कडाक्याची थंडी.. 1 मिनिटांचा किसिंग सीन.. घेतलेले 47 रिटेक.. 3 दिवस सरु होतं शूटिंग, एका किसिंग सिन साठी एवढे रिटेक्स.. काय आहे नेमका किस्सा.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमा तुफान गाजला. या सिनेमातून दोन्ही कलाकारांनी मोठी प्रसिद्धी मिळाली होती. ‘राजा हिंदुस्तानी’ने केवळ करिश्मा कपूरचं करिअरच वाचवलं नाही, तर एका रात्रीत तिला सुपरस्टार केलं.

‘राजा हिंदुस्तानी’ हा सिनेमा आजही अनेकांचा आवडता असून यातील गाणी, डायलॉग्स अनेकांच्या लक्षात आहेत. आमिर आणि करिश्मा यांच्या जबरदस्त अभिनेयाने, गाण्यांमुळे या सिनेमाने एक वेगळीच उंची गाठली होती. ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाची त्यावेळच्या सर्वात बोल्ड सिनेमांमध्ये गिनती केली जाते. या सिनेमाच्या एका किसिंग सीनने इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ माजवली होती.

सिनेमात आमिर खान आणि करिश्मा कपूरच्या जोडीने जवळपास एक मिनिटांचा किसिंग सीन दिला होता. जवळपास 90 च्या दशकात अनेक अभिनेत्री असे सीन करण्यापासून वाचत होत्या, तिथे करिश्मा कपूरने एक मिनिटांचा किसिंग सीन देत मोठी खळबळ माजवली होती. पडद्यावर, सिनेमात पाहताना हा किसिंग सीन जबरदस्त आणि सोपा वाटत असला तरी त्याच्या शूटिंगसाठी अतिशय मेहनत घ्यावी लागली होती.

राजा हिंदुस्तानी – राजीव मसंद यांनी दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये करिश्मा कपूरने या किसिंग सीनबाबत किस्सा सांगितला होता. अभिनेत्रीने सांगितलेलं, की हे शूट करताना तिची आणि आमिरची तब्येत बिघडली होती. 1 मिनिटाचा सीन शूट करण्याआधी दोघंही अतिशय घाबरले होते. सिनेमातील हा सीन फेब्रुवारी महिन्यात उटीमध्ये शूट करण्यात आला होता.

कडाक्याच्या थंडीत केलेलं शूट – त्यावेळी उटीमध्ये अतिशय थंडी पडली होती. कडाक्याची थंडी, सोसाट्याचा थंड वारा आणि अतिशय थंड पाणी या सर्व परिस्थितीत या जोडीला हा सीन शूट करायचा होता. हा सीन शूट करण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी लागला होता आणि जवळपास 47 रीटेक घ्यावे लागले होते. या सीनच्या शूटिंगवेळी आमिर आणि करिश्मा दोघंही लवकरात लवकर या सीनचं शूटिंग संपावं असा विचार करत होते.

एक मिनिटांचा किसिंग सीन – एका मिनिटाच्या सीनसाठी तीन दिवस मोठी मेहनत करावी लागली होती. ज्यावेळी डायरेक्टरला परफेक्ट शॉट मिळाला, त्यावेळी आमिर आणि करिश्माच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. आपण टीव्हीवर पाहताना हा सीन एका मिनिटाचा अतिशय साधा वाटत असला, तरी यासाठी कडाक्याच्या थंडीत त्यांना मेहनत करावी लागली होती.

सकाळी सातपासून सुरू होतं शूटिंग – त्यावेळी करिश्मा, आमिर आणि त्यांची संपूर्ण टीम सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शूट करत होते. त्यावेळी अशा कठीण परिस्थितीत शूट करण्याचा एक वेगळाचा अनुभव मिळाल्याचं करिश्माने मुलाखतीत म्हटलं होतं.

1996 मध्ये रिलीज झालेला राजा हिंदुस्तानी – 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजा हिंदुस्तानी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. कित्येक महिने हा सिनेमा थिएटरमध्ये हाउसफूल होता.

या सिनेमाच्या जबरदस्त स्टोरी लाइनने, कलाकारांच्या अभिनयाने तसंच गाण्यांमुळे या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यात या किसिंग सीननेही तुफान खळबळ माजवली होती. या सिनेमाने करिश्मा कपूरच्या करिअरला भरारी मिळाली होती.

Leave a Comment