होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाका ‘ही’ एक वस्तु.. इच्छा ताबडतोब पूर्ण होतील.!! जन्मोजन्मी गरिबी दूर होईल

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. दोन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धूलिवंदन अर्थात होळी खेळली जाते.

होळीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णु नरसिंह अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या नरसिंह अवताराची पूजा केली जाते. मित्रांनो होळीची रात्र ही विशेष मानली जाते कारण या दिवशी या दिवशी पौर्णिमा असते. वर्षभरामध्ये काही विशेष तिथी किंवा विशेष दिवस असतात त्यामधील एक म्हणजे होळीचा दिवस आहे.

मित्रांनो या वर्षी 6 मार्च रोजी होळीचा सण आलेला आहे. होलीका तिथिचा म्हणजेच पौर्णिमेचा प्रारंभ शनिवार दिनांक 6 मार्च होत आहे आणि पोर्णिमा समाप्त होत आहे शुक्रवार 7 मार्च रोजी पर्यंत आहे आणि मित्रांनो या दिवशी होलिका प्रदीपण केले जाते म्हणजे होळी पेटवली जाते. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपली सर्व दुःख, संकटे जळून राख व्हावीत.

आपल्या आयुष्यात आनंदी आनंद यावा यासाठी या विशेष तिथीला अनेक उपाय केले जातात आणि याचबरोबर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी विशेष उपाय केले जातात.

आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपण काही छोटे-छोटे उपाय करू शकतो. ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आणि आशिर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीचा स्थाई निवास आपल्या घराला लाभेल. याचबरोबर आपली कसलीही इच्छा तात्काळ पूर्ण होईल.

असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी चंचल आहे त्यामुळे ती एकाच ठिकाणी जास्त दिवस राहत नाही. आपल्याला जर का असं वाटत असेल की माता लक्ष्मी कधीच बाहेर जाऊ नये म्हणजेच आपल्या घरात जो धन पैसा आहे तो आपल्याला कधीच कमी पडू नये तर माता लक्ष्मी आपल्या घरी थांबवण्यासाठी आपल्याला एक विशेष उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे.

मित्रांनो होळीच्या दिवशी होळी प्रज्वलित केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्याच बरोबर होळीला जल अर्पण करत प्रदक्षिणा घातली जातात. तुम्ही पाच, सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता. होळीची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे.

यासाठी तुम्हाला तोंड लवंगा, दोन विड्याची पाने आणि थोडसं देशी गाईचे तूप लागणार आहे. मित्रांनो या दोन्ही लवंगा देशी गाईच्या तुपात बुडवून विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत. त्यानंतर हे दोन्ही विड्याची पानं लवंगा सहित प्रज्वलित केलेल्या होळीत टाकायचे आहे.अर्पण करावयाचे आहे.

आणि त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मनातल्या मनात बोलून देवाला प्रार्थना करायचे आहे की माझी मनोकामना इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी. त्याच बरोबर तुम्हाला घरी सुख-समृद्धी आणि शांती हवी असेल तर एक नारळ तुम्ही होळीमध्ये अर्पण करायचा आहे.

यामुळे घरातील सर्व व्यक्तींमध्ये आपापसात प्रेम वाढते आणि सुख-समृद्धी घरी राहते. जर तुम्हाला नोकरी संबंधित काही समस्या असतील तर काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन होळीमध्ये अर्पण करायचे आहेत. हा जो उपाय आहे तो तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे म्हणजे कुणाच्याही नकळत करायचा आहे.

जर तुम्हाला नोकरीत बढती मिळत नसेल, उद्योग धंद्यात बरकत होत नसेल, खूप कष्ट करून खूप मेहनत करूनही तुम्हाला योग्य तो फायदा होत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायात उद्योग धंद्यात तुम्हाला सफलता मिळेल..

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन बढती अवश्य मिळेल. मित्रानो तुमच्या आयुष्यात अशा काही समस्या असतील तर त्या निवारण साठी होळीच्या विशेष तिथीला वरील उपाय अवश्य करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

Leave a Comment