Saturday, June 10, 2023
Homeजरा हटकेकाळे तिळ आणि लिंबूचा करा अशा प्रकारे वापर : सर्व दोष होतील...

काळे तिळ आणि लिंबूचा करा अशा प्रकारे वापर : सर्व दोष होतील दूर : नशिब जोरदार चमकेल..!!!

काळ्या तिळाचे चमत्कारीक उपाय – सर्व दोष दूर होतील, नशीब जोरदार चमकेल..!!

ज्योतिषशास्त्रात काळे तीळ अत्यंत उपयुक्त असून त्यांना तंत्र मंत्र शास्त्रातही खूप महत्त्व आहे. जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येवर ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. आर्थिक अडचणी, शा री रि क व्याधी अशा अनेक प्रकारच्या समस्या काही उपायांनी दूर केल्या जाऊ शकतात.

काळ्या तीळाच्या उपायाने कोणाचेही भाग्य चमकू शकते. आज आम्ही तुम्हाला ज्योतिष शास्त्राशी संबंधित काही उपाय सांगणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करतील.

जाणून घेऊया काळ्या तिळाचे चमत्कारीक उपाय –

ज्योतिष जर कुंडलीत शनीचे दोष असतील किंवा साडेसाती चालू असेल तर प्रत्येक शनिवारी वाहत्या नदीत काळे तीळ सोडावेत. हा उपाय केल्याने शनीदेव प्रसन्न होतात आणि आपल्यावरील संकटं दूर होतात.

असे म्हणतात की, दररोज एक तांब्याभर शुद्ध पाण्यात काळे तीळ घालावे आणि “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करत शिवलिंगावर हे पाणी अर्पण करावे. अशी मान्यता आहे की अशा पद्धतीने पाणी अर्पण केल्यानंतर फुले आणि बिल्व पाने अर्पण करावे. या उपायाने शुभ परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. आपल्यावरील झालेली कोणत्याही प्रकारची बा धा असो ती झटक्यात दूर होते.

घरातील लहान मुले आजारी पडली किंवा जेवण करायचा कंटाळा करत असतील तर समजुन घ्या कि त्यांना नजर लागली आहे. यासाठी आपण काळे तीळ आणि लिंबू यांचा उपाय करू शकतो.

एक लिंबू घ्यायचा आणि तो मधोमध कापून त्याच्या एका भागावर जरासे काळे तीळ लावून तो लिंबू काळ्या धाग्याने बांधून घ्यावा. नंतर तो त्या लहान मुलावरून घड्याळाच्या दिशेने सात वेळा उतरवून घ्यावयाचा आहे. आणि निर्जन स्थळी जाऊन तो लिंबू फेकून द्यावा.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय फक्त घरातील पुरुषांनीच करावयाचा आहे. घरातील स्त्रियांसाठी ह्या उपायाचे विपरीत परिणाम यांमुळे होऊ शकतात. असे केल्याने त्या व्यक्तीची बा धा दूर होऊन मुलांचे आरोग्य सुधारेल.

प्रत्येक शनिवारी दुधात काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने सर्व नकारात्मक गोष्टींचा प्रभाव नाहीसा होतो.

काळे तीळ दा न केल्याने राहू-केतू आणि शनि यांचे आपल्याला लागलेले दोष नाहीसे होतात. हा उपाय का ल स र्प योग, साडेसाती, पितृ दो ष इत्यादी दोषांच्या निवारणासाठी अत्यंत लाभदायी ठरतो.

प्रत्येक शनिवारी काळे तीळ, काळे उडीद काळ्या कपड्यात बांधून एखाद्या गरीब व्यक्तीला दा न करा. या उपायाने संपत्तिशी सं बं धि त समस्या दूर होऊन आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते.

दररोज शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा. यामुळे शनीचे दो ष लवकर दूर होतात. दिर्घ आ जा र, जुने दुखणे बरे होतात.

तर मित्रांनो, शुभ अशा या काळ्या तिळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्यावरील संकटं दूर होतील, धन, धान्य, चांगले आरोग्य मिळावे यासाठी तुम्ही जरूर काळे तीळ घेऊन या. आपला भाग्योदय नक्किच होईल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स