Wednesday, October 4, 2023
Homeजरा हटकेजावईबापू जबरदस्त खेळलात… सचिन तेंडुलकरने ट्विटर वर शुभमन गिलला शुभेच्छा देताच.. लोकांच्याही...

जावईबापू जबरदस्त खेळलात… सचिन तेंडुलकरने ट्विटर वर शुभमन गिलला शुभेच्छा देताच.. लोकांच्याही भन्नाट कमेंटचा प्रतिसाद आला…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. भारताचा फलंदाज शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात 63 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या. या स्फोटक खेलीनान्त्र शुभमन गिलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होता.

टीम इंडियाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करून शुभमन गिलच्या खेळीचे कौतुक केले, त्यानंतर चाहते शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर संबंधी मजेदार कमेंट करत आहेत.

सचिन तेंडुलकरने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे कि, टीम इंडियाचे मालिका जिंकण्यासाठी अभिनंदन. अनेक दिवसाचं नंतर स्टेडियमवर येऊन भारताचा खेळ पाहताना छान वाटले. शुभमन गिलने टीमसाठी उत्कृष्ट खेळी केली. हार्दिक पांड्याने देखील उत्कृष्ट अष्टपैलू खेळ केला. सचिन तेंडुलकरचे हे ट्विट व्हायरल झाले असून यूजर्स त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने लिहिले आहे कि सचिन सर मॅच पाहायला गेले होते आणि गिल भाऊने शतक ठोकले. तर दुसऱ्या युजरने सारा (सचिन तेंडुलकरची मुलगी) चे नाव जोडून आणखी एक मजेदार प्रतिक्रिया देत ‘सारा जमाना शुभमन गिल का दीवाना’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर दुसऱ्या एका युजरने ‘सारा का सारा स्टेडियम ही हिला डाला’ असे लिहिले आहे. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाल्या होत्या. असे म्हंटले जाते कि शुभमन गिल सचिन तेंडुलकरची मुलगी साराला डेट करत आहे. तथ्पाई सारा किंवा शुभमन गिल कडून त्यांच्या नात्याबद्दल असे कोणतेही वक्तव्य आलेले नाही. सारा तेंडुलकर शुभमन गिलच्या दोघी बहिणींना इंस्टाग्रामवर फॉलो करते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स