हरतालिका व्रत 2021: भगवान शिव-पार्वतीचे 16 आशीर्वाद मिळवा, ही 16 प्रकारची पाने अर्पण करुन..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! हरतालिका व्रत हे विवाहित महिलांसाठी महत्वाचे व्रत मानले जाते. या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्य आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी उपवास ठेवतात.

या हरतालिकेला शिव-पार्वतीचे 16 आशीर्वाद मिळवण्यासाठी, ही 16 प्रकारची पाने अर्पण करा..

हरतालिकेचे व्रत केल्याने विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळते आणि अविवाहित मुलींना सुखकारक वर मिळतो. हे व्रत पाळून देवी पार्वतीने स्वतः भगवान शिव यांना प्राप्त केले होते.

या व्रतामध्ये महिला सौभाग्यवती म्हणून गौरी देवीचे आशीर्वाद घेतात. वास्तविक हा उपवास पाणीविरहित ठेवण्यात येतो. म्हणूनच हा उपवास सर्वात कठीण उपवास मानला जातो. दुसरीकडे, अविवाहित मुली देखील हरतालिकेचे व्रत करतात.

योग्य वराच्या प्राप्तीसाठी हे व्रत ठेवले जाते. हरतालिका व्रतासाठी महिलांना त्यांच्या माहेरुन मिठाई, फळे आणि कपडे पाठवले जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका व्रत दरवर्षी साजरे केले जाते. या वर्षी हे व्रत गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी पाळले जाईल.

प्रत्येक विवाहित आणि अविवाहित स्त्रीने हे अत्यंत पवित्र व्रत गौरवाने करावे. हरतालिका व्रताच्या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत ठेवतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, आंघोळ करणे इत्यादी आणि स्वच्छ कपडे परिधान करून सकाळी पूजा करावी. जर तुम्ही लवकर उठून पूजा करू शकत नसाल तर सूर्यास्तानंतर प्रदोष काळात पूजा करणे उचित आहे. यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.

हा सण पर्यावरणाशी जोडलेला असल्याचे देखील दिसते, कारण या दिवशी स्त्रिया श्रावणा नंतर नवीन पालवी फुटलेल्या 16 प्रकारची पाने भगवान शिवाला अर्पण करुन आपल्या घरात प्रत्येक सुख समृद्धिचे वरदान मागतात.

तर या व्रताच्या दिवशी कोणती पाने अर्पण करायची हे जाणून घ्या, प्रत्येक पानाला एक विशेष आशीर्वाद आहे.

बिल्वपत्र: सौभाग्याचे वरदान लाभते.
तुळशी: चारित्र्याचे आशिर्वाद मिळतात.
जातीपत्र: संतती सुख प्राप्त होते.
शेवंती: वैवाहिक सुख लाभते.
बांबू: वंशवृद्धी लाभते.
देवदार: ऐश्वर्य लाभते.
चंपा: सौंदर्य आणि आरोग्याचे वरदान लाभते.
कन्हेर: यश आणि आनंद प्राप्त होतो.
अगस्त्य: वैभव आणि संपत्तिचे आशिर्वाद लाभतात.
भृंगराज: पराक्रमी
धोतरा: मोक्षप्राप्ती मिळते.
आंब्याची पाने: शुभ कार्य घडते.
अशोक: शांतता प्रिय जीवन लाभते.
सुपारी: परस्पर प्रेम वाढते.
केळीची पाने: यश प्राप्त होते.
शमी: संपत्ती आणि समृद्धी लाभते.
अशाप्रकारे सोळा प्रकारची पाने अर्पण करुन षोडशोपचारी पूजा करावी.

व्रत विधी – या दिवशी सकाळी स्त्रियांनी लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करावे. साज श्रृगांर करावा. पूजेसाठी चौपाटावर केळीच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड तयार करुन ठेवावे किंवा शिव पार्वतीची प्रतीमा ठेवावी.

यानंतर शिवलिंगावर पाने उलटी अर्पण करावीत आणि फुले व फळे थेट अर्पण करावीत. त्यानंतर सौभाग्याचे सर्व सामान अर्पण करावे. रात्री जागरण करावे, गाणी म्हणावीत किंवा भजन किर्तन करावे. शेवटी कथा ऐकावी आणि आरती करावी.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment