कलियुगात परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण.. सिने अभिनेते स्वप्नील जोशी यांचा सत्य अनुभव..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींचे अनुभव आणि प्रचिती या सदरामध्ये आपले स्वागत आहे. सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांनी स्वामीं बद्दल आपल्या असलेल्या भावना किंवा त्यांना स्वामींची गोडी कशी लागली किंवा ते स्वामींच्या भक्त वर्गात कसे आले त्याबद्दल त्यांनी सांगितले आहे. पाहूयात त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात…

नमस्कार वाचक मित्रांनो मी स्वप्निल जोशी या निमित्ताने श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभारी आहे. मला असं वाटतं की माझं आणि स्वामींचे नातं हे माझ्या अगदी जन्माच्याही आधीपासूनच आहे त्याचे कारण म्हणजे माझे वडील मोहन जोशी आणि आई अनुराधा जोशी हे जोशी दांपत्य. बाबा गेली अनेक वर्ष मला असं वाटतं गेली पन्नास वर्ष स्वामींची सेवा करत आहेत.

आम्ही गिरगाव झांबावत गावात राहायला आणि कांदेवाडी येथे स्वामींचे मठ आहे आणि बाबांची परिस्थिती अशी असायची की सकाळी उठायचं आणि आंघोळ करायची. गिरगावमध्ये सकाळी पाच साडेपाचला पाणी यायचं सकाळी पहिला ते स्वामींच्या मठात जायचे दर्शन घ्यायचे आणि मग घरी येऊन ते आपल्या कार्याची सुरुवात करायचे.

अनेक वेळा असं व्हायचं की मी झोपून उठल्यानंतर आईला विचारायचं बाबा कुठे आहेत. आई नेहमी सांगायची बाबा मठात गेले आहेत. अधून मधून मी ही बाबांसोबत मठात जायचा. माझे बाबा म्हणतात की, मी रामायण आणि महाभारत यामध्ये मी काम केल्याने काही अभ्यासू व्यक्तींबरोबर आमचा परिचय झाला होता या दरम्यान ही काही शब्द माझ्या कानावर यायचे.

त्यामुळे मलाही स्वामींच्या सेवेची गोडी लागली. कलियुगात परमेश्वरापर्यंत पोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण. मला आनंद याचा झाला की मी लहानपणापासूनच ते पाहात आलोय, करत आलोय, बघत आलोय. माझ्या वडिलांमुळे व माझ्या आईमुळे याच्यात काय ताकद आहे हे मी चांगलं जाणतो आहे.

तुम्हाला सांगतोती एनर्जी फील करण्यासाठी नामस्मरण करायलाच पाहिजे. मी स्वामी समर्थांचे करतो मी आवर्जून तुम्हाला सांगतो की स्वामी समर्थच करायला पाहिजे असं नाही तुम्ही ज्या शक्तींना मानता, त्या शक्तीचा करा. मग ते अल्ला असतील, गुरुनानक असतील, दत्तगुरु असतील, रामकृष्ण, पांडुरंग कोणीही तुमचा देव तुमच्या मनात आहे ज्या शक्तीला तूम्ही मानता त्याचे नाव घ्या.

नामस्मरण करा आणि मला खात्री आहे की ती शक्ती तुमच्यासाठी उभी राहते. तुम्हाला ताकद येते असे स्वामी माझ्यासाठी उभारतात. माझ्या परिवारासाठी उभे राहतात अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून अनेक वेळा स्वामिनी मला बाहेर काढले आहे. अनेकदा मला असं वाटतं पुढे अंधार आहे उद्याची सकाळ आपण बघणार की नाही.

पण अशा अनेक संकटातून मी अगदी सहीसलामत बाहेर पडतो. जर तुमच्या हातून काही चुकलं तर ते या जन्मीच फेडायचे आहे स्वामींच्या भक्तांना जाणवत असेल की लगेच फटका मिळतो लगेच समजतं की आपण असं केलं ना म्हणून स्वामींनी शिक्षा दिली आणि त्यांचे वास्तव्य असल्याचं जाणवतं.

माझ्याकडे शेयर करायला काही चमत्कार नाही किंवा गमतीशीर प्रसंग नाही पण मी तुम्हाला सांगतो की एक वेगळ्या प्रकारचे समाधान एक वेगळ्या प्रकारची शांती स्वामींच्या नामस्मरणाने मिळते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, दिवसातले पाच मिनिटे स्वतःसाठी काढा व्यायाम करा आणि पाच मिनिट म्हणजेच शांतीसाठी नामस्मरण करा..

तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल जाणवेल आपोआप तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदलायला लागेल. तुम्हाला हवी तशी परिस्थिती निर्माण होत जाईल. आणि या सर्वामुळे आपले आयुष्य सुखी होईल. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण हा हिरोच असतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी देत असतात.

प्रत्येकाने नामस्मरण व भक्ती याची जोड देऊन आपले आयुष्य सुखी करून घेतले पाहिजे. भक्ती ही मनापासून असावी. त्याची निश्चितच प्रचीती आपणाला येते. मित्रांनो स्वामी समर्थ महाराज अनुभव आणि प्रचिती या सदरामध्ये आम्ही विविध सेवेकऱ्यांचे अनुभव प्रसिद्ध करत आहोत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे सादर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

Leave a Comment