Saturday, June 10, 2023
Homeजरा हटकेकसे ओळखावे की कुणाला वाईट नजर लागलीय : नजर (दृष्ट) कशी काढावी?

कसे ओळखावे की कुणाला वाईट नजर लागलीय : नजर (दृष्ट) कशी काढावी?

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो वाईट नजर काढण्याचे असरदार उपाय आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.पहिला उपाय म्हणजे दृष्ट लागलेल्या व्यक्तीने हनुमान चालीसा पाठ करावा. या उपायामुळे वाईट नजर पासून संरक्षण होते व वाईट नजर लागत नाही.

दुसरा उपाय म्हणजे मिठाचे सात खडे, सात लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा. नजर लागलेल्या व्यक्तीस झोपवून सातवेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा. नंतर हे साहित्य चुलीत टाका. मंगळवार आणि शनिवार हा तोटका केल्यास अधिक उत्तम.

तिसरा उपाय म्हणजे एखाद्या व्यक्तीस दृष्ट लागली असेल तर घरामध्ये पिवळी मोहरी, गुगळ, लोबान आणि गाईचे तूप टाकून धूप द्यावी. हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी करावा. आणि यासाठी गाईच्या शेणाच्या गोवरीचा वापर करावा. या उपायामुळे ज्या व्यक्तीस नजर लागलेली आहे ती नजर उतरून जाईल.

चौथा उपाय म्हणजे दृष्ट लागलेल्या व्यक्तीला झोपवून त्यावरून तुरटीचा खडा सात वेळेस उतरवुन घ्या. त्यानंतर हा तुकडा गौरी वर (शेना पासून तयार करण्यात येतात गौऱ्या) जाळून टाका.
या उपायामुळे ज्या व्यक्तीस नजर लागलेली आहे ती तात्काळ उतरून जाईल.

पाचवा उपाय बाळाला नजर लागली असेल आणि बाळ दूध पीत नसेल तर एका वाटीत थोडे दूध काढून बाळा वरून सात वेळा उतरवा आणि हे दूध काळया कुत्र्याला पिऊ द्या. या उपायांमुळे तुमच्या बाळाला लागलेली नजर होऊन जाईल व तुमचे बाळ दूध प्यायला सुरू करेल.

सहावा उपाय एका नवीन रुमालावर हनुमानाच्या पायावरील शेंदूर लावा. त्यानंतर दहा ग्रॅम काळे तीळ, दहा ग्रॅम उडीद, एक लोखंडाचा खिळा, तीन मिरच्या रुमाला मध्ये बांधा.

ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे त्याच्या उशीखाली हा रुमाल ठेवा. चोवीस तासानंतर हा रुमाल नदीमध्ये सोडा. हा उपाय केल्याने ज्या व्यक्तीला नजर लागली असेल ती लगेचच उतरून जाईल.

मीठ आणि मोहरी एकत्र करावी. मिठाचे प्रमाण जास्त आणि मोहरीचे प्रमाण अल्प असावे. पाच बोटे जुळवून त्यात मावेल एवढी मीठ-मोहरी दोन्ही हातांत घेऊन हातांच्या मुठी कराव्यात.

वळलेल्या मुठी खालच्या म्हणजेच भूमीच्या दिशेने करून हातांची स्थिती ‘फुली’च्या आकारासारखी करून उभे रहावे. त्यानंतर दृष्ट काढणार्‍या व्यक्तीने तिचे हात खालून वरच्या दिशेने गोलाकार पद्धतीने आतून बाहेरच्या दिशेने फिरवावेत. दृष्ट काढून झाल्यावर मीठ-मोहरी निखार्‍यांवर जाळावी.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स