आयडिया ची कल्पना.. आधार कार्ड च्या डिझाईन मध्ये बदल करुन त्यांनी बनवलं मेनू कार्ड…

कोलकाता: अलिकडे काही दिवसांपूर्वी लग्नसमारंभात अहेरासाठी QR कोड ठेवल्या नंतर नवविवाहित जोडपं तुफान चर्चेत आलं होतं. आता हा अजून एक अजब प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या नवविवाहीत दाम्पत्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

बहुतेकांना त्यांचं लग्न इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं करायचं असतं. त्यासाठी नवं नवीन आयडिया च्या कल्पना शोधून काढल्या जातात. लग्न स्थान असो किंवा आमंत्रण कार्ड याबद्दल, त्यांना सर्व काही वेगळ्या पद्धतीनं करण्यात रस असतो. पण सध्या सोशल मीडियावर चर्चा लग्नाची नाही तर लग्नातील मेनूकार्डची होत आहे. 

लग्नातील मेनूकार्ड हे सेम टू सेम आधारकार्डसारखं तयार केल्यानं या दाम्पत्याच्या लग्नातील मेनूकार्डची चर्चा रंगली आहे. हा मेनूकार्ड तंतोतंत आधारकार्ड सारखा तयार करण्यात आला आहे. आपला पत्ता असतो तिथे खाद्यपदार्थांच्या नावांची यादी देण्यात आली आहे. 

बंगालच्या एका दाम्पत्यानं त्यांच्या लग्नाचा फूड मेनू अनोख्या पद्धतीने छापण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नातील मेनूकार्डचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोलकाताच्या गोगोल साहा आणि सुवर्णा दास यांनी त्यांच्या लग्नाचा फूड मेनू आधारकार्डसारखा अगदी हुबेहुब छापला आहे. 1 फेब्रुवारीला त्याचा विवाह सोहळा पार पडला. हे मेनूकार्ड पाहून उपस्थित लोकही हैराण झाले. उपस्थितांपैकी एकानं या मेनूकार्डचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अनोख्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. 

Leave a Comment