कर्म बुद्धि व भाग्य यापैकी कोणाचे वर्चस्व सर्वश्रेष्ठ आहे.??


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! कर्म, बुध्दी आणि भाग्य यातील सर्वश्रेष्ठ कोण.? म्हणूनच आज आपण एक कथा पाहणार आहोत. या कथेद्वारे आपल्याला या तीन पैकी सर्वश्रेष्ठ कोण! याची प्रचिती येईल.

स्वर्ग लोकांमध्ये कर्म, बुद्धी व भाग्य हे तिघे आप-आपसात बोलत असतात की, मी सर्वात श्रेष्ठ आहे आणि सर्वात श्रेष्ठ आहे. यांचे हे बोलणे चालत असते. त्यावेळी नारदमुनी तिथून जात असतात. तेव्हा नारदांनी त्यांना प्रश्न करतात की, काय झाले, तेव्हा ते सांगतात ते आपसात भांडू लागतात. व नारदमुनींना विचारतात आमच्या तिघांपैकी कोण सर्वश्रेष्ठ आहे? तेव्हा नारद मुनी हसतात आणि बोलतात, “तुम्ही तिघे ही पृथ्वी वर जाऊन एका सामान्य माणसामध्ये एक एक अशा प्रकारे जा आणि कोणा द्वारे त्याचा विकास होतो. तो पहा आणि तोच सर्वात श्रेष्ठ मानला जाईल!”

त्याप्रमाणे ते तिघेही पृथ्वी लोकात येतात आणि एका सामान्य लाकूड तोडा कडे जातात. त्या वेळी ते ठरवतात की एक एक महिना या या कालावधीत प्रमाणे ते एक एक करून त्यामध्ये वास करते. सर्वात प्रथम कर्म लाकूडतोड्या मध्ये वास करतो. कर्मामुळे तू नेहमी पेक्षा जास्त लाकूड तोडून लागतो. जास्त लाकूड तोडल्यामुळे त्याला ते विकता येत नाही. पण रोजच्या प्रमाणेच तो जेवढे आपण देत असतो तेवढेच तो व बाजारात जाऊन विळतो. त्यामुळे असेच एक महिना चालू राहते. त्याचा कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही.

कर्माची वेळ संपली. कर्म पुन्हा स्वर्गलोकात परत जाताना. नंतर भाग्य म्हणतो, “मी जातो!” आता त्याप्रमाणे त्या लाकूडतोड्याच्या आत भाग्य वास करतो. त्याच्यामध्ये झाल्यामुळे त्याला लॉटरी लागते. आणि भरपूर पैसे मिळतात. परंतु ते पैसे काय करायचे हे त्याला कळत नाही. त्यामुळे तो वायफळ चैनी करण्यास सुरुवात करतो. आणि कोणतेही काम करत नाही. यामुळे तो आळशी बनतो. थोड्या दिवसांनी त्याचे संपूर्ण पैसे संपून जातात. आणि पुन्हा गरीब होतो.

भाग्याचा ही वेळ संपते तो पुन्हा स्वर्गलोकात परत जातो.त्यावेळी बुद्धि म्हणते, “आता मी जातो!” त्या प्रमाणे बुद्धी त्याच्या शरीरात जाते. बुद्धीच्या प्रभावामुळे लाकूडतोड्या प्रथम आपल्या कुऱ्हाडीला धार लावून घेतो आणि मग लाकडे तोडायला जातो धार जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणात लाकडे तो तोडतो. आणि आजूबाजूची पडलेली लाकडी गोळा करतो. आणि त्यांची एक मोठी जोडी तयार करतो. की जोडी तो बाजारात नेऊन विकतो.

जास्त लाकूड असल्यामुळे त्याला जास्त पैसे मिळतात. पुढे तो दोन कुर्‍हाडी घेतो आणि एकच धार कमी झाल्यास दुसरी वापरण्यास सुरुवात करतो. त्यामुळे त्याचे लाकूड तोडण्याची प्रमाण जास्त होते. आणि लाकडाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याला पैसेही रोजचे जास्त मिळत जातात. आणि यामुळेच तो श्रीमंत बनतो. बुद्धीची वेळ ही संपते. बुद्धी पुन्हा स्वर्गलोकात परत जाते.

त्यावेळी भाग्य, कर्म व बुद्धी आपापसात बोलत असतात. तेव्हा तेथून नारदमुनी जात असतात. त्यावेळी तो प्रश्न करतो की, “तुम्ही एकेक करून मी सांगितलेला उपाय केला का?” त्यावेळी भाग्य आणि कर्म बोलते, “हो! केला आणि त्याचे उत्तरही आम्हाला मिळाले. आमच्या दोघांपेक्षा सर्वात श्रेष्ठ बुद्धी आहे. बुद्धी असेल तर भाग्य आणि कर्म आपोआपच येत असतात.” त्यामुळे सर्वात श्रेष्ठ बुद्धी आहे.

कोणतेही कर्म किंवा भाग्य जर आपल्यापाशी असेल तर, बुद्धी शिवाय आपण त्याची योग्य विल्हेवाट लावू शकत नाही. जर आपल्याकडून बुद्धी असेल तर, त्याचे योग्य नियोजन आपण करू शकतो आणि आपल्या जीवनात त्याचा समतोल राखला जाऊ शकतो. म्हणून बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!