वास्तु उपाय: घराच्या कोणत्याही कोपर्यात काचेच्या भांड्यात मीठ आणि लवंग ठेवल्यास पैशांची कमतरता दूर होते…!!!
मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, मीठा सोबत लवंगचा असा करा वापर किंवा एक उपाय… इतका पैसा मिळेल की मोजताना थकून जाणार…
आजच्या या लेखात आपण आपल्या रोजच्या वापरातील मिठाचे काही खास उपाय जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या जीवनात मिठाला अनन्यसाधारण महत्व आहे. रोजच्या जीवनात आणि जेवणात मीठ अत्यंत गरजेचे आहे.
जेवणात मीठ कमी असेल तर जेवण अळणी लागते आणि जास्त असेल तर बेचव. मिठामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते तसेच मिठामुळे आपले आयुष्य कमी होते. मिठाचा उपयोग कसा करावा हे खूपच कमी लोकांना माहीत असते.
आज आपण स्वयंपाका व्यतिरिक्त मिठाचा उपयोग कसा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या जीवनात येणारे संकटं आणि अडचणी यावर मात करण्यासाठी मिठाचा वापर कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आज तुम्हाला जे जे उपाय सांगत आहोत ते खूपच सोपे आहेत. ते करणं तितकं अवघड नाही. त्यामुळे तुमच्या जीवनात अडचणी असतील तर तुम्ही सुद्धा हे उपाय करा. या उपायांनी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील.
वास्तुच्या मते एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरात पैशांची कमतरता दूर होते. त्याचबरोबर आनंद आणि शांती देखिल टिकून राहते.
आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरात धन आणि भरभराटी कशी मिळवावी याबद्दल जाणून घेऊ. एका काचेच्या भांड्यात किंवा वाटीत थोडेसे मीठ घ्या आणि त्या वाटीत मीठाबरोबर चार ते पाच लवंगा ठेवा.
मित्रांनो, हा उपाय करतांना आपण घराच्या कोणत्याही कोपर्यात ही वाटी ठेवू शकता. फक्त हा उपाय अगदी गुप्त ठेवायचा आहे. असे केल्याने पैशांची आवक वाढेल आणि घरातील वस्तूंमध्ये भरभराटी येईल.
एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवून जिथे एकीकडे घरात पैशांची कमतरता दूर होईल, तर दुसरीकडे संपूर्ण घर एका वेगळ्याच सुगंधाने सुगंधित होईल आणि घरात सुख आणि शांती कायम राहील.
त्याशिवाय तुम्हाला बाथरूमशी संबंधित वास्तूदोष असल्यास त्या वाटीत जाड मीठ घ्या आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा की कोणाचा हात लागणार नाही. काही दिवसांत वाटीमधून मीठ बदलून घ्यावे.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!