नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर, असे म्हटले जाते की या विश्वात उपस्थित असलेल्या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्याला भविष्यात घडणाऱ्या इतर घटनांच्या संबंधित अनेक संकेत देत असतात.
जर तुम्हाला या संकेतांची चाहूल किंवा चिन्हं समजली असतील, तर तुम्हाला तुमच्यासोबत घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी आधीच कळतील. कधीकधी हे संकेत आपल्याला अडचणीत येण्यापासून देखील थांबवत असतात. याच गोष्टी लक्षात घेऊन, आज आम्ही तुम्हाला काही चांगल्या आणि वाईट संकेतांचा अर्थ किंवा त्या संकेताची उकल करुन सांगणार आहोत.
शिंकणे – सामान्यत: एखाद्याचे शिंकणे हे अशुभ पणाचे लक्षण मानले जाते. असे म्हटले जाते की जर तुम्ही घराबाहेर कुठेतरी जात असाल आणि कोणी शिंकत असेल तर तुम्ही थोडा वेळ बसा. परंतु मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की, जर कुणी एकापेक्षा जास्त वेळा शिंकले किंवा सलग शिंकत असेल तर ते अशुभ चिन्ह नसून एक चांगले लक्षण आहे.
एवढेच नाही, जर तुम्ही दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेला असाल आणि तुम्ही तिथे शिंकत असाल तर ते एक चांगले लक्षण आहे. याचा अर्थ असा की भविष्यात तुम्हाला काहीच लाभ नक्कीच होणार आहे.
त्याचबरोबर, तुम्ही कुठेतरी बाहेर जात असताना गायीचे शिंकणे जर ऐकलेच तर ती एक धो का दायक चेतावणी असू शकते. तुमच्या पुढील प्रवासात काहीतरी वाईट घडू शकते. म्हणून या स्थितीत थोडी विश्रांती घ्या आणि जाण्यासाठी विलंब करा. यामुळे धोका टळेल.
चावींचा गुच्छा – प्रत्येक घरात गृहिणीकडे चावींचा गुच्छ असणे आवश्यक मानले जाते. असे असणे म्हणजे ते त्या घराची समृद्धी देखील दर्शविते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमचा चाव्यांचा गुच्छा जर हळू हळू गंजू लागला तर ते खूप शुभतेचे लक्षण आहे. याचाच अर्थ असा की आपणास भरपूर पैसे मिळवणार आहेत.
मित्रांनो, हे पैसे तुम्हाला नातेवाईकांकडून ही मिळू शकतात. याचबरोबर, हा चावींचा गुच्छा तुमच्या घरातील लहान मुलींच्या उशाखाली ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी घरात लवकर येते आणि तुम्हाला खूप सारे पैसे देऊन तुमच्या घरात वास्तव्य करते.
कपड्यांचे बटण – जर तुम्ही कपडे घालत आहात आणि जर तुम्ही घाईमध्ये तुमच्या कपड्यांचे बटण चुकीचे लावले तर तो अशुभ संकेत मानला जातो. असे मानले जाते की असे झाल्यास तुमची सर्व कामं देखील उलट सुलट होऊ लागतात.
तर मित्रांनो, अशा परिस्थितीत तुम्ही पुन्हा तो शर्ट काढून त्याचे बटण योग्य पद्धतीने लावायला हवेत. या व्यतिरिक्त, जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला वाटेत कापड्याचे बटण सापडले, तर तुम्ही आज तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटणार आहात याचे हे संकेत आहेत.
पाळीव कुत्र्याचे भुंकणे – जर तुम्ही घराबाहेर कुठे जात असाल आणि तुमच्या पाळीव कुत्र्याकडून वारंवार भुंकले जात असेल तर ते अशुभ संकेत आहेत. याचाच अर्थ असा की घराबाहेर पडल्यावर तुमच्यासोबत अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
या व्यतिरिक्त, जर तुमच्या घराबाहेर बसलेला कुत्रा अचानक तुमच्याकडे टक लावून पाहू लागला तर तो देखील एक अशुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर ते पूर्ण होणार नाही.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!