ही एकच प्रार्थना तुमच्या जीवनात चमत्कार करेल, एकदा करून बघा.!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो सगळ्यांना वाटते की देव सगळ्यांचे ऐकतो. फक्त माझेच ऐकत नाही. माझ्याच इच्छा पूर्ण करत नाही. जे मी मागतो तेच मला मिळत नाही. त्यांना वाटते की देवाला स्वामींना प्रार्थना करून काय होईल.

मी तर रोज प्रार्थना करतो पण काही होत नाही. खरं तर त्यांना प्रार्थनेचा खरा अर्थच समजत नाही. प्रार्थनेचा खरा भाव ते लोकं समजून घेत नाहित. तुम्हाला एक उदाहरण सांगतो.

तुमच्याकडे मोबाईल आहे. आणि तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटी आहे. तर तुमचा मोबाईल स्वतःहून चार्जिंग होतो का? नाही ना त्याला लागते चार्जर ऊर्जा मिळवण्यासाठी.

तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे देव, मोबाईल म्हणजे तुम्ही, आणि चार्जर म्हणजे प्रार्थना. ऊर्जा मिळवण्यासाठी हे फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा.

त्या परमशक्ती सोबत आपल चार्जर कनेक्ट होतं तेव्हा त्या परमशक्ती कडून आपल्याला एक ऊर्जा मिळू लागते. परमात्मा परमशक्ती चे नाव आहे. ते आपले नोकर नाही. की आपण ऑर्डर केले आणि सर्व काही आपल्याला मिळाले आणि इच्छा पूर्ण झाल्या.

प्रार्थना केल्याने अनेक फायदे होतात. एक म्हणजे आपल्या मनाला शांती मिळते. आणि मन शांत होते. आणि शांत मनाने आपण आपले जीवन जगू शकतो. दुसरा फायदा म्हणजे आपल्यामध्ये विश्वास येतो आणि आपण चांगले विचार करू शकतो.

कॉन्फिडन्स येतो, विश्वास येतो काही ही करण्याची. तिसरा फायदा आपल्याला एक शक्ती मिळते. की ते परमात्मा आपल्या सोबत आहेत. आणि ते माझी मदत करतीलच. मित्रांनो प्रार्थने मधून आपण जेव्हा मदत मागतो.

तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत करतातच. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही नाही करायची फक्त बसून राहायचे. आणि त्या मदतीची वाट बघायची. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

आळशी माणसाला बघून परमात्मा सुद्धा पाठ फिरवून घेतो. परमात्मा त्यांच्यासाठीच काहीतरी करतात जे पुढे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. प्रार्थना कोणती करावी कशी करावी हा प्रश्न नसतो. देवाजवळ बसून जे मनात येईल ते बोलावे.

जे मागायचे असेल ते मागावे. जे संकट असेल ते सांगावे. नम्र विनंती करावी. हात जोडून नमस्कार करावा. मनातून जेव्हा अशा पार्थना येतात त्या खऱ्या असतात. त्यांचे उत्तर लवकर मिळते. तर तुम्ही ही प्रार्थनेची साथ घ्या. परमेश्वर, परमात्म्याला, स्वामींना प्रार्थना करा.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment