Friday, December 8, 2023
Homeजरा हटकेही ४ कामे मुळीच करू नका, नाहीतर अपमानीत व्हावं लागेल.!! जाणून घ्या...

ही ४ कामे मुळीच करू नका, नाहीतर अपमानीत व्हावं लागेल.!! जाणून घ्या कोणती आहेत ती कामे.!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो बऱ्याच वेळा आपण विचार न करता अशी काही कामे करतो की त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. अनेकदा तर कळत नकळत देखील अपमानाला सामोरे जावे लागते. ज्यामुळे आपल्या मनात नकारात्मकताची भावना रूजते. ग्रंथांमध्ये ही काही कामे करणे निषिद्ध मानले जाते. अपमानापासून वाचायचं असेल तर ही ४ कामं करायचं टाळा..

हे काम कराल तर पश्चाताप होईल- धार्मिक ग्रंथांनुसार, एखाद्याने कधीही इतरांचा वाईट विचार किंवा नुकसान करु नये. असे म्हणतात की, असे करणाऱ्यांना क्षणिक आनंद मिळेलही, परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा संपूर्ण कुटुंबासोबत यातना सहन कराव्या लागतात.

त्याचे एक उदाहरण म्हणजे राजा कंसाचे, ज्यांनी आपल्या स्वत: च्या बहिणीचा मुलगा श्री कृष्णाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले. पण अखेरीस ते स्वतः मरण पावले. म्हणूनच असेही म्हटले जाते की, जो कोणी वाईत कृत्य करतो त्याला त्याची भरपाई याच जन्मी भरावी लागते.

महाभारतातून ही गोष्ट शिकायलाच हवी, हे काम करू नका- जशी संगत तसे गुण असं सर्वांनी ऐकलं किंवा वाचलं आहे. हे प्रत्यक्षातही घडतं. आपण ज्यांच्याबरोबर राहतो त्या लोकांसारखे आपण बनतो. म्हणूनच असे म्हणतात की एखाद्याने चांगली संगत किंवा चांगल्या लोकांमध्ये रहावे.

कधीही मैत्री करतांना समोरच्याला पारखून घेतलं पाहिजे आणि विचारपूर्वक मैत्री केली पाहिजे. महाभारतातही दुर्योधन आणि कर्ण यांचे उदाहरण सर्वांना माहित आहे, दुर्योधनच्या वाईट कृत्यांचा परिणाम कर्णाच्या आयुष्यावरही झाला.

हे काम मुळीच करू नये- ग्रंथांनुसार, एखाद्याने कधीही त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नये किंवा दान करू नये. असे म्हणतात की जी लोकं त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात किंवा जास्त पैसे देतात.

त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचे एक उदाहरण म्हणून राजा हरिश्चंद्रांकडे पाहिले जाते. त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती दान केली आणि परिणामी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबास त्रास सहन करावा लागला.

हे काम तर करत नाही ना- ग्रंथांनुसार, मुलाच्या संगोपनात कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. असे म्हटलं जातं की चांगले संस्कार किंवा वळण लावले नाही तर मुलं बिघडतात आणि त्यांच्या चुकीच्या कृतींमुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होतो.

त्याचे एक उदाहरण म्हणून महाभारतात महाराज धृतराष्ट्रांना पाहिले जाते. जर त्यांनी आपला मुलगा दुर्योधनास अधर्माच्या मार्गावर जाण्यापासून थांबवले असते तर कदाचित महाभारतासारखे मोठे युद्ध झाले नसते.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स