होलिका दहन होतं त्या दिवशी करण्यात येणाऱ्या उपाययोजना इतर दिवसांपेक्षा लवकर फळ देतात. तुम्हालाही पैसा कमी पडत असतील आर्थिक दृष्ट्या तुम्ही खुपच कमजोर झाला असाल..आणि तुम्हाला लवकरात लवकर इच्छित सफलता हवी असेल चांगले परिणाम हवे असतील तर हे काम तुम्ही होळीच्या रात्री नक्कीच करा. ज्यामुळे वर्षभर तुमच्या वर लक्ष्मी ची कृपा होईल.
जर कुणी तुमची उधारी परत देत नसेल. त्याच्या मनात बेइमानी असेल आणि तुम्हाला दावा दाखल करायचा नसेल, तर ज्या व्यक्ती कडून तुमचे पैसे परतावा होत नाही त्या व्यक्तिचे नाव होलिका दहन होणाऱ्या जागेवर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोणाच्या आत लिहा. आणि त्यावर हिरवा गुलाल शिंपडा. दुसर्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन होलिका दहनाची राख घेऊन होलिका मातेची प्रार्थना करत.. त्या व्यक्तीचे नाव घेत पाण्यात वाहून द्या.
होळीच्या आदल्या रात्री च्या आधी हा महातोटका करा, यामुळे नकारात्मक शक्ती नेहमीच तुमचया पासून दूर राहतील.
कमळाच्या फुलांच्या माळेने ओम महालक्ष्मैं नमः मंत्राचा जाप करा. तीच माळा परिधान करुन होलिकेजवळ शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक भरभराटीसाठी होलिका मातेची प्रार्थना करा.
धनवृद्धीसाठी मंत्र ‘ओम श्रीमान ह्रीमान श्रीमान महालक्ष्मयै नमः’ मध्ये 108 वेळा वाचा आणि साखरेची आहूती देत रहा.
जर सरकारकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून काही अडथळा येत असेल एखाद्या कामात बाधा येत असेल तर.. विरोधकाचे नाव घेत होलिकेच्या विरुध्द दिशेने वर्तुळाकार चक्कर मारतांना रुईच्या मुळाचे 7 तुकडे होलिकेत घालावे.
व्यवसायात जर सतत नुकसान किंवा आर्थिक हानी होत असेल तर होलिका दहनच्या संध्याकाळी दुकान किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर गुलाल शिंपडा, त्यावर पीठाने बनविलेले चार पिठाचे दिवे लावा. तो दिवा जळत्या होलिकेत वाहून द्या.
जवळ पैसे टिकत नसल्यास होळीच्या दिवशी 5 कवड्या लाल कपड्यात बांधून घ्या आणि तिजोरीत किंवा रोख रक्कम असणाऱ्या बॉक्स मध्ये ठेवा.