलता प्राप्त होते.

तसेच, एकाग्रता वाढते. वैज्ञानिक तर्कानुसार शरीरावर अनेक ठिकाणी असे बिंदू असतात, आपण त्याला एक्यूप्रेशर पॉईंट म्हणतो, ज्याच्या मदतीने आपण वेदनांपासून मुक्त होऊ शकतो, त्याचप्रमाणे दोघी भुवई मधील ही जागा अत्यंत संवेदनशील मानली जाते. या ठिकाणी टिळक लावल्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. चंदनाचे बरेच प्रकार आहेत.

त्यात लाल चंदनाचा टिळक व्यक्तीमध्ये ऊर्जा संक्रमित करतो. तर पिवळ्या चंदनाचा टिळक लावल्याने देवगुरु बृहस्पतींचा आशीर्वाद मिळतो. धार्मिक श्रद्धेनुसार चंदन टिळक लावल्याने मानवाच्या पापांचा नाश होतो. लोक अनेक प्रकारच्या संकटातून वाचतात. ज्योतिष शास्त्रानुसार, टिळक लावल्याने ग्रहांना शांती मिळते. असे मानले जाते की चंदन टिळक लावणाऱ्या व्यक्तीचे घर अन्न आणि संपत्तीने परिपूर्ण राहते आणि सौभाग्य वाढते.

3) ज्यांच्या कुंडलीत ग्रह शुभ घरात नाहीत त्यांनी टिळक लावायला पाहिजे. ज्या लोकांचा शनी अशुभ स्थितीत आहे, अशा लोकांनी भस्म किंवा काळ्या रंगाचे टिळक लावावे. ‘भस्म’ या शब्दामध्ये ‘भ’ म्हणजे ‘भत्र्सनम्’ अर्थात ‘नष्ट करणे’. ‘स्म’ म्हणजे स्मरण. भस्मामुळे पापांची शुद्धी होते आणि देवाचे स्मरण होते.

शरीर नाशवंत आहे. त्याच्या निरंतर स्मरणाचे प्रतीक राख आहे; भस्म शब्दाचा अर्थ असा आहे. विभूती, रक्षा आणि राख हे भस्माचे समानार्थी शब्द आहेत. शिव परंपरेशी संबंधित साधू आणि संत बहुतेक वेळा त्यांच्या अंगावर भस्म लावताना दिसतात. हवनानंतरही हवनातील राख टिळक म्हणून लावण्याची परंपरा आपल्याकडे आहे. याने भगवान भैरव प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपली कृपा दर्शवतात.

4) ज्या लोकांचा गुरु ग्रह अशुभ घरात आहे, अशा लोकांनी हळदीचे टिळक लावावे. हळदीचे टिळक लावल्याने त्वचा चमकदार होते तसेच हळद असलेले टिळक लावल्याने त्वचा शुद्ध होते. हळदीमध्ये बॅक्टेरिया विरोधी घटक असतात, जे रोगांपासून मुक्त करतात.

केशर आणि हळदीचा थेट संबंध गुरु ग्रहाशी आहे. जर तुमच्या कुंडलीत गुरुची दशा चालू असेल तर दररोज अंघोळ केल्यानंतर केशर किंवा हळदीचा टिळक लावल्यानंतरच तुम्ही काही कामानिमित्त घरातून बाहेर पडावे. गुरुवारी हळद आणि केशर टिळक लावल्याने विशेष लाभ होतो. असे केल्याने गुरू ग्रहाचे सर्व दोष दूर होतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment