काय आहे स’प्तपदी च्या प्रत्येक पाऊलाचा भा’वार्थ..?? या सात पाऊलांमध्ये द’डलं आहे संसाराचे सार.

आपल्या स’नातन हिं’दू ध’र्मात लग्नाच्या वेळी अनेक वि’धी आणि सं’स्कार केले जातात. ज्याद्वारे नवीन जीवनात प’दार्पण करणाऱ्या वधू-वरांच्या सुखी आयुष्यासाठी कामना केली जाते. यामध्ये सप्तपदीचा देखील समावेश आहे. तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला सप्तपदीचे महत्त्व कळेलही पण पुन्हा एकदा ते क्षण जगण्यात काहीच नु’कसान नाहीये…

सप्तपदीमध्ये एकूण सात पावलं वधू-वर सोबत चालत असतात. हा विधी पूर्ण करण्यासाठी तांदूळाचे 7 छोटे छोटे ढिग बनवले जातात. बर्‍याच लोकांमध्ये तांदूळाच्या ढिगां ऐवजी मातीचे साकोरे ठेवले जातात आणि वधू-वर यावर पाय ठेवत पुढे सरकतात. प्रत्येक टप्प्यावर थांबा, नंतर पुढे जा नंतर पुढच्या टप्प्यावर थांबा आणि नंतर पुढे जा. या प्रक्रियेस सुमारे सात पाऊलं चालावी लागतात.

पहिले पाऊल – पहिले वचन –

लग्नाच्या या सप्तपदीचा पहिला फेरा घेताना नवरदेव आणि नवरी देवाकडून असा आशीर्वाद मागतात की, त्यांच्या आयुष्यात कधीही धन अथवा खाण्या पिण्याची कमतरता न पडो. तसंच नवरा मुलगा यावेळी परिवारातील कल्याणासाठी तसेच नेहमी आनंदात ठेवण्याचं वचन देतो तर त्याचवेळी नवरी येणाऱ्या ज’बाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन देते. दोघेही एकमेकांना योग्य स’न्मान देत आयुष्यामध्ये हव्या असलेल्या यथार्थ गोष्टींचं ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र पुढे चालतील अशी प्रार्थनाही दोघे यावेळी करतात.

दुसरे पाऊल – दुसरं वचन –

दुसऱ्या पाऊलाच्या वेळी उभयतांनी मा’नसिक, भा’वनात्मक आणि आ’ध्यात्मक या सर्व पातळ्यांवर एकता हवी असल्याचं वचन देतात. एकमेकांवर कायम प्रा’माणिकपणाने प्रे’म करत राहण्याचं वचन या दुसऱ्या पाऊला गणिक दोघेही एकमेकांना देतात. दोन श’रीर असूनही एक मन असल्याप्रमाणे एकमेकांना आयुष्यात मदत करण्याचं वचन देतात. जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात. त्या प्रत्येक चढउतारामध्ये एकमेकांची सु’रक्षा करण्याचं आणि साथ देण्याचं वचन आणि सर्व काही एकत्र स’हन करण्याची ताकद असण्याचं वचन या पाऊला गणिक दिलं जातं.

तिसरे पाऊल – तिसरं वचन –

सं’सारीक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तिसरं पाऊल पुढे टाकताना नवरा आणि नवरी देवाकडून धन आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते. अ’ध्यात्मिक सेवा पूर्ण करण्यासाठीही आपल्या स’क्षम करावं यासाठीदेखील प्रार्थना करतात. शिवाय आपल्या होणाऱ्या सं’ततीची योग्य काळजी घेता येईल, त्यांना योग्य शिक्षण आणि त्यांच्या ग’रजा योग्य तऱ्हेने पूर्ण करता येतील यासाठी योग्य क्ष’मता देण्याची आणि त्यासाठी लक्ष ठेवण्याची प्रार्थना यावेळी हे उभयतां देवाकडे करतं. तर आयुष्यभरासाठी एकमेकांसाठी शा’रीरिक आणि अध्यात्मिक प्रामाणिकपणा नि’भावण्यासाठीही देवाकडे आशीर्वाद मागतात.

चौथं पाऊल – चौथं वचन –

भारतीय स’माजात कुटुंबांमध्ये ए’कात्मता दिसून येते. वरीष्ठांचा स’न्मान आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी करणं हादेखील सा’माजिक मू’ल्याचा एक भाग आहे. आपल्या कुटुंबातील योग्य मू’ल्य राखून ठेवण्यासाठी आणि कुटुंबामध्ये ए’कता कायम राखण्यासाठी नवरा आणि नवरी देवाकडून आशीर्वाद मागतात. कुटुंबामध्ये सगळ्यांशी चांगले सं’बंध प्रस्थापित व्हावेत आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्यासाठी देखील शुभेच्छा आणि आनंद आणण्यासाठी कृ’तज्ञता व्यक्त करण्यात येते. तसंच नवरी कोणत्याही प’रिस्थितीत आपल्या न’वऱ्यावर कायमस्वरूपी प्रे’म करण्याचं वचन देते.

पाचवं पाऊल – पाचवं वचन –

नव्या जीवनाची एकत्र सुरुवात करताना, आपल्या भावी सं’ततीसाठीही आशीर्वाद मागितला जातो. आपल्या पोटी एक छान आणि महान मूल जन्माला यावं जे आपल्या कु’टुंबाचं नाव उ’ज्ज्वल करून पुढे व्य’वस्थित ज’बाबदारी सांभाळेल असा आशीर्वाद मागितला जातो. त्याचबरोबर होणाऱ्या मुलाचे उत्कृष्ट आई – वडील होण्याचं वचन एकमेकांना दिलं जातं. तसंच त्यांना योग्य पा’लन पो’षण देऊन मोठं करण्याचंही वचन देण्यात येतं. यावेळी पती आपल्या प’त्नीला नेहमीच मित्राचा द’र्जा देण्याचं वचन देतो. तर प’त्नी आपलं नातं हे नेहमी प्रे’माने बांधून ठेवण्याचं वचन देते.

सहावं पाऊल – सहावं वचन –

यावेळी प्रामाणिक आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी देवाजवळ पती आणि प’त्नी प्रार्थना करतात. तसंच दोघांनाही चांगलं आ’रोग्य मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या कुटुंब आणि मुलांप्रती सर्व ज’बाबदाऱ्या योग्य तऱ्हेने नि’भावण्यासाठी देवाकडे चांगल्या आरोग्याची मागणी करण्यात येते. नवरा आणि नवरी एकमेकांबरोबर एक सं’तुलित आणि आनंदमयी जीवन जगण्याची इच्छा या पाऊलाच्या वेळी करतात.

सातवं पाऊल – सातवं वचन –

हे अंतिम वचन, जे हे पवित्र गठबंधन अधिक मजबूत बनवतं. एकमेकांवर प्रे’म करण्याचं, वि’श्वास आणि स’हयोग देण्याचं वचन यावेळी देण्यात येतं. दोघेही कायम एकमेकांचे मित्र होतील अशी श’पथ घेतात. कोणत्याही प’रिस्थितीत एकमेकांबरोबर न डगमगता उभं राहण्याचंही वचन यावेळी देण्यात येतं. तसंच आयुष्यात काहीही झालं तरीही एकमेकांबरोबर नेहमी खरं बोलायला हवं ही स’त्य प’रिस्थितीदेखील यावेळी वचनातून समोर येते. आपल्या आयुष्यातील गोडवा आणि प्रे’म कायम असंच राहो अशीही यावेळी देवाकडे प्रार्थना करण्यात येते.

प्रत्येक ध’र्म आणि सं’स्कृतीमध्ये वेगवेगळी वचनं असतात. पण त्याचा भावार्थ हा एकमेकांप्रती प्रे’म, भक्ती, स’न्मान आणि प्रा’माणिकपणा हाच असतो. या सर्व वचनांचा एकच अर्थ असतो की, आयुष्यात एकमेकांना कायम प्रा’माणिकपणे साथ द्यायची आहे. तसंच मृ’त्यूच्या आधी कुणीही एकमेकांपासून दूर होणार नाही असंही वचन यावेळी देण्यात येतं.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment