तारीख नीट लक्षात ठेवा.. गुढीपाडव्यापासून ‘या’ 4 राशींचा भाग्योदय..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. यंदाचा गुढीपाडवा काही राशींसाठी अतिशय खास असणार आहे, असं असलं तरीही प्रत्येकासाठीच हा दिवस तितकाच मंगलमय असेल यात शंका नाही. त्यामुळे आता तुम्हीही उभारणार यशाची गुढी….

म्हणजे येऊ घातलेल्या काही सणवारांचे. त्यातगी गुढीपाडव्याचे. यंदा हा शुभ दिवस किती तारखेला आहे इथपासून त्यावेळी पूजेसाठीचा मुहूर्त काय आहे असे अनेक प्रश्न काहींच्या मनात घर करत आहेत. पंचांगानुसार दरवर्षी हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून होत असते.

याच दिवसापासून चैत्र नवरात्रोत्सवाचीही सुरुवात होते. यावर्षी हे नवसंवत्सर 2080 पिंगल नामक संवत्सराच्या रुपात ओळखलं जाईल. यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023, बुधवार रोजी असून या दिवशी 30 वर्षांनंतर असा योग तयार होत आहे.

बघूया पंचांग थोडक्यात…
वार- बुधवार
तिथी- शु. प्रतिपदा
नक्षत्र- उ. भाद्रपदा
योग- शुक्ल, ब्रह्मा
करण- किंस्तुघ्न

जवळपास 30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करत असून, 12 वर्षांनंतर मेष राशीच गुरुचं गोचर होत आहे. त्यामुळं हा काळ महत्त्वाचा आहे. याचा काही राशींना प्रचंड फायदा होणार आहे. चला पाहुया यात तुमची रास आहे का…

धनु रास – येणारा काळ तुमच्यासाठी अतीव शुभ असणार आहे. तुमच्या पराक्रमाचीच चर्चा सर्वदूर पसरेल. आनंदाची बातमी मिळेल. मित्रांसमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. अतिउत्साहीपणा कमी करा. स्वत:साठी काही नियम आखा. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.

तुळ रास – मोठी लक्ष्य साध्य करण्यावर तुमचा भर असेल. तुमच्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा योग तुम्हाला येणार आहे. नोकरीमध्ये यश मिळणार आहे. एखाद्या आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करणार आहात. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत.

सिंह रास – पुण्यकर्म करा, फळ तुमच्याच पारड़्यात पडणार आहे. सर्वांना सोबत घेऊन यशाच्या वाटेवर निघा. तुमचे शत्रू कमकुमवत असतील तेव्हाच चाल करा. अडकलेली कामं मार्गी लागतील. जमिनीचे व्यवहार कराल. आपल्या माणसांचा सल्ला घ्या. आर्थिक लाभ तुमच्या प्रतीक्षेत आहे.

मिथुन रास – तुमच्या व्यक्तीमत्त्वाची इतरांवर छाप असेल. भाग्योदयाचा काळ असल्यामुळं तुम्ही कराल त्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. व्यापारामध्ये यशप्राप्ती आहे. नव्या माणसांना भेटण्याची संधी मिळणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद फळणार आहेत. तुम्ही अनेकांसाठी आदर्श असाल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment