आपण ज्या माळेने जप करतो त्या माळेमध्ये किती मणी असतात, हे तुम्हाला माहिती आहे का ?
जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते.
देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही.
रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो.
शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
बिना दमैश्चयकृत्यं सच्चदानं विनोदकम्।
असंख्यता तु यजप्तं तत्सर्व निष्फलं भवेत्।।
अर्थ – देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे, त्यानंतर दान-पुण्य आवश्यक आहे. याचप्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो.
पुढे जाणून घ्या, वेगवेगळे कारणं ज्या आधारावर माळेमध्ये 108 मणी ठेवले जातात…
माळेमध्ये 108 मोती का असतात, यासंबंधी शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकं विशांति।
एतत् संख्यान्तितं मंत्रं जीवो जपति सर्वदा।।
या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108 चा संबंध आहे.
सामान्यतः 24 तासांमध्ये व्यक्ती 21600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी 10800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे.
या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. आणखी एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य 21600 कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये 10800 वेळेस कला बदलतो. याच 10800 संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये 108 मण्यांची संख्या निश्चित केली आहे.
माळेचा एक- एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्मांडाला 12 भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या 12 भागांचे नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. या 12 राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू विचरण करतात. या 9 ग्रहांच्या संख्येचा गुणाकार 12 राशींशी केला तर 108 संख्या प्राप्त होते.
माळेमधील मोत्यांची 108 संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते.
आणखी एका मान्यतेनुसार ऋषीमुनींनी माळेमध्ये 108 मणी ठेवण्याच्या मागे ज्योतीषीय कारण सांगितले आहे.
शास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि 27 नक्षत्रांचे एकूण 108 चरण
असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो.