आपल्या भारतीय संस्कृतीत घराच्या मुख्य दरवाजावर अनेकदा आपण घोड्याची नाल लावलेली पाहिली आहे. पूर्वी प्राचीन काळापासून किल्याच्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा घोड्याची नाल ठोकलेली असायची. असं करण्यामागचं कारणं आपल्याला माहितीय का? चला तर मग हेच जाणून घेऊयात आजच्या लेखातून…
खास करुन काळ्या घोड्याची नाल बदलू शकते आपलं नशीब, जाणून घ्या त्याचे फायदे काळ्या घोड्याची नाल घराच्या मुख्य दारावर लावल्यानं नशीब बदलतं काळ्या घोड्याची नाल विशेष उत्तम, त्या नालेने घराला दृष्ट लागत नाही. घोड्याची नाल सर्व न’कारात्मक ऊर्जा खेचून घेते.
घोड्याची घासलेली नाल, विशेष करून काळ्या घोड्याची नालेची अंगठी बनवून सुद्धा अनेक जण बोटात घालतात. तसेच प्राचीन काळापासून याचा वापर आपल्या घराच्या दरवाज्यावरही लावून केला जातो. घोड्याच्या घासलेल्या नालेत असं काय असतं? की लोकं आपल्या घराच्या दारावर ती लावतात. चला तर जाणून घेऊ.. शनीच्या उ’द्रेकापासून बचाव करण्यासाठी हातात अंगठी करून पण नाल वापरली जाते. वास्तूच्या हिशोबानं घोड्याची नाल दू’र्भाग्य हरणारी संकटं दूर करणारी मानली जाते. विशेष करून काळ्या घोड्याची नाल न’कारात्मक शक्ती खेचून घेणारी असते.
कारण ही नाल लोखंडाची असते म्हणून ती शनीच्या वा’ईट प्रभावापासून आपला बचाव करते. शनीचा आवडता रंग काळा आहे म्हणून काळ्या घोड्याची नाल शोधली जात असते. घोड्याची नाल असली तर दृष्ट विरोधी मानली जाते, असं म्हणतात. म्हणजे जर कुणाला दृष्ट लागली तर घोड्याची नाल श’त्रूंपासून रक्षणही करतात. तर जाणून घ्या ज्योतिषानुसार घराबाहेर जर घोड्याची नाल ठोकली तर त्याचे काय-काय फा’यदे होतात ते…
वास्तुशा’स्त्रानुसार ज्यांच्या घराचं मुख्यद्वार उत्तर, उत्तर-पश्चिम किंवा पश्चिमेला असतं त्यांनी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल अवश्य लावावी. असं मानलं जातं की, या घरांना दृष्ट लागण्याची किंवा न’कारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्याची शक्यता खूप असते. घोड्याची नाल या न’कारात्मक शक्तींना घरात प्रवेश करू देत नाही.
जाणून घ्या घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लावण्याचे फा’यदे-
ज्योतिष शा’स्त्रानुसार, शनीला प्रिय लोखंड मानलं जातं. ज्यांना शनीची साडेसाती सुरू आहे त्यांनी काळ्या घोड्याची घासलेली नाल घ्यावी त्याची अंगठी घालावी, असा सल्ला दिला जातो. यानं शनीचा वा_ईट प्रभाव संपून जातो.
जर आपल्या घरात प्रगती होत नसेल तर आपण घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लावावी, सोबतच एका काळ्या कपड्यामध्ये बांधून जिथं धान्य ठेवतात तिथं ठेवावं. प्रगती मग कमी होत नाही.
धन येत नसेल किंवा घरात आलेलं धन टिकत नाही तर आपण काळ्या घोड्याची नाल लावावी. सोबतच ज्यांच्यावर नोकरीचं संकट येतं, त्यांनी आपल्या घराच्या तिजोरीत काळ्या कपड्यांमध्ये घालून काळ्या घोड्याची नाल ठेवावी.
वास्तुशा’स्त्रानुसार ज्या घोड्याची नाल धावता-धावता खाली पडते ती खूप चांगली मानली जाते. अशी नाल जर मिळाली तर आपल्या इतकं नशीबवान कुणी नसेल. दु’र्भाग्यापासून आपलं रक्षण ही नाल करते.
दुकानाबाहेर काळ्या घोड्याची नाल ठोकून ठेवल्यानं व्यवासायात प्रगती होते आणि लोकांची दृष्टही लागत नाही.
घोड्याची नाल लावल्यानं आपलं घर सुरक्षित राहतं. मात्र त्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा.
टीप – वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’धश्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.