नमस्कार मित्रांनो, आज आपण येथे मीठाचे काही खास उपाय बघणार आहोत. मीठ आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. जेवणात मीठ जर नसेल तर जेवण आळणी आणि बेचव लागेल. आणि तेच मीठ जास्त झाले तर भाजी अगदीच खारट होऊन जाणार. पण या मीठामुळेच आपण दीर्घायुषीही होऊ शकतो, व मीठामुळे आपले आयुष्य कमी सुद्धा होऊ शकते. म्हणूनच मित्रांनो, हे मीठ नेहमी जपूनच वापरले गेले पाहिजे.
मित्रांनो, वास्तु नियमांनुसार या मीठाचा उपयोग कसा करावा हे फारच कमी लोकांना माहीती असते. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात वापरले जाणाऱ्या मीठाविषयी अतिशय महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का..?? नाही ना..!!
मित्रांनो, आपल्या आयुष्यात येणाऱ्या काही संकटांवर, अडचणींवर मीठाचे काही चमत्कारी उपाय हे अतिशय लाभदायक ठरतात. म्हणूनच आम्ही तुमच्या साठी आज याविषयीची माहिती गोळा करुन घेऊन आलोय. मित्रांनो, मीठाचे अनेक प्रकार आहेत साधं मीठ, काळं मीठ, सेंद्रिय मीठ, समुद्रातून मिळणारे मीठ तर अनुक्रमे हे सर्व मीठाचे प्रकार आहेत.
आपल्या भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार मीठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानले गेले आहे. मीठाला काही शास्त्रानुसार राहूचा कारक ही मानले जाते. मित्रांनो, जर ज्योतिषशास्त्रानुसार आपण मिठाला स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवलंच तर तिथे शनीदेव व चंद्रदेव यांची युती तयार होते, आणि असे होणे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होत असते. असे म्हणतात की यामुळे रोग व शोकाचे वातावरण बनते. अनेक बाबतीत ते क्लेशकारक ही ठरते. म्हणूनच जुने लोक म्हणतात की मीठाला प्लास्टिकच्या भरतीमध्ये देखील ठेवू नये.
मीठाला केवळ काचेच्याच भरतीमध्ये ठेवावे, मगच त्याचा कुठलाही वाईट प्रभाव जाणवत नाही. तसेच मीठ जमीनिवर सांडणे हा सुद्धा मोठा अपशकुन मानला जातो मीठ सांडले तर आपल्या कुंडलीतील चंद्र आणि शुक्र दोघेही कमजोर होत असतात.
तसेच स्वयंपाक करतानाही जर भाजीला मीठ कमी जास्त झालेच असेल तर ते आपण नंतर भाजीमध्ये टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना चुकूनही भाजी चव बघू नये त्यामुळे घरात दरिद्र्य येते. त्याचबरोबर स्वयंपाक झाल्यानंतर आधी देवघरातील देवांना नैवेद्य दाखवल्या शिवाय आपण जेवण करु नये.
मीठ सरळ सरळ कुणाच्या हातावर सुद्धा ठेवू नये. किंवा मीठाची तयार व बांधलेली पुडी सुद्धा कुणाला हातात देऊ नये. असे म्हटले जाते की त्यामुळे जिव्हाळ्याचे सं-बंध खराब होत असतात.
मित्रांनो, या मीठाचे काही खास उपाय आहेत जे आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. मित्रांनो, जर तुमच्या घरात नेहमी अडचणी, किंवा काही संकट येत असतील तर तुम्ही हे उपाय नक्कीच करायला हवेत. असे केल्याने तुमची दरिद्रता निघून जाणार, माता लक्ष्मींची कृपादृष्टी तुमच्यावर कायम टिकून राहणार. चला तर मित्रांनो आता आपण बघुयात मीठाच्या संदर्भातील उपाय..
मित्रांनो, या पहिल्या उपायासाठी आपण सर्वात आधी थोडेसे काळे मीठ घ्यायचे आहे, आणि ते मीठ एका छोट्याशा लाल कापडात ठेवून त्या कपड्याची छोटीशी गाठुडी तयार करायची आहे. तसेच ती मीठाची गाठुडी तुमच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या वर ल
टांगून द्यायची आहे. असे केल्याने तुमच्या घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करुच शकणार नाही. याच्या शिवाय काळ्या मीठाची ही छोटीशी गाठुडी जर कधी तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीवर ठेवली तर तुमच्या सं’पत्तीत अनपेक्षित वाढ होईल.
आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीवर देवी लक्ष्मींचा वरदहस्त राहील, तुमची तिजोरी नेहमीच पैशांनी भरलेली असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर घरामध्ये सुख शांती तथा समाधानाचे वातावरण बघायला मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी आश्चर्यकारकरित्या दूर होऊन जातील.
आता बघूया दुसरा उपाय, मित्रांनो या उपायासाठी तुम्हाला एक छोटी काचेची बाटली घ्यायची आहे. त्या बाटलीमध्ये मीठ भरायचं आहे, व ती बाटली आपल्या घरातील बाथरूम मध्ये ठेवून द्यायची आहे. असे केल्याने बाथरूम मधील नकारात्मक ऊर्जा आपोआप निघून जाण्यास मदत होईल. तसेच सूक्ष्म जीव जंतू तथा किटाणू पासून तुमच्या बाथरूम पासून दूर राहतील.
आपल्या शास्त्रानुसार मीठ हे राहुचे कारक मानले आहे. म्हणून जर तुम्ही घराच्या एका कोपऱ्यात मीठाने भरलेली काचेची बाटली ठेवली तर घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो तसेच घरातील दरिद्रता दूर होत जाते. चला तर मित्रांनो, आता आपण बघुया तुम्ही मीठ स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवाल, तर चंद्र मीठाचा कारक आणि शनी म्हणजेच लोखांडाचा कारक या दोघांचे मिलन झाले तर तुम्हाला ते खूपच नुकसानदायक सिद्ध होऊ शकते.
म्हणून मीठ हे नेहमीच काचेच्या बरणीतच ठेवावे. मित्रांनो, जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीचं मीठ कधीच खाऊ नये. जर कुणी वाईट विचारांना थारा देणारी, दुष्ट व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीचं मीठ चुकूनही कधी खाऊ नये. जर असे घडले तर तुमच्या स्वभावात सुद्धा त्याचे गुण दिसून येतील. मीठ त्याचेच खावे ज्याचा स्वभाव व गुणधर्म, आणि संस्कार चांगले असतील..
मित्रांनो आता आपण पुढील उपायाकडे वळूयात. एखाद्याची दारिद्र्यता दूर करण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस तरी घरात फरशी पुसताना समुद्री मीठ जे किराणा शॉपमध्ये सहज उपलब्ध असते ते पाण्यात टाकून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, तसेच घरातील वातावरण देखील पवित्र आणि शुद्ध होते.
तसेच या उपायामुळे मुळे देवी लक्ष्मींचा घरातील आशिर्वाद वृद्धिंगत होतो व धन धान्यामध्ये बरकत येत असते. घरामध्ये नेहमी पैसा ठेवण्यासाठी काचेचा एक ग्लास घेऊन त्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकावे. तो ग्लास घराचे नैऋत्य दिशेला ठेवून द्यावा आणि त्या ग्लास च्या मागच्या बाजूला लाल रंगाचा एक बल्ब लावावा. जेव्हा कधी त्या ग्लासमधील पाणी संपून जाईल तेव्हा तो ग्लास नीट साफ करून पुन्हा पाणी व मीठ एकत्र करून त्या ठिकाणी ठेवून द्यावा.
तसेच आपल्या टॉयलेट किंवा बाथरूम मध्ये काही वास्तू दोष असतील तर एका काचेच्या वाटी मध्ये समुद्री मीठ ठेवून बाथरूमच्या कोपऱ्यात ती वाटी ठेवून द्यावी या उपायांमुळे देखील घरातील नकारात्मकता दूर होत असते.
प्रत्येक महिन्याला त्या वाटीतील मीठ बदलत जावे, तसेच जुने मीठ घराबाहेर टाकून द्यावे. जर तुमच्या टॉयलेट चा दरवाजा चुकीच्या दिशेने बनलेला असेल तर त्याच्या उंबरठ्यावर लाल रंगाची एक गडद व जाड रेष काढून घ्यावी या मुळे देखील कोणताही दोष लागत नाही.
मित्रांनो, चला तर आता बघूयात दृष्ट उतरविणारा एक खास असा उपाय.. जर तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला कुणाची दृष्ट लागली असेल तर एक चिमूटभर मीठ घेऊन त्या बाळाच्या डोक्यावरुन उतरवून घ्या, नंतर ते मीठ वाहणारे पाणी जेथे असेल तिकडे ते मीठ टाकून द्यावे यामुळे लागलेली नजर व तो दोष नाहीसा होऊन जातो.
तसेच व्यक्तिगत बाधेसाठी एक मूठभर मीठ घेऊन ते सायंकाळच्या वेळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरवून बाहेर टाकून द्यावे, हे असे सारखे तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडत नसेल ते मीठ बाहेर कुठे न टाकता शौचालयात वाहून द्यावे असे केल्याने तुम्हाला याचा निश्चितच फरक दिसून येईल.
वास्तुशास्त्रामध्ये मीठाचे खूप महत्त्व आहे. या मीठाच्या मदतीने अनेक वास्तू दोष आपण दुर करू शकतो. जेव्हा तुमचे मन नेहमी भयभीत व चिंता ग्रस्त असते अशावेळी एक करा दोन्ही हातात मूठभर मीठ घेऊन थोड्या वेळ उभे राहा आणि मग नंतर ते मीठ वॉश बेसिंग मध्ये टाकून द्या.
नळ चालू करुन ते मीठ पूर्णपणे वाहून जाऊ द्यावे त्यामुळे आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ते नक्कीच दूर होतील. वास्तुशास्त्रानुसार धन प्राप्तीसाठी सुद्धा मीठाचे काही चमत्कारिक उपाय दिलेले आहेत चला तर जाणून घेऊयात धनप्राप्तीसाठी मीठाचे अजूनही काही उपाय…
मित्रांनो, मीठ फक्त काचेच्याच बरणीत ठेवावे आणि आणि त्या बरणीत दोन चार हिरवे वेलदोडे तसेच लवंगा टाकून ठेवाव्यात, असे केल्याने पैशांची आवक वाढून घरात बरकत देखील वाढते. या सर्व उपायांमुळे मीठाला सुगंध तर येणारच त्याशिवाय पैशांच्या सं’बंधित कमतरता कधीही भासणार नाही.
मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ठराविक आ’जारांवर मीठाचे काही खास असे उपाय.. मित्रांनो, हा उपाय आपल्याला झोपण्यापूर्वी करायचा आहे. तर मित्रांनो, रात्री झोपताना आपण आपलं डोकं पूर्वेकडे ठेवायचे आहे. आणि एका वाटीमध्ये सैंधव मीठ घेऊन ते आपल्या झोपण्याच्या खोलीमध्ये उशाशी ठेवायचे आहे, असे केल्याने आपले आरोग्य ठणठणीत आणि निरोगी राहते.
परंतु मित्रांनो, आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण साध्या मीठाचा कमीतकमी उपयोग करावा त्याऐवजी तुम्ही सैंधव मीठ नाहीतर काळ्या मीठाचा वापर करु शकतात. जर एखादी व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे तर त्या व्यक्तीच्या उशाशी एका मोठ्या काचेच्या वाटीत मीठ भरुन ठेवावे. आणि दर आठवड्याला ते बदलत रहावे हळू हळू त्या व्यक्तीची प्रकृतीमध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसून येईल.
मित्रांनो, आता बघुयात शनीदेवांच्या वक्र दृष्टीपासून वाचण्यासाठी मीठाचे काही खास उपाय. आपण जेवण करत असताना जर भाजीमध्ये मीठ कमी झाले असेल तर वरतून मीठ टाकून कधीही खाऊ नये फारच आवश्यकता असेल तर मीठाच्या ऐवजी सैंधव मीठ तुम्ही वापरले तर चालेल.असे केल्याने तुम्ही शनीच्या वक्र दृष्टीपासून स्वतःला वाचवू शकतात. याउलट तुम्ही हा नियम पाळला नाहीत तर तुमच्या घरात अठरा विश्वे दारिद्रय कायम राहील. तसेच शा-रिरीकदृष्ट्या तुम्ही नि-रोगी राहणार नाही.
टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!