हे वाक्य बोलणे आजच बंद करा.. नाहीतर तुम्ही कधीच श्रीमंत आणि सुखी होणार नाही..!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो तुम्ही ऐकले असेल की कधी कधी आपण जसे बोलत असतो तसे होत असते. कारण आपल्या मनाची शक्ती खूप जास्त असते. आपण जे बोलतो ते आपल्या अंतर्मनात जाते. काही दिवसांनी तेच सत्य होते. आपण जे काही ठरवतो ते काही दिवसांनी करून सुद्धा दाखवतो.

आपण जसे बोलतो, जे वाक्य बोलतो. तश्या भावना आपल्या अंतर्मनात जातात. आणि तशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होत असते. आपण नेहमी असे काही वाक्य बोलतो ज्यामुळे आपल्याकडे सगळ्या गोष्टीची कमी असते.

नकारात्मक भावना असलेले वाक्य तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकतात. तुम्हाला नकारात्मकतेने भरून टाकतात. जसे आपण बोलतो पैसा कमी भेटला तरी चालेल पण नोकरी मिळायला हवी.

नोकरीमध्ये समाधान मिळायला हवे. हे नकारात्मक वाक्य आहे. दुसरे मी गरीब असलो तरी चालेल पण मला सुखी असायला हवं. माझे नशीबच खराब आहे म्हणून माझ्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत.

मी श्रीमंत झालो नाही तरी चालेल पण दोन टाईम सुखाचे जेवण मिळायला हवे. मित्रांनो या गोष्टी वाचायला छान वाटतात. आणि तुम्ही नक्की या गोष्टी बोलत असाल. पण विचार केलाय काय या गोष्टी नकारात्मक आहेत.

तुमच्या मनाला त्या नकारात्मक भावना पोचवतात. आणि अंतर्मनात याच गोष्टी साठवून असतात. तुम्ही गरीब असलात तरी सुख हवे असे तुम्हाला वाटते. आणि तेच तुमच्याकडे राहते आणि तुम्ही गरीबच राहतात. सुखी राहता. हे नकारात्मक आहे ना.

कारण आपल्या मनाची शक्ती एवढी असते. की आपल्या सर्व इच्छा ती पूर्ण करू शकते. पण आपण आपल्या मनाला चुकीचे संदेश देत असतो. नकारात्मक भावना पोहोचवत असतो. कारण त्या गोष्टीची भावना आपल्या मनात जाते.

आणि त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात होऊ लागते. म्हणून मी गरीब राहिलो तरी चालेल, मला पैसा कमी मिळाला तरी चालेल, माझे नशीबच खराब आहे. असे तुम्ही बोलत असाल. मग तशीच परिस्थिती तुमच्यासमोर येईल. विचार करा जर तुम्ही असे बोलाल.

मला नोकरी मध्ये खूप पैसा मिळेल आणि समाधान पण मिळेल. माझे नशीब खूप चांगले आहे. आणि मी सगळे काही मिळवेन. मी श्रीमंत पण होईल आणि दोन टाईम सुखाने जेवण पण करेन. बघा हे वाक्य वाचायला, ऐकायला छान वाटतं. आणि हे वाक्य सकारात्मक भावनेने भरलेले आहेत.

तुमच्या मनाला, अंतर्मनाला या सकारात्मक भावना पोहोचवतात. तुम्ही ऐकला असेल की आधी बोलायचे रडत बसू नका, आयुष्यावर रडू नका, नाहीतर परिस्थिती कधीच बदलणार नाही. पण मित्रांनो नकारात्मक भावना असलेले वाक्य, शब्द तुम्ही कधीच बोलू नका.

तुमच्या मनामध्ये, अंतरमनामध्ये हे संदेश जात असतात. हे संदेश घेऊन नका. नेहमी सकारात्मक बोला. तुमच्या आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी होतील. आणि तुम्हाला सगळे काही मिळेल.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment