कळसाच्या नारळास कोंब आला तर काय करावे.?? असं होणं शुभ की अशुभ?

मित्रांनो आपण आपल्या पूजा स्थळी तांब्याचा तांब्या भरून त्याच्यावर एक श्रीफळ ठेवत असतो. आणि अमावस्या आली कि त्याच्यावरची श्रीफळ फोडत असतो.

पण मित्रांनो काही वेळा असं निदर्शनास येतं की त्या तांब्या वरील नारळास कोंब येतो. वास्तुशास्त्रानुसार नारळास कोंब येणे हे शुभ आहे की अशुभ आज ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तसेच कोंब आलेल्या नारळाचे काय करावे हेही सांगणार आहोत. श्री म्हणजे लक्ष्मी. श्रीफळास आपण कल्पवृक्ष सुद्धा म्हणतो. श्रीफळ वरून कितीही कठीण असला तरी आतून तो मऊ असतो.

मित्रांनो श्रीफळामध्ये अनेक औषधी गुणही आहेत. श्रीफळामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी खूप प्रमाणात असते. तसेच आपण पूजेमध्ये सर्वांच्या घरी पाहतो की तांब्याचा तांब्या मध्ये पाणी भरून त्यावर श्रीफळ ठेवतात.

व तो कलश प्रति विधी पासून अमावस्या पर्यंत रोज त्यातील पाणी बदलून तो कलश त्या ठिकाणी ठेवत असतात. आणि अमावस्या आली की तो श्रीफळ काढून तो श्रीफळ फोडत असतात.

काही वेळा काही लोक अशा समस्या सांगत असतात की आम्ही जिथे कलश ठेवलेला आहे त्यावरील श्रीफळास कोंब आलेला आहे. तो शुभ आहे की अशुभ आहे. त्या श्रीफळाचा आम्ही उपयोग कसा करावा.

वास्तुशास्त्रानुसार पूजा ठिकाणी कलशवर ठेवलेल्या श्रीफळास कोंब आले असेल तर ते शुभ आहे. पण मित्रांनो कोंब आलेले श्रीफळ कधीही फोडू नये. कारण श्रिफळ हे बीजेचे रुप आहे.

कोंब आलेला श्रीफळ आपण आपल्या शेतामध्ये, प्लॉटमध्ये लावावे. जर आपणास लावायला जागा नसेल तर आपल्या मित्र मंडळामध्ये श्रीफळ भेट म्हणून आपण द्यावा.

आपण असे केले तर दोन फायदे होतात. एक निसर्गाचे संगोपन होते व आपल्याला यातून येणाऱ्या श्रीफळाचे फायदे आहारात होतात. मित्रांनो आम्हाला यातून आणखी एक संदेश द्यायचा आहे तो म्हणजे झाडे लावा झाडे जगवा. आणि प्रदूषण हटवा.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारित एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment