Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेकावळा अशाप्रकारे देतो आपले भाग्य बदलण्याचे हे संकेत.. पण कसे जाणून घ्या..!!

कावळा अशाप्रकारे देतो आपले भाग्य बदलण्याचे हे संकेत.. पण कसे जाणून घ्या..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे. पक्ष्यांना दाणे किंवा पाणी दिल्यास आपल्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते. व आपल्याला सफलता प्राप्त होते. कितीतरी पक्षी असे असतात की जे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनेचे संकेत देतात.

या पक्षांपैकी एक पक्षी आहे कावळा. आज आम्ही तुम्हाला कावळ्यामुळे आपल्या जीवनात कोणते शुभ व कोणते अशुभ संकेत मिळतात हे सांगणार आहे. प्राचीन कथेमध्ये असा उल्लेख आहे की कावळ्याने अमृताची चव चाखली होती.

याशिवाय दुसरी एक कथा अशी आहे की श्री राम यांच्याकडून कावळ्याला असा आशीर्वाद मिळाला आहे की कावळ्यांना दिलेले भोजन आपल्या पितरांना मिळते. शनिदेवांना कावळ्याच्या च्या रूपात पाहिले जाते.

तसेच कोणती ही आत्मा कावळ्यांच्या शरीरात प्रवेश करुन विचलण करू शकते. म्हणूनच पितरांचे आश्रय स्थान म्हणून कावळ्याकडे पाहिले जाते. मित्रांनो कावळ्याला भविष्यात घडणारे घटनांचे संकेत आधीच मिळतात.

मित्रांनो तसं बघायला गेलं तर कावळ्याला अशुभ समजले जातं. कावळ्याचं महत्व फक्त दहाव्याला आणि तेराव्याला आहे. पण आज आपण कावळ्या बद्दलची माहिती सांगणार आहोत.

कावळ्याला आपण आपल्या घरातील एखादी वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरात कधी पैशाची कमी पडणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला सकाळ सकाळी कावळा दिसला तरच कावळ्याला खाऊ घाला. तेव्हाच तुम्हाला याचा फायदा होईल.

हिंदू वेद पुराणानुसार असे म्हटले गेले आहे की सकाळी कावळ्याला काहीतरी खायला दिलं तर आपल्याला पुण्य मिळतं. भारतीय परंपरेत कावळ्याला अशुभ मानले गेले आहे. कावळ्याचा संबंध यमराजाशी जोडलं गेलं आहे.

कर्कश असा काव काव आवाज आणि काळा रंग ही कावळ्याची मुख्य ओळख. मित्रांनो सकाळी उठल्यावर तुम्हाला कावळा दिसला तर घरातून एखादी रोटी किंवा इतर पदार्थ कावळ्याला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला पुण्य तर मिळेलच तसेच कुबेर देव तुमच्यावर खुश होऊन प्रसन्न होतात.

आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. आता साक्षात धनाचे देव कुबेर देवाचा आशीर्वाद असल्यावर तुम्हाला आयुष्यात कधीही धनाची कमी पडणार नाही. सतत पैसे येत राहतील. त्यामुळे कावळ्याला सकाळी नेहमी खायला घाला.

मित्रांनो कावळ्याला अशुभ जरी मानले गेले असले तरी कावळा काही संकेत देत असतो. हे संकेत कोणते आहे ते आपण जाणून घेऊया. कावळा जमिनीवर चोच मारत खायला शोधत असतो. जर असं करताना कावळा तुमच्या दृष्टीस पडला तर तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते.

तुम्ही पुढे जात असताना तुम्हाला पाठीमागून कावळ्याचा आवाज आला तर त्याचा अर्थ असा असतो की तुमची सर्व संकट दूर गेली आहेत. पाठीमागून कावळ्याचा आवाज येणे यालासुद्धा शुभ संकेत मानला जातो.

कावळा जर आपल्या घराच्या छतावर बसून तो रडत असेल तर आपल्या घरी कोणी पाहुणे येणार आहेत असा त्याचा अर्थ असतो. पण अनेक कावळे मिळून आपल्या छतावर बसून ओरडत असतील तर ती आपल्या घरी संकट येण्याची चाहूल असते.

कावळा ओरडुन आपल्याला संकटापासून सावध करत असतो. घरासमोर खूप सारे कावळे एकत्र येऊन ओरडतात तो सुद्धा अशुभ संकेत मानला जातो. यात्रेची प्लॅनिंग करताना किंवा यात्रा सुरू करण्यापूर्वी कावळ्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवल्यामुळे यात्रा चांगली पार पडते.

कावळ्याने डाव्या बाजूने घेऊन नैवेद्य ग्रहण केल्यास यात्रा निर्विघ्न संपन्न होते. कावळा मागून आल्यास प्रवासाला फायदा होतो. उजवीकडून उडत डाव्या बाजूला येऊन नैवेद्य ग्रहण केल्यास यात्रा चांगली पार पडते. अन्यथा विपरीत फळ प्राप्त होते.

कावळ्याने समोरून येऊन नैवेद्य ग्रहण केल्याने पायाने डोकं खाजवल्यास कार्य सिद्ध होते. नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा विहिरीच्या पायरीवर किंवा नदीकाठावर कोणत्याही जलयुक्त ठिकाणी जाऊन बसल्यास हरवलेली वस्तू परत मिळते.

नैवद्य खाल्ल्यावर कावळा घरावर किंवा पोटमाळ्यावर किंवा झाडावर बसल्यास आकस्मात धनलाभ प्राप्तीचे योग असतात. आपल्या तोंडात पोळी, फळ किंवा मासाचा तुकडा दबलेला दिसल्यास कामात यश लाभत.

कावळा गायीच्या पाठीवर बसून आपली चोच रगडताना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते. कावळा आपल्या चोचीत कोरडी गवत घेऊन जाताना दिसल्यास धनलाभ होत.

कावळ्याच्या चोचीत फुल पाने दिसल्यास इच्छा पूर्ण होते. कावळा धान्यचा जवळ बसलेला दिसल्यास धान्य लाभ होतो. आणि गाईच्या डोक्यावर बसलेला दिसल्यास प्रियजनांची भेट होते.

उंटाच्या पाठीवर कावळा दिसल्यास यात्रा कुशल होते. डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसल्यास प्रचंड संपत्ती मिळते. जर कावळा धुळीत लोळताना दिसला तर त्या जागी पाऊस पडण्याची शक्यता असते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाइक करा व शेयर करायला विसरु नका

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स