
कर्णाने कृष्णाला विचारले –
माझ्या आईने माझा जन्म होताच मला नदीपात्रात सोडून दिले. हा माझा अनैतिक संतान असल्याचा दोष आहे का?
गुरुवर्य द्रोणाचार्य यांनी मला शिकवले नाही कारण मी क्षत्रिय कुलातील नव्हतो.
परशुरामांनी मला सर्व विद्या शिकविल्या. पण शाप दिला की मला जेव्हा सर्वात जास्त त्या विद्येची गरज असेल तेव्हा मी त्या विसरून जाईन. का तर त्यांच्या मतानुसार देखील मी क्षत्रिय नव्हतो.
फक्त योगायोगाने, माझ्याकडून एकदा गौमातेचा वध झाला आणि त्या गोमातेच्या स्वामीने मला शाप दिला. तो सुद्धा माझा काहीच दोष नसतांना.
द्रौपदी स्वयंवरात देखील माझा अपमान झाला.
इतकंच काय तर.., शेवटी इतर पुत्रांना वाचवण्यासाठी माता कुन्ती यांना माझ्या जन्माचं रहस्यं मला सांगावं लागलं.
मला जे काही पण मिळाले जे मी माझे म्हणून मिरवतो.., ते सुद्धा दुर्योधनानेच दिलेलं आहे.
तर मग मी त्याच्या बाजूने.., कौरवांच्या बाजूने युद्ध लढलो असेल तर मी कुठे चूक आहे?
यावर कृष्णाने हसत आणि शांतपणे उत्तर दिलेः
कर्णा, माझा जन्म तर तुरूंगात झाला होता.
जन्मापूर्वीच, मृत्यू माझी वाट पहात होता.
ज्या रात्री मी जन्मलो, त्याच रात्री मी आईवडिलांपासून दूर झालो.
तलवार, रथ, घोडा, धनुष्य आणि बाण यांच्यातील आवाज ऐकण्यात तुमचे बालपण व्यतीत झाले. मला गोशाला गाय मिळाली,गायींचा सहवासात रहावं लागलं, गोबर मिळालं आणि अनेक प्राणघातक हल्ल्यांचा सामना करावा लागला तोही केव्हा जेवहा मी उभं राहून चालूही शकत नव्हतो.
सैन्य नाही, शिक्षण नाही. लोकांकडून निंदा मिळाली. त्यांना वाटले की त्यांच्या समस्यांचे कारण मी आहे. जेव्हा तुमचे गुरूवर्य तुमच्या पराक्रमाची स्तुती करीत होते, तेव्हा मला त्या वयात शिक्षण मिळाले नाही. जेव्हा मी सोळा वर्षांचा होतो तेव्हा ऋषी संदीपनींच्या गुरुकुलाजवळ पोचलो.
तुम्ही आपल्या आवडीच्या मुलीशी लग्न करू शकलात.
मी ज्या मुलीवर प्रेम केले ती मला मिळाली नाही. आणि ज्यांचे माझ्या वर प्रेम होते त्या मला मिळाल्या. ज्यांना राक्षसांपासून वाचविले होते त्यांच्याशी मला लग्न करावे लागले.
माझ्या संपूर्ण समाजाला यमुनेच्या काठावरुन इतरत्र निर्वासित व्हावं लागलं होत. आणि त्यांना जरासंधापासून वाचवण्यासाठी दूरच्या समुद्रकाठावर स्थिर व्हावं लागलं. रणांगणातून पलायन केल्यामुळे मला भिरू असेही म्हटलं गेलं.
कदाचित जर दुर्योधन युद्ध जिंकला तर तुला बरेच काही श्रेय मिळणार आहे.
धर्मराज युधिष्ठिर जिंकल्यास मला काय मिळेल?
मला फक्त युद्ध आणि युद्धाने निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी.. समस्यांसाठी.. दोषी ठरवले जाईल.
एक गोष्ट लक्षात ठेवा कर्णा …
प्रत्येकाला आयुष्याचे आव्हान असतेच.., आयुष्य कोणावरही न्याय करत नाही. जर दुर्योधनने अन्याय सहन केला असेल तर युधिष्ठिराने देखील अन्याय भोगला आहेच की…
पण खरा धर्म काय आहे हे आपण चांगलेच जाणून आहात.
कुणी कितीही अपमान केला तरी आपल्याकडे जे योग्य आहे ते आपल्याला मिळत नाही… त्या वेळेस आपण त्या संकटाचा सामना कसा करीत आहोत हे महत्त्वाचं आहे.
हे रडणं थांबव कर्णा.., जिवन न्याय देत नाही, याचा अर्थ असा नाही की.., इथे आपल्याला अनितीच्या मार्गावर चालण्याची परवानगी आहे.