कष्ट करून कोणीच सफल होत नाही, त्यासाठी ‘या’ चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.!!

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, घरातील वातावरण प्रसन्न राहावे त्याचबरोबर घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते यासाठी आपल्यातील बरेच जण दररोज सकाळी देवघरातील देवी-देवतानकडे इच्छा व्यक्त करत असतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी पैशांच्या संपत्तीत वाढ व्हावी यासाठी प्रार्थना करत असतात त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये पूजापाठ देखील करत असतात. परंतु मित्रांनो आपण ज्याप्रमाणे घरातील गरिबी दूर व्हावी आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतो आणि वेगळ उपाय करत असतो त्याच बरोबर काही गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आपण खूप मेहनत घेऊन सुद्धा आपल्या इच्छा जर पूर्ण होत नसतील आणि घरातील गरिबी दूर होत नसेल तर आपले मन देखील नाराज होत असते, पण खूप मेहनत करूनही आणि कष्ट करून सुद्धा असे का होते यामागचे नेमके कारण काय आहे हे आज आपण एका गोष्टीद्वारे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो हिरालाल नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याची एक मोठी आंब्याची बाग होती, ज्यावेळी आंब्याचा सिझन येत होता त्यावेळी त्याची पूर्ण भाग आंब्यांनी सजून जायची. हिरालाल च्या बागेत जवळच एक कुटुंब राहत होते आणि ज्यावेळी हिरालाल च्या बागेला आंबे लागत यावेळी त्या कुटुंबातील व्यक्ती त्या बागेतील झाडांची आंबे काढून खात असत. परंतु एके दिवशी हिरालालला ही गोष्ट समजली, आणि त्यामुळे त्याने त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना त्याचा जाब विचारला. परंतु त्यानंतरही त्या कुटुंबातील व्यक्ती हिरालाल बागेतून गेल्यानंतर हळूच आंबे चोरून खाऊ लागले. ज्यावेळी हिरालालला त्या कुटुंबातील लोक आंबे चोरून नेताना दिसायचे त्यावेळी हिरालाल काठी घेऊन त्यांना मारण्यासाठी अंगावर जात असत.

हे असे कायमच होत राहिल्यामुळे त्या कुटुंबातील जेष्ठ व्यक्तीने स्वतः ची आंब्याची बाग उभा करण्याचा निर्णय घेतला.आणि त्यानंतर त्याने कुटुंबातील सर्व व्यक्तींना त्याबद्दल कल्पना दिली कुटुंबातील ही सर्व व्यक्तींना सुद्धा त्याचीही कल्पना चांगली वाटली आणि सर्वजण कामाला लागले सर्वांनी जमिनीची मशागत करून त्यामध्ये आंब्याच्या बिया पेरण्यास सुरुवात केली.त्या कुटुंबातील सर्वांना आता आनंद होत होता कारण आता आपल्याला आंबे खायला मिळणार आणि कोणी आपल्यावर रागावणार सुद्धा नाही म्हणून. थोड्या दिवसांनी त्या कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यांनी आंब्याच्या कुया ज्या ठिकाणी लावलेल्या त्या ठिकाणी येऊन पाहणी केली तर तिथे अजून रोपेही आली नव्हती.

हे पाहून त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी तिथे पुन्हा उकरून त्या बिया काढून घेतल्या आणि त्यामुळे त्यांची ती बाग उध्वस्त झाली. या गोष्टीमध्ये त्या कुटुंबातील सदस्यांचे काय चुकले त्यांनी तर खूप परिश्रम सुद्धा घेतलेच होते. मग त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना काम मिळाले नाही कारण त्यांनी धीर धरला नव्हता, मित्रांनो कोणतेही कार्यामध्ये अधीर होऊन चालत नाही. जर यश मिळवायचे असेल तर त्यासाठी वेळ हा लागणारच. मित्रांनो भगवद्गीतेमध्ये सुद्धा असे सांगितले आहे की जर व्यक्ती अज्ञान असेल तर तो आपल्याला आपल्या कामाचे फळ मिळेल या अपेक्षेनेच काम करत असतो.

परंतु व्यक्ती जर ज्ञान असेल तर तो कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवत नाही आणि आपले कार्य करतच राहतो. जर सफलता मिळवायचे असेल तर फक्त कष्ट करून काही उपयोग नाही तर त्यासाठी धीरही धरावा लागतो म्हणूनच कोणतेही कार्य केल्यानंतर त्याचे लगेचच फळ मिळेल अशी अपेक्षा करू नये.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment