कांदा स्वयंपाकघरात वापरली जाणारी सर्वात सामान्य भाजी आहे. दिवसाच्या जेवणात ही सर्वात जास्त वापरल्या जाणार्या भाज्यांपैकी एक आहे. संपूर्ण जगात किती कांदे वापरतात आणि कांद्याची टरकलंही किती फेकल्या जातात याचा विचार करा.
काय होईल जर आपल्याला निरुपयोगी वाटणारी कांद्याची साल किती उपयोगी आहे. हे आपल्याला समजलं ..?? मागील काही संशोधनानुसार कांद्याच्या टरकलांमध्ये खरंतर अधिक पौष्टिक तत्वं असतात.
रोजच्या जेवणात जेव्हा आपल्याला कोशिंबीर बनवायची असते, किंवा भाजीसाठी कांदा वापरायचा असतो तर आपण काय करतो..?? तेव्हा आपण ती कांद्याची टरकलं उचलतो आणि डस्टबिन मध्ये फेकून देतो आणि फक्त चिरलेला कांदाच वापरतो.
परंतु आपल्याला माहित नाही की असं आपण दररोज डस्टबिनमध्ये टाकत असलेली कांद्याची टरकलं आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात, फक्त आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की त्यांचा योग्यरित्या वापर कसा करायचा आहे…
आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या टरकलाचे काही उत्तम ‘आरोग्यविषयी आणि सौंदर्याविषयीचे लाभ’ सांगणार आहोत, हे जाणून घेतल्यावर तुम्ही परत कधीही क’चर्यामध्ये कांद्याची टरकलं टाकणार नाहीत. तर त्याचा वापर तुम्ही अगदी मनापासून कराल.
चला तर , कंद्याच्या टरकलांचे फायदे जाणून घेऊया –
शरिरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते –
यासाठी, आपल्याला कांद्याच्या सालीला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहे व सकाळी हे पाणी पिऊन घ्यायचे. हे बघा आम्हाला माहीती आहे आपल्याला त्याची चव नक्कीच आवडणार नाह.
म्हणून आपल्याला हवे असल्यास आपण त्यात मध किंवा साखर मिसळून देखील पिऊ शकता. अशा प्रकारे दररोज याचा वापर केल्याने आपल्याला काही दिवसांत निश्चितच फरक दिसून येईल.
त्वचेची ॲलर्जी दूर करेल –
जर आपल्याला त्वचेला कोणत्याही गोष्टीपासून ॲलर्जी असेल तर कांद्याच्या सालीचे पाणी वर नमूद केलेल्या पद्धतीनुसार करून घ्या. (म्हणजे कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी कांद्याच्या सालीचं पाणी तयार असणारच आहे ) आता तुम्ही एक करा रोज सकाळी या पाण्याने आपली त्वचा दररोज स्वच्छ करा. असे केल्याने त्वचेसंबंधित ज्या पण समस्या आहेत त्या दूर होतील.
केस सुंदर बनवा –
केस सुंदर तथा चमकदार होण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे कंडिशनर वापरत असाल, पण तर आतापासून तुम्ही कांद्याच्या सालाचे पाणीदेखील वापरू शकता. अशा प्रकारे हा उपाय आपले केस मऊ आणि चमकदार बनवेल.
चेहर्यावरील डाग काढून टाकते –
चेहऱ्यावरील डाग दूर होण्यासाठी कांद्याचा रस वापरावा. यासाठी कांद्याच्या सालामध्ये हळद मिसळा आणि डाग असलेल्या जागेवर तो लेप लावा. लवकरच आपणास फरक दिसेल.
घसा खवखवणे बरे करते –
जर तुमच्या घश्याला दुखापत झाली असेल तर तुम्ही कांद्याची साल गरम पाण्यात उकळवून घ्यायची आहे. उकळून ते पाणी थंड करावे मग हे पाणी प्यावे. घशाशी सं’बंधित समस्यांमध्ये हा अनोखा कांद्याचा चहा खूप फायदेशीर आणि असरदार ठरेल.
कारण कांद्याच्या टरकलांमध्ये देखील अँटीइन्फामेंट्री, अँटी ऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते.कांद्याच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी हे अशी एक शक्तिशाली ऑक्सिडंट्स आहे हे नैसर्गिकरित्या इम्यूनीटी वाढवण्यास मदत करते.
तसेच शरीराला होणाऱ्या वेगवेगळ्या व्हायरल इन्फेक्शन पासून व रोगांपासून आपला बचाव करण्यासाठी देखील याचा खूप उपयोग होतो.