जड झालेले आईबाप.. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.!! एक हृदयस्पर्शी कथा..


नमस्कार आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5.30 वाजता ऑफिस सुटल्यानंतर मी 5.44 ला बोरोली फास्ट लोकल ट्रेनने घरी येण्यासाठी निघालो. ट्रेनमध्ये असताना मला माझा मित्र राजेशचा फोन आला, तो म्हणाला, “मला काही शॉपिंग करायचं आहे. मालाड स्टेशन ला थांब. मी थांबलो

मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच MM मिठाई वल्याचे दुकान आहे, उजवीकडे पाणपोई आहे आणि डावीला पार्किंग साठी आडवे कट अँगल लावले आहेत. त्यावर चडून मी राजेशची वाट बगत बसलो. एक 70 ते 75 वयाचा गृहस्थ डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मोकटलेले असे माझ्या जवळ आहे. मी त्या लोखंडी अँगल वर 3 ते 4 फूट उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले, आणि म्हणाले ये बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरे होईल…!! ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांतील वाटत न्हवते.

किंवा ते रोज भीक मागत असतील असेही त्यांना बागून वाटत न्हवत, अचानक एक वयुवृद्ध माणसाने आपलं येऊन आपलं पाय धराव, मला अवघडल्या सारख झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगल वरून खाली उडी घेतली. आणि खिशातून पैसे काढत म्हंटलं “आजोबा तुम्हाला भूक लागली आहे हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवे आहे ते.

ते आजोबा म्हणाले, “नाही बाबा, मला पैसे देऊ नको, फक्त एक वडापाव दे.” MM कडून मी ताबडतोब २ वडापाव आणले आणि आजोबांना दिले ते जमिनीवर बसून जेवू लागले. मला सांगितले की जमिनीवर बस तिथे बसू नको पडशील. माझ्या शेजारी बस, मला पण दोन घास जास्त जातील. मग मी त्यांना विचारू लागलो की तुम्ही कुठून आलात?, तुम्हाला कुठे जायचे आहे?, कोणाला शोधत आहात? वगैरे.

आजोबा म्हणाले, “मी हिंगोलीहून आलो आहे. मी माझ्या बायकोसोबत एका गावात राहतो. तुमच्यासारखा आमचा एकुलता एक मुलगा इथे मुंबईतल्या एका मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे.” दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल आहे त्याची पत्नी नव्या विचारांची आहे.

तिला सासू सासरे म्हणजे आम्ही गावठी, गावंडळ वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही, त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो. गेल्या 2 वर्षां पासून परवा त्याचा माझ्या मोबाईलवर फोन आला होता, म्हणाला आम्हाला अमिरीकेत नोकरी मिळाली आहे, बायकोला घेऊन दहा वर्षांसाठी जात आहे. इथे मुंबईत होता तेव्हा येत होता, आम्हा म्हातारा म्हातारीला भेटायला ते ही सहा महिन्यातून एकदा मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हंटलं तर वेळ नाही म्हणाला.

आता परवा लगेच विमानानं जायचं अस म्हणाला, पुढचे दहा वर्षे जगतोय की राहतोय कोणाला माहित, म्हणूनच म्हंटलं आपण भेटून यावं मुंबई ला जाऊन, काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथं मालाड मध्ये विमानतळ नाही अस म्हणतात इथली माणसं.

मी म्हणालो बरोबर म्हणत आहेत हे लोक इथे मालाड ला नाही आहे, Santacruz ला आहे विमानतळ, आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, “परवा, जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा त्याने मला तोच पत्ता दिला, हा मोबाईल पण तुटलेला दिसतो, कालपासून एकही कॉल नाही, माझ्या मुलाचा, मी त्याला सांगितले होते की मी तुला भेटायला मुंबईला येतोय. आता माझ्या एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात एक कागद होता.

पहिल्या मोबाईलचे बटन दाबून पहिल मोबाईल नीट काम करत होता. नेटवर्क पण होते.  मी विचारले तुम्ही, “मुलाला फोन का नाही केला?” आजोबा म्हणाले, मला फोन लावता येत नाही, फक्त फोन उचलता येतो. मी रिसिव्ह केलेल्या कॉल वर गेलो आणि पुढचा कॉल पण डायल केला समोरून फोन डिस्कनेक्ट झाला होता.

मग मी तो कागद उघडला आणि कागदावर पहिला पत्ता होता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, एमएम हॉटेल समोर, मालाड पश्चिम मुंबई. मला कळलं होत की त्या मुलाने त्याच्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता. त्यांचा मुलगा ज्या विमानात चढला होता ते त्यांच्याकडे फिरून कधीच परत येणार न्हवत.

माझा मित्र तिथे पोहोचताच मी त्याला 2 मिनिटे थांबायला सांगितले, आणि मी आजोबांकडे पाहिले आणि विचार करू लागलो. मला माहित नव्हते की त्यांना त्यांच्या मुलाने केलेली ही फसवणूक खरोखरच समजली नाही, की त्यांना ते माहित असूनही ते स्वीकारायचे नव्हते…!!

आपले मूल आपल्यासोबत असे करू शकते यावर त्यांचा विश्वास बसू शकत नसेल कदाचित. मग मी आजोबांना म्हणालो की तुमचा मुलगा आता विमानातून उतरून तुम्हाला भेटू शकेल असे मला वाटत नाही. आला आहात तसेच गावी परत जा. आजी घरी तुमची वाट पाहत असेल. क्षणार्धात त्यांचे डोळे भरून आले. डोळ्यात पाणी आणून ते माझ्याकडे बघत होते.

तिकिटाचे पैसे काढून मी त्यांच्या हातावर ठेवले आणि त्यांच्या बाजूला एक डबा होता त्याबद्दल मी त्यांना विचारले की बाबा तुमच्या बाजूला आहे तो डबा कसला आहे? ते म्हणाले बेसनाचे लाडू आहेत, मुलाला आवडतात म्हणून त्याच्या आईने बांधून दिले होते, आता मात्र, माझ्या हृदयात धारदार चाकूने वार केल्यासारखे वाटत होते आणि माझे हृदय रक्ताने पिळवटून निघत असल्यासारखे वाटत होते.

मी शांतपणे त्यांच्या बाजूला बसलो होतो. तेवढ्यात माझ्या मित्राचा आवाज आला, “चला, चल जाऊया” आणि मी शुद्धीवर आलो आणि गर्दीतून माझ्या मित्राच्या मागे वाट काढत चालत राहिलो. घरी पोचलो तर रात्री उशिरापर्यंत झोप येत नव्हती, आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या लाडव्यांच्या डब्यातील लाडू खाऊ शकत नाही हा एकच प्रश्न मला पडला. इतकं प्रेम……….!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!