जन्माष्टमी च्या रात्री करा हा प्रभावी उपाय.. गोपाळकृष्ण प्रसन्न होतील.!!


नमस्कार मित्रानो, आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! दरवर्षी श्रावण महिन्यातील, कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला गोकुळाष्टमीचे व्रत केले जाते. श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या धूम धडाक्यात साजरा केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी प्रथम स्नान करून बाळ गोपाळाची पुजा करावी.

त्यांनतर दिवसभर उपवास करावा. ज्यांना उपाशी राहता येत नाही त्यांनी काही फलाहार घेतला तरीही चालेल. खजुर किंवा राजगिरा लाडू खाऊ शकतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी मनाने आणि वानीने सुद्धा व्रत करायचे आहे. अर्थात मानत वाईट विचार आणू नये आणि कोणालाही वाईट बोलू नये.

भगवान श्री कृष्णाचे ध्यान शक्यतो दिवसभर करावे. जन्माष्टमी ला मध्यरात्रीच्या पूजेला महत्व आहे कारण श्री कृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला होता. मध्यरात्री त्यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बाळ कृष्णाला स्नान घालाव नवीन वस्त्रे घालावीत.

गोपाळ कृष्णा सोबत गाय आणि वासरू ठेवावं. त्यांनतर फुलं, पंचामृत, लोणी, खडीसाखर आणि तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा नैवेद्य अर्पण करावा.‌या प्रसदाच सेवन केल्यानंतर उपवास सोडावा. नंतर रात्री फळ खाऊन जागरण करून अष्टमी तिथीच व्रत पूर्ण करावं. दुसऱ्या दिवशी अन्न आणि पाणी घ्यावं. अश्या प्रकारे हे व्रत केल्यास अधिक पुण्या प्राप्त होत.

श्रीकृष्ण जन्माष्टमी चं व्रत करताना दिवसभर कृष्णाच्या ध्याना मध्ये लीन असावं. भजन किर्तन कृष्ण कथा ऐकाव्या आणि सांगाव्या. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्म करताना तुळशी पत्र बाळकृष्ण ना नक्की अर्पण करावं. तुळशी पत्र अर्पण करणारा विष्णू सहस्त्रनाम चा पाठ करावा.

ते पाठ नसेल किंवा म्हणता येत नसेल तर ते कमीत कमी ऐकावं. या काही गोष्टींना जन्माष्टमी च्या दिवशी विशेष महत्व आहे आणि त्या केल्यामुळे आपल मन पवित्र होत शुद्ध होत. गोपाळ कृष्णा चा आपल्याला आशीर्वाद मिळतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!