Friday, December 8, 2023
Homeलाइफस्टाइलकसे ओळखावे की एखादी व्यक्ती मनापासून काळजी घेतेय.. की तो केवळ दिखावा...

कसे ओळखावे की एखादी व्यक्ती मनापासून काळजी घेतेय.. की तो केवळ दिखावा आहे.. त्यामागे काही स्वार्थ आहे.?

नमस्कार मित्रांनो.. आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे..!! माणसाच्या आयुष्यात नात्यांना महत्त्व यासाठी आहे कारण त्यातून एक सुरक्षिततेची भावना मनात येते. आपल्याला एकटं वाटत नाही. कारण आपल्यासोबत कोणतरी असत. जे आपल्याला विश्वास देतं, आपली काळजी घेतं, आपल्याला प्रेम देतं. या सर्व गोष्टी एका उत्तम नात्याचा पाया आहेत. एका आरोग्यदायी नात्यात एकमेकांसाठी या सर्व गोष्टी केल्याचं जातात.

आपण त्या माणसाची काळजी घेतो, त्याच्या विचारांना महत्त्व देतो, त्याचा आदर करतो, वेळ घालवतो, शक्य होईल तशी न मागता मदत करण आलंच. आणि हे कोणत्या विशिष्ठ नात्यापुरत मर्यादित नाही. नात म्हणजे माणसा माणसामधील नात. ते कोणतही असो. जेव्हा समोरची व्यक्ती आपली काळजी घेते तेव्हा आपल्याला पण छान वाटत. आपल्यासाठी कोणतरी आहे अशी जाणीव येते. आपण एकप्रकारे निश्चिंत होतो.

पण हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळी समोरचा माणूस काळजी घेतोय ती खरीच आहे. तो मनापासून तस करतोय. कारण सर्व माणसं काही सारखी नसतात. त्यामुळे जी समोर चांगल वागतात, गोड बोलतात, आपली काळजी आहे अस दाखवतात त्यांच्या मनात देखील खरच तस असेल. बरेचदा लोक संधी साधण्यासाठी देखील अस वागतात. ज्यात आपण फसतो. त्यांना आपल्याकडून काहीतरी हवं असत त्यावेळी पण वागण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला माणसांना ओळखता आलं पाहिजे. नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते. हे ओळखण्यासाठी त्या माणसाला नीट ओलखण, त्याच्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

जी व्यक्ती आपली खरच काळजी घेते किंवा ज्या व्यक्तीला आपली खरच काळजी असते तिला आपली मनस्थिती लगेच समजते. आपला मूड चांगला आहे की खराब आहे, आपल्यासोबत काही झालंय का ज्यातून आपण गप्प आहोत हे अश्या व्यक्तीला समजत. आठवून पहा आपली घरातली माणसं असतील किंवा आपली खूप जवळची मित्र मैत्रीण असेल; आपण जर गप्प गप्प बसलो, एका बाजूला जाऊन राहिलो तर ते लगेच आपल्याला विचारायला येतात की काय झालं.

नातं किंवा ते निभवणारी माणसं आपल्यासाठी का महत्त्वाची असतात कारण ती आपल्या प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत असतात. ते आपली साथ देतात. आपल्याला एकट सोडत नाही. मग आपण जरी वाईट परिस्थितीत असलो तरीही. कारण त्यांचा आपल्यावर विश्वास असतो आणि आपल्या आयुष्याची त्यांना कदर असते. जो माणूस काळजीचा आव आणतो तो आपली काळजी तेव्हाच करतो जेव्हा त्याला आपल्याकडून काहीतरी हवं असत.

अशी माणसं प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत असत नाहीत. जेव्हा आपल्याला खरच गरज असते तेव्हा ही नसतात. ती फक्त येत जात राहतात. कारण त्यांच्या गरजा त्यांना पूर्ण करायच्या असतात. आठवून पहा, अस कोणतरी असतच ज्याच्याबद्दल आपण म्हणतो, तेव्हा एरवी हा माणूस माझ्याशी नीट बोलत पण नाही पण आज त्याच प्रेम कसं काय उफाळून आलं? कारण अस करून त्यांना काहीतरी फायदा होणार असतो.

काळजी करण, प्रेम करण म्हणजे प्रत्येक वेळी गोड गोड बोलणे, आपल्या हो मध्ये हो म्हणणे नाही. आपण बरेचदा आपल्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेत असतो किंवा घ्यायच्या मार्गावर असतो. अश्या वेळी ज्या माणसाला खरच आपली काळजी असते ती आपल्याशी भांडते, आपल्याला रागावते, असे निर्णय घेण्यापासून रोखते. का? कारण त्यांना आपलं काही नुकसान होऊ द्यायचं नसत. जरी आपल्याला त्यांचा राग आला तरी ते आपल्याला थांबवतात, वाईटपणा घेतात. हेच जी व्यक्ती नाटक करते ती करणार नाही. ती फक्त हो ला हो म्हणेल. कारण आपल्या मनात चांगल बनायचं असत.

अनेकदा असे प्रसंग किंवा अशी वेळ आपल्या आयुष्यात येते जेव्हा आपल्याला काही काळ एकट राहावसं वाटत. आपल्याला काही काळ स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो, जो ही माणसं देतात. आपल्या मताचा आदर करतात. कारण काळजी करण म्हणजे सारखं आपल्या मागे पुढे फिरणं अस होत नाही.

काही जण आपली काळजी व्यक्त करत नाहीत किंवा त्यांना ती करता येत नाही. पण तरी ती आपल्याला जाणवते. जी व्यक्ती काळजीच नाटक करते टी सतत आपल्या मागे मागे करेल आपल्या प्रत्येक गोष्टीत डोकावेल. जेव्हा आपल्याकडून त्यांना जे काही हवं असत ते मिळत तेव्हा या व्यक्ती आपल्यासोबत राहत नाही. त्यांचं वागणं लगेच बदलत.

म्हणूनच आपल्या आयुष्यात भलेही कमी नाती असली तरी चालतील पण ती योग्य आणि खरी असण गरजेचं आहे. यासाठी अनुभवातून आपल्याला माणसांना ओळखता आलं पाहिजे आणि योग्य त्याच माणसांना आपल्या आयुष्यात जागा दिली पाहिजे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स