जर कुणी तुमचं प्रेम समजून घेत नसेल.. तर काय करावे.? नक्की वाचा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो, माणसांच्या आयुष्यात सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक महत्वाचा घटक असेल तर तो आहे नाती आणि म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की, जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती किंवा मित्र आपले मन दुखावतात किंवा आपल्याला त्रास देते तेव्हा आपण काय करायचे?

तर मित्रांनो असे वेळी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला महाभारतामध्ये आणि भगवद्गीतेमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या वेळी तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करत असेल किंवा तुमची किंमत करत नसेल तर अशा वेळी श्रीकृष्णांनी सांगितले या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा.

ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती आपले मन दुखावते त्यावेळी आपल्याकडे दोन पर्याय असतात, एक म्हणजे सहन करणे, किंवा बोलून टाकणे. पण दुर्भाग्य असे की आपण बऱ्याचवेळा या गोष्टी सहन करत असतो, कारण आपल्याला भीती असते की मी जर समोरच्याला काही बोललो किंवा मी बोलले तर आमचे नाते तुटणार नाही ना?, आमचे संबंध तर बिघडणार नाही ना?, समोरचा माझ्यावर रागवेल त्यामुळे आपण शांतपणे गोष्टी सहन करत राहतो.

आपल्याला वाटते की समोरच्याला एक दिवस तरी जाणीव होईल, आणि तो बदलेल आणि तो ही एक दिवस मला समजून घेईल. चांगले दिवस येतील पण चांगले दिवस काही येत नाहीत आणि सारखे सहन करून-करून आपला त्रास वाढत जातो आणि परिस्थिती चिगळत जाते. मित्रांनो असे का होते याचे कारण म्हणजे, ज्यावेळेस आपण गोष्टी सहन करत जातो तेव्हा आपण समोरच्याला एक संधीच देत असतो की, तुम्ही असेच वागत जा.

पण प्रत्येकाची सहन करण्याची एक क्षमता असते कोणाची थोडी असते. कोणाची जास्त असते, पण एक दिवस ही सहन शक्ती जेव्हा संपते तेव्हा परिणाम विस्फोटक होतात. आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो, समोरच्याची वागणूक सहन केल्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते आरोग्यावर परिणाम होतो म्हणजे सांगायचे झाले तर सहन करणे हा पर्याय नाही. पण जेव्हा आपण सहन करण्याऐवजी समोरच्याला बोलून दाखवतो.

म्हणून तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला कोणाच्या वागणुकीमुळे, शब्दांमुळे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होत असेल तर आपण ते सहन करायचे नाही. बोलून दाखवायचे. पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला बोलून दाखवता तेव्हा त्यासाठी एक मोठी अट लागू होते, ती म्हणजे आपल्याला आपले म्हणणे त्या समोरच्याच्या आत दडलेल्या माणसाला सांगायचे असते ज्याला भावना माहीत आहेत.

आणि एखाद्याच्या आत मधला माणूस जर आपल्याला जागा करायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रेम आणि आदर आणि जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगायचे असेल तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्याला प्रेमाने आणि आदराने सांगितले पाहिजे. कारण माणूस फक्त प्रेम आणि आदराची भाषा समजतो, काही अपवाद सोडला तर जेव्हा तुम्ही तुमचा संदेश समोरच्याला प्रेमाने आणि आदराने सांगता तेव्हाच तुम्ही समोरच्या बरोबर जोडले जाता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment