जर देवघरातील दिव्याची ज्योत अशी दिसत असेल यर ते देतं असतं घरात साक्षात लक्ष्मीचा वास असण्याचा संकेत.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, दिव्याचे महत्व काय? दिव्याची ज्योत कशाप्रकारे असावी? दिव्याची ज्योत कशी असल्यावर घरामध्ये काय होते? म्हणजेच दिव्या बद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

पूजा करून झाल्यावर आपण नेहमी दिवा लावत असतो. असे म्हटले जाते की, दिवा लावल्यामुळे नकारात्मक शक्तींचा नायनाट होऊन सकारात्मक शक्ती मिळत असतात. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण हे आनंदी होत. म्हणून दिवा लावला जातो. ज्याप्रमाणे आपण आपला देव्हारा मध्ये खंडित मूर्ती ठेवत नाही. त्याच प्रमाणे आपला देव्हाऱ्यातील दिवा देखील खंडित नसावा.

म्हणजेच तो स्वच्छ असावा व फुटलेला नसावा. आपण दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये तूप किंवा तेल घालत असतो. असे मानले जाते की. तेलाचा दिवा प्रज्वलित केला ने आपला आलेले सर्व संकटे जळत असतात. आपल्या वरील विघ्न दूर होत असतात. त्याचबरोबर तुपाचा दिवा हा आपली इच्छापूर्ती होण्यासाठी प्रज्वलित केला जातो.

जर तुमच्याजवळ गायीचे तूप असेल तर, त्या गाईच्या तुपाचा दिवा रोज प्रज्वलित करा. कारण हा गाईच्या तुपाचा दिवा खूपच शुभ संकेत देणारा दिवा मानला जातो. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहते. आपल्याला दिवा प्रज्वलित करताना तो कोणत्या बाजूला ठेवावा? याच्याबद्दल पुरेसे ज्ञान नसते. जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असेल तर. तो उजव्या बाजूला प्रज्वलित करावा.

आणि तेलाचा दिवा लावत असेल तर तो डाव्या बाजूला प्रज्वलित करावा. त्याचबरोबर दिव्याची ज्योत ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी. जर तुमच्यावर अनेक संकटे असतील, आर्थिक टंचाई निर्माण होत असेल, कामामध्ये यश मिळत नसेल तर, रोज श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीला एक दिवा प्रज्वलित करावा.

हा दिवा लावत असताना त्याची वात ही लाल रंगाची आणि दिव्यामध्ये थोडी हळद व कुंकू टाकावे.त्यामुळे नक्की तुमच्या सर्व समस्या दूर होतील. जर तुम्हाला धडपणे येत असतील, भीती वाटत असेल तर तीन मुखी हनुमानाच्या समोर दिवा प्रज्वलित करावा. यामुळे देखील तुमचे भीती वाटणे व दडपण येण्याची समस्या दूर होईल.

अशाप्रकारे दिवा लावण्याचे हे काही नियम आहेत. ते आज आपण या लेखातून जाणून घेतलं आहोत. याच प्रमाणे तुम्ही दिवा लावत जावा. तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल. त्याच बरोबर सर्व देवांचे आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment