इंजेक्शन देताना रक्त वाहिनी मध्ये हवा गेली तर काय होते..??

आपले शरीर हे सील बंद पाकीटासारखे असते. म्हणजे कमीत कमी शरीराचा जास्तीत जास्त भाग. जर यात चुकून कुठे “पंक्चर” झाले तर तेथून हवा आत येऊ शकते. आणि त्यामुळे शरीरातल्या रक्तवाहिन्यामधे हवा जाऊन अवयवांना रक्त पुरवठा कमी पडू शकतो.

या “हवेच्या रक्तवाहिन्यात जाण्याला” एअर एमबोलीसम म्हणतात. बायपास शस्त्रक्रिया करताना जर अगदी थोडी हवा हृदयाला पुरवठा करणार्या रक्तवाहिनी मधे गेली किंवा मेंदूच्या शस्त्रक्रियेमधे असे झाले तर त्या अवयवांना खूप मोठी इजा होऊ शकते.

परंतु, जर याच हवेला फुफ्फुसात एमबोलिसम थ्रू आणी इजा पोचवायची असेल, तर मात्र जवळपास शंभर मिली हवा असायला पाहिजे. आणि सलाइन द्वारे इतक्या मोठ्या प्रमाणात हवा आत जात नाही!! तसेच, सलाईन मुळे इजा होणार असेल तर शक्यतो ती फुफ्फुसालाच होते.

म्हणजेच, अगदी थोड्या प्रमाणात छोटा हवेचा बूडबुडा सलाईन द्वारे शरिरामधे गेल्यास खूप नूकसान होत नाही. परंतु, कोणत्या रूग्णाला काय त्रास होईल हे सांगता येणे अवघड असल्यामुळे अशा घटना टाळण्याचा प्रयत्न करणे खूप गरजेचे असते.

Leave a Comment