Monday, December 4, 2023
Homeलाइफस्टाइलहे आहेत ते 5 खास टोमणे : जे प्रत्येक सासू आपल्या सुनबाईला...

हे आहेत ते 5 खास टोमणे : जे प्रत्येक सासू आपल्या सुनबाईला मारत असते..!!

.

सासूबाई जणू कारल्यासारख्या कडू वाटतात सुनेला जेव्हा त्यांचे असे वागणे जि-व्हा-री लागते. मित्रांनो, सासू आणि सून यांचे नातं आंबटगोड असले तरी कधीकधी सासुच्या विचित्र वागण्याने आणि चुकीच्या बोलण्याने त्याचे रूपांतर खुप कडवट नात्यात होते.

आणि हे त्यांच्या लक्षात येत नाही. असे वागणे सूनबाईला आयुष्यभर विसरणे कठीण होते. मनोमन भावना अशा प्रकारे दुखावल्या जातात की नात्यात कायमचे अंतर निर्माण होते.

चला तर बघुया सासूबाईंच्या कोणत्या गोष्टी सूनबाईला आहेत नापसंत –
लग्नानंतर एखाद्या महिलेसाठी सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे तिच्या सासूशी चांगले संबंध निर्माण करणे, सर्व सासरच्यांशी जुळवून घेणे. सर्वांची मने जपणे, सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून सर्वांशी प्रेमाने वागणे, त्यांना आपलेसे करून त्यांचा सोबत मिळून मिसळून सुखी संसार करणे.

काहीवेळा सूनेकडून नकळत चूक होते पण काही सासू तिला वाट्टेल तसे बोलतात त्यामुळे तिचं मन खुप दुखावते. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की कोणत्याही स्त्रीला तिचा असा अपमान सहन होत नाही.

माझ्या मुलाला माझे हातचे जेवणच खुप आवडते –
“अग्ग , माझ्या मुलाला तु बनवलेली भाजी नाही आवडणार त्याला माझ्या हातचीच भाजी आवडेल बघ” हे वाक्य सर्रास सर्व सासवा नेहमीच बोलतात. भाजी आणण्या पासून ते कापण्या पर्यंत सूनने सर्व तयारी करायची आणि सासूचे हे असे बोलणे ऐकून तिचे मन नाराज होते.

मान्य आहे की, प्रत्येक मुलास आपल्या आईच्या हातचे जेवण आवडते, परंतु पत्नीलाही आपल्या पतीसाठी आणि प्रत्येकासाठी मनापासून काही खास पदार्थ बनवायचे असतात. आपल्याला प्रोत्साहनाऐवजी असे कायम जर सासू बोलत असेल तर त्या गोष्टीचा अर्थातच तिला राग येईल.

आताच तर माहेरी जाऊन आली ना..??
मित्रांनो, स्त्री ही कितीही स्वतंत्र असली, परंतु लग्नानंतर तिला तिच्या माहेरी जायचे असेल तर त्यासाठी सासरची परवानगी घ्यावीच लागते. बरेचदा लग्नानंतर जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्त्रीला शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यासाठी माहेरी जावेसे वाटते.

काहीवेळा तीला माहेरच्या व्यक्तींची खुप आठवण येत असते. परंतु , घरकाम कोण करेल या विचाराने सासू सूनेला माहेरी जाण्याकरिता आडकाठी आणते. सासूचा अशा बोलण्याने सून खूपच दुखावते.

माझ्या मुलाला काम करायला सांगते का..??
जरी असे म्हटले जाते की नवरा-बायकोने प्रत्येक जबाबदारी समान रीतीने पार पाडायला हवी, परंतु जेव्हा घरगुती कामांचा विचार केला जातो तेव्हा ती सर्व कामे सूनेनेच करायला हवीअसे सर्व सासवांना वाटते.

मुलाने स्वतःहून काम हाती घेतले तर तेही त्यांना चालत नाही. घरातली सर्व कामे करतांना तीची खुप तारांबळ उडते. अशा परिस्थितीत सुनेने जर कधी पतीला मदत करायला सांगितली तर सासू लगेच रागावते, बडबड करते. सासूच्या हया अशा प्रकारच्या बडबडीने ती वैतागून जाते.

तुझ्या आईने तुला काहीच शिकवले नाही का..??
एक गोष्ट म्हणजे ज्यामुळे सून सर्वात जास्त चिडते ती म्हणजे सासू तिच्या आईवडिलांना प्रत्येकवेळी दोष देत असते. मग ते स्वयंपाक असो किंवा घरातील इतर कामांबद्दल असो, माहेरच्यांचा असा वेळोवेळी झालेला अपमान ती कदापि सहन करू शकत नाही.

साहजिकच आपल्या संस्कारांवर जर कोणी बोट ठेवेल तर आपण गप्प बसू शकत नाही. मात्र सुनेच्या मनाचा विचार न करता सासू तिचे टोमणे मारणे चालूच ठेवते त्यामुळे सून मनातुन खचून जाते.

माझी मुलगी किती हुशार आहे तुला तर काहीच येत नाही –
कुठल्याही आईला तिची मुलगी प्रिय असते. आपल्या मुलीचे आई तोंड भरून कौतुक करताना थकत नाही. परंतु, अशी मुलगी आणि सूनेमध्ये कधीही तुलना करू नये. नणंद माहेरी आल्यावर सासू सुनेला हे कर ते बनव असे जणु फर्मानच सोडते कोणी पाहुणे घरी आल्यावर सूनचे काम दुप्पट नव्हे तर तिप्पट होते.

प्रत्येक आईला आपल्या माहेरी आलेल्या मुलीबरोबर गप्पा मारायला वेळ घालवायला आवडते, परंतु याचा अर्थ असा होत नाही की सर्व कामे सुनेनेच करायला हवी. या सर्व गोष्टीमुळे सून खूप थकुन जाते आणि निराश होते. तीला नणंद आणि सासूबद्दल तिरस्कार वाटायला लागतो.

तर मित्रांनो, सासुसूनेच्या यशस्वी आणि प्रेमळ नात्याकरिता सासूने सूनेचे मन सांभाळून वागावे आणि बोलावे, जेणेकरून सुनेच्या मनात सासूबद्दल आदर आणि प्रेम निर्माण होईल. मग बघा सासु-सूना कशा जीवाभावाच्या मैत्रीणी बनतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स