हे आहेत लसणाचे चमत्कारिक फायदे..

लसणाचे आयुर्वेदिक उपयोग

▪️ कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .
▪️ लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
▪️ बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
▪️ गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
▪️ किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
▪️ कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .
▪️भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
▪️भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
▪️ हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
▪️ ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
▪️ लसूण मनाची मरगळ घालवतो .
▪️ हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
▪️ लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
▪️ तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ….
▪️ लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.
▪️ अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.
▪️ डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.
▪️ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.
▪️ शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.
▪️ संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.
▪️ लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला आहे.

Leave a Comment