Friday, December 8, 2023
Homeआरोग्यजाणून घ्या आरोग्यासाठी किती हितकारक दही खाणं...

जाणून घ्या आरोग्यासाठी किती हितकारक दही खाणं…

दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून बनवले जाणारे ताक, लस्सी असे पेय प्यायला हवे. चला तर जाणून घेऊ दही खाण्याचे फायदे..

दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

दही


दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून बनवले जाणारे ताक, लस्सी असे पेय प्यायला हवे. चला तर जाणून घेऊ दही खाण्याचे फायदे…

दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तागांची खाज कमी होते.
लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.


दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.
दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.
दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.


दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स