Horoscope Update Shravan Month श्रावणात उजळून उठणार या 5 राशींचे भाग्य.. महादेव तसेच चंद्राची अपार कृपा बरसणार धनलाभाच्या मोठ्या संधी.!!

Horoscope Update Shravan Month श्रावणात उजळून उठणार या 5 राशींचे भाग्य.. महादेव तसेच चंद्राची अपार कृपा बरसणार धनलाभाच्या मोठ्या संधी.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. (Horoscope Update Shravan Month) कालपासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. चातुर्मासातील श्रावणात व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते. निसर्गाची सांगड असलेली श्रावणातील व्रते सांस्कृतिक, धार्मिक आणि परंपरांच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहेत. व्रताचरणांमागे जीवनशैली उंचावण्याचा, निसर्गाशी संबंध दृढ करण्याचा आणि परंपरा कायम ठेवण्याचा समृद्ध विचार असल्याचे पाहायला मिळते.

यंदाच्या चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक श्रावण मास. अधिक महिन्याची सांगता झाल्यानंतर आता निज श्रावणारंभ झाला असून, पहिला श्रावणी सोमवार २१ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी शिवपूजनानंतर शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करावेत. विशेष म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी नागपंचमी आहे.

श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. (Horoscope Update Shravan Month) या दिवशी शेतकरी शेतात नांगरणी करत नाहीत. संस्कृती, परंपरांमध्ये नागपंचमीला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार हा चंद्राला समर्पित असल्याचे मानले जाते. तसेच सोमवार महादेव शिवशंकराचा वार मानला जातो.

त्यामुळे महादेवांसह चंद्राची कृपा प्राप्त होऊ शकते. तसेच पहिल्या श्रावणी सोमवारी आणि नागपंचमीला शुभ नावाचा एक उत्तम योग जुळून येत आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेकपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. या योगात केलेले काम शुभता तसेच शुभ फलांची प्राप्ती करून देते, असे म्हटले जाते. अनेकार्थाने शुभ मानला गेलेला हा दिवस कोणत्या ५ राशींसाठी पुण्यफलदायी तसेच लाभदायी ठरू शकेल? ते जाणून घेऊया…

मेष रास – राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार पासून नागपंचमी नंतर जुळून येणारा योग फलदायी ठरू शकेल. सकाळपासून उत्साह वाटू शकेल. घरात धार्मिक वातावरण असेल. लक्झरी वस्तूंची खरेदी करू शकता. कुटुंब, मित्र आणि जवळच्या लोकांचा पूर्ण पाठिंबा असेल. मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. (Horoscope Update Shravan Month) गुंतवणुकीची योजना आखत असतील, तर वेळ खूप अनुकूल आहे. नोकरदार लोकांना करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी तसेच भाग्योदयासाठी सोमवारी विशेष व्रत ठेवावे. शिवलिंगावर दूध, पाणी, दही, बेलपत्र, अक्षत, धतुरा, गंगाजल अर्पण करून पूजन करा. शिव चालिसाचे पठण किंवा श्रवण करावे.

कर्क रास – राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी यशकारक ठरू शकेल. शुभ योगामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्राचीही भेट होईल. ज्याचा फायदा होईल. मालमत्ता खरेदीच्या दिशेने यश मिळेल. वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस शुभ राहील. यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची हानी करण्यात विरोधक अयशस्वी ठरतील. मन प्रसन्न राहील. कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढऱ्या वस्तू दान करा.

हे सुद्धा पहा : Horoscope Guru Vakri In Mesh Sign 4 सप्टेंबर होणार मोठी उलाढाल.. गुरुची उल्टी चाल या 4 राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार..

कन्या रास – राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार तसेच नागपंचमी पर्वात घडून येणार्‍या शुभ योगाचा विशेष प्रभाव राहू शकेल. हा योग नागपंचमी नंतर सुद्धा असरकारक राहील. (Horoscope Update Shravan Month) नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. बुद्धिमत्तेने आणि कार्यक्षमतेने सर्व कामे सहज पूर्ण कराल. जवळच्या व्यक्तीसोबत सुरू असलेले मतभेद संपतील. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील. धनवृद्धीसाठी शुभ संयोग घडू शकतील. भावंडांचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात दिवस घालवाल. चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाइफ पुढे जाईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पाच बेलपत्रांवर पांढर्‍या चंदनाचे तिलक करून शिवलिंगावर अर्पण करा. शिवाष्टकांचे पठण किंवा श्रवण करा.

धनु रास – राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार पासून नागपंचमी नंतर येणारा काळ लाभदायी ठरू शकेल. भौतिक सुखांचा आनंद घेऊ शकाल. परदेशातून चांगला नफा मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ राहील. वडील आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातील वडिलधाऱ्यांसोबत कोणत्याही कार्याबद्दल चर्चा करू शकता. धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न होईल. (Horoscope Update Shravan Month) पैशांमुळे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. मित्रांसोबत मनोरंजक क्षण घालवाल. काही महत्त्वाची माहिती मिळेल. व्यावसायिक प्रगती आणि मनोकामना पूर्तीसाठी सोमवारी शिवलिंगावर दुधाभिषेक करावा. यथाशक्ती ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा.

मीन रास – राशीच्या व्यक्तींना पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी नंतरचा काळ शुभ फलदायी ठरू शकेल. नोकरदारांना इतर कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. मन प्रसन्न राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करू शकता. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. जनतेचे सहकार्यही मिळेल. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. विद्यार्थी शिक्षणात चमकदार कामगिरी करू शकतील. दिवस चांगला जाईल. अडथळे आणि समस्या दूर करण्यासाठी सोमवारी व्रत करून शिवलिंगावर गौरी शंकर रुद्राक्ष अर्पण करा. सकाळ-संध्याकाळ शिवमंदिरात रुद्राक्षाच्या जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. (Horoscope Update Shravan Month)

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!