जोतिबाच्या नावानं चांगभलं..!! असं का म्हणतात.? दख्खनचा राजा जोतिबाची 11 वैशिष्ट्ये! वाचा सविस्तर..


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ, ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश,वायू, तेज पाणी आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा. पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता आणि त्यांनी तपश्चर्या करून ब्रदिनाथांना संतुष्ट केले.ब्रदिनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले.

त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पष्ठीच्या मुहूर्तावर स्वता आठ वर्षांची बालमुर्ती होऊन ब्रदिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमुर्ती ब्रदिनाथांची प्राणज्योती म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले आणि आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती, त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली, तेच जोतिबाचे रूप होय. श्री जोतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका प्रिय आहे आणि त्याच्या दवण्याला गंध हा सत्त्व, रज, तम गुणयुक्त आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे.

आणि खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे आणि ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत आणि ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे.

मित्रांनो रत्नासुर व कोल्हासुर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हा करवीर निवासनी श्री महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला आणि तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्‍नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते.

त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्‍नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथ चैत्र पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय आणि मित्रांनो जोतिबावर सरता रविवार, लळित सोहळा, नगरप्रदक्षिणा, अकरा मारुती दिंडी, नवरात्रोत्सव, पालखी सोहळे, श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. जोतिबाचे मंदिर हे ठरावीक दिवसांसाठीच रात्रंदिवस खुले असते. चैत्र यात्राकाळात तीन दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत, चैत्र षष्ठीस, लळित सोहळ्यास, विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते.

ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्‍नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो चांगभलं हा ज्योतिबा चा गजर आहे चंगा आणि भला या दोन पंजाबी शब्दांपासून हा शब्द तयार झाला आहे आणि मित्रांनो पंजाबी भाषेमध्ये कोणतेही शुभ कार्य झाले तर चंगा आणि भला म्हणतात.

आणि ज्यावेळी राक्षसांनी भारतावर आक्रमण केले आणि अत्याचार करण्यास सुरुवात केली त्यावेळी ज्योतिबा ने त्या सर्व राक्षसांचा वध केला आणि भारता मधील सर्व नागरिकांवर आलेले मोठे संकट दूर केले त्यावेळी सर्व नागरिकांनी चंगा भला, चंगा भला, जयघोष सुरू केला त्या दिवसापासून संपूर्ण भारतामध्ये जोतिबाच्या नावानं चांगभलं या वाक्याची सुरुवात झाली.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!