हे सर्व गुण ज्या पण मुलांमध्ये असतात तेच असतात मुलींची पहिली पसंती..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, एका वयानंतर लग्न करणे खूप महत्वाचे असते. भारतात लग्न हे संस्कारासारखे मानले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात इतर गोष्टी आवश्यक असतात, त्याचप्रमाणे आयुष्यात लग्न देखील खूप महत्वाचे आहे. लग्नाशिवाय अविवाहित जीवन जगणे खूप कठीण होते. पूर्वीच्या काळात, मुले 15-16 वर्षे वयापर्यंत पोहोचताच, त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचे लग्न करुन देत असत. त्यावेळी त्यांची इच्छाही विचारली जात नव्हती.

भावी पतीकडून अनेक अपेक्षा असतात –
जेव्हा एक मुलगा आणि मुलगी लग्नाचा विचार करतात, तेव्हा ते आशा करतात की आपल्या जोडीदारामध्ये हे गुण असायला हवेत. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाला आपल्या जोडीदारामध्ये काही चांगले गुण हवे असतात. तसे, जर आपण मुलांबद्दल बोललो तर, त्यांना त्यांच्या जोडीदारामध्ये कोणते गुण असायला हवेत हे ते पटकन सांगतात.

परंतु जेव्हा मुलींचा प्रश्न येतो तेव्हा, त्यांना त्यांच्या जोडीदारामध्ये कोणते गुण हवे आहेत हे सांगणे जरा कठीण जाते. मुलींना त्यांच्या जोडीदारामध्ये कोणते गुण असावेत हे सांगता येत नाही, पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी इथे सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मुलीला कोणते गुण हवेत हे चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकाल.

आज काळ खूप बदलला आहे. आज लग्नाचे वयही वाढले आहे. आजकाल तुम्हाला 30-35 वयाच्या लोकांचे लग्न न झालेले दिसेल. आजकाल मुले आणि मुली दोघेही त्यांच्या आवडीनुसार लग्न करत आहेत. विशेषतः लग्नाच्या वेळी मुलींना त्यांच्या भावी पतीकडून मोठ्या अपेक्षा असतात. प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा भावी पती गुणांनी परिपूर्ण असावा. चला आज जाणून घेऊया आजच्या मुलींना लग्नासाठी कशी मुले आवडतात.

मुलींना अशी मुले आवडतात –
समजूतदार – प्रत्येक मुलीला समजूतदार मुले खुप आवडतात. जर समजूतदारपणा सोबतच मुले इतरांचा आदर करणारे असले तर सोन्याहून पिवळे. मुलीला नेहमी असे वाटते की तिच्या जोडीदाराने फक्त तिची काळजी घेऊ नये तर तिच्या कुटुंबातील सदस्यांचा आणि नातेवाईकांचा आदर करावा.

महिलांचा आदर करणारे मुलेदेखील मुलींना खूप आवडतात. महिलांना सन्मान दिल्याने आपले महिलांबद्दलचे विचार समजतात. मुलींना भावनिक मुलेही खूप पसंत पडतात, कारण भावनिक असेल तर तो आपल्यावर प्रेम करेल, मला समजून घेईल असे तिचे मत असते. शिवाय तिच्यातील उणिवा जाणून घेणाराही तिला जास्त आवडतो.

याबरोबरच प्रत्येक मुलीला तिचा जोडीदार जबाबदार असावा असे वाटते आणि त्याने त्याच्या जबाबदाऱ्यांपासून कधीही दूर राहू नये. आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी त्याने प्रत्येकवेळी तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. घरी असो किंवा बाहेर, दोघांनी एकत्र राहण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. एवढेच नाही तर तिला घरातील शक्य असलेल्या कामात मदत केली पाहिजे.

रोक-टोक न करणारे –
काही लोकांना प्रत्येक गोष्टीत रोक-टोक करण्याची सवय असते. अशी मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत, जे अनावश्यकपणे बोलण्यात व्यत्यय आणतात. प्रत्येक गोष्टीत टोकणारे, अस करु नको, अस वागू नको, किंवा पोशाखा विषयी नेहमीच टोकणारी मूल मुलींना अजिबात आवडत नाहीत.

मुलायम हृदयाची मुले –
मुलींना चांगल्या अंतःकरणाचे आणि चांगल्या स्वभावाचे मुलं आवडतात. मुलींना राग येणारी मुले आवडत नाहीत. संतप्त लोकांशी लग्न केल्याने आयुष्यभर राग आणि भीतीने जगावे लागते.

कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलींना न दुखवता बोलणारी तसेच त्यांना वाईट वाटेल असे न वागणारी मुले मुलींना लवकर प्रभावित करतात. मुली नेहमी आपल्या जोडीदारावर जास्त विश्वास ठेवतात. अशावेळी त्यांचे मन दुखविणे चांगले नाही. मन दुखविले तर त्या तुमच्यापासून कायमच्या दूर जातात.

आधुनिक विचार करणारे –
स्त्रियांचा आदर करणारे, स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्थान देणारे पुरुष नेहमीच आवडतात असे दिसून आले आहे. आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा कृत्रिमपणा न आणता सरळ, साधेपणाने वागणारे प्रामाणिक पुरुष महिलांना जास्त भावतात.

सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खूप पूर्वीपासून मुलांना शूरवीर, साहसी असेच घडवावे असे बिंबवले जाते व त्यातून मुलांनी लाजणे ,रडणे या गोष्टी त्याज्य आहेत असे त्यांच्या मनावर ठाम रुजवले जाते. मात्र मुलींना अशी मुले आवडतात जी आधुनिक आहेत आणि काळाशी जुळवून घेतात. जुन्या विचारांची मुले नेहमी राहणीमान, वागणे-बोलणे याबद्दल बोलत असतात. ज्या मुलांना वेस्टर्न कपडे वापरण्यास काहीही हरकत नसते, मुलींना अशी मुले खूप आवडतात.

काळजी घेणारे –
शेवटी, प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या भावी पतीने तिची खूप काळजी घ्यावी. मुलींना निष्काळजी प्रकारची मुलं अजिबात आवडत नाहीत. मुलाने तिच्या आवडी-निवडींची काळजी घ्यावी. जेव्हा कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा त्यांचे मतही घेतले पाहिजे अशी मुलींची इच्छा असते.

जेव्हा कोणी तुमची काळजी करते, तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्यांच्यासाठी खास आहात. मुलींमध्ये सुद्धा असेच काही असते जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेता किंवा त्यांची काळजी घेता तेव्हा त्यांना असे वाटते की त्या तुमच्या आयुष्यात खूप खास आहेत.

एवढेच नाही, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जाता तेव्हा त्यांना जाणीव करुन द्यावी की तुम्ही त्यांची काळजी करता आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीत येऊ देणार नाही. यामुळे त्यांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल आणि तुमचे नाते मजबूत होईल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment